वक्तृत्व स्पर्धेबद्दल माहिती | Vaktrutva spardha in marathi

नमस्कार मित्रांनो ! आज आपण वक्तृत्व स्पर्धेबद्दल म्हणजेच Vaktrutva spardha in marathi बद्दल अधिक माहिती बघणार आहोत. वक्तृत्व स्पर्धा म्हटली की आठवते तो मंच, तो भला मोठा लोकांचा जमाव, आणि समोरच बसलेले गुणांकन करणारे शिक्षक. चांगला वक्ता होण्यासाठी आगोदर चांगला श्रोता होता आले पाहिजे हे तेव्हडे खरे असले तरी त्याच्या जोडीला भरपूर वाचन व बोलण्याचा सराव करावा लागतो अन आत्मपरीक्षणही करावे लागते.

वक्तृत्व स्पर्धेबद्दल माहिती | Vaktrutva spardha in marathi

वक्तृत्व स्पर्धेबद्दल माहिती | Vaktrutva spardha in marathi

वक्तृत्व सुधारण्यासाठी आधी भाषा शब्द संग्रह चांगला पाहिजे. दुसरे communication म्हणजे संभाषण चांगले असले पाहिजे. नंतर आवाज आणि नंतर शरीराच्या हालचाली, ही एक प्रात्यक्षिक कला आहे. कशात कमी आहे हे पाहावे लागते. तसेच आत्मविश्वास सुद्धा पाहिजे. प्रयत्न केला तर नक्की जमते.

वक्तृत्व सुधारण्यासाठी बरेच उपाय आहेत, त्यातील काही देत आहे :

  1. वाचन भरपूर करायला पाहिजे. लहान पुस्तकांपेक्षा मोठ्या कादंबरी वाचल्या पाहिजेत.
  2. वाचन झाल्यावर आवडता परिच्छेद 15 ते 20 मिनिटे मोठ्याने वाचन केला पाहिजे.
  3. आरशासमोर उभे राहून वाचन केले, की आपल्याला आपल्या देह बोलीचा अंदाज येतो.
  4. उगीच स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करू नका, शब्द अडले तर ते लिहून काढा आणि उच्चार सुधारा.
  5. योग्य मित्रांना निवडून त्याच्या समोर आपले विचार मांडावेत, परंतु विचार मांडताना त्यात भावना नसाव्यात फक्त वाचनाचा हेतू असावा.
  6. योगा, प्राणायाम, अनुलोम-विलोम, भस्त्रिका 15 मिनिटे सवय लावून घ्या आणि अगदी यूट्यूब वर बघून केलत ना तरी चालेल.
  7. खाली मांडी घालून जमिनीवर दोन्ही हाताची अंगठा आणि अंगठ्याचे पुढचे बोट 👌👌 हे अशा प्रकारे ते हात मांडीवर ठेवून डोळे मिटून पूर्ण ध्यान हे कंठाशी खाली गळ्याचा खोलगट भागात असू द्या (हम म््म) हा मंत्र जसा ओं म म्हणा तो तसा दीर्घ फक्तं दररोज दोनच मिनिटे म्हणा.

आपले वक्तृत्व अथवा संभाषण हे काही लोकांना प्रभावशाली वाटते तर काहींना आवडत नाही. त्यामुळे आपण कोणत्या वर्गाचा श्रोता आहे ते लक्षात घेऊन वक्तव्य अथवा संभाषण केले पाहिजे. त्याचा असा फायदा असा होतो की, ज्यांना पूर्वी आपले वक्तव्य पसंत नव्हते तेही आवडीने ऐकतात. थोडक्यात काय माणूस बघून पुडी बांधता यावी म्हणजे झाले.

मात्र खरोखर आपल्या वक्तव्यामध्ये समृद्धी आणायची असेल ते आपली सर्व ज्ञानेंन्द्रिये सदा सर्वकाळ जागरूक ठेवली पाहिजेत. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा जागरूक राहून नाक, कान, डोळे यांनी सतत ठाव घेत राहिले पाहिजे. भरपूर वाचन, श्रवण करणे आणि कमी बोलणे, या गुणांबरोबरच आणखी एक महत्त्वाचा गुण म्हणजे जे ऐकतो, वाचतो, पहातो त्याची जोडी आपल्याला ज्ञात असलेल्या गोष्टीशी लावून लक्षात ठेवणे, याचा उपयोग आपल्याला वक्तृत्व करताना उदाहरणे देण्यासाठी होत असतो.

आणि हो ! सगळ्यात महत्त्वाचे, आपण काय बोलावे यापेक्षाही आपण काय बोलू नये याचे भान सर्वात जास्त महत्त्वाचे, नाहीतर वक्तृत्वाच्या ओघात वाहवत जाऊन धरणापर्यंत बोलून जातो आणि नसत्या अडचणीत सापडतो.

आपले वक्तव्य लोकांनी मन एकाग्र करून ऐकावे असे सर्वांना वाटत असते. तर त्यासाठी लोकांना, लोकांच्या मनाला धरून ठेवण्याची कला अवगत असली पाहिजे. त्यात काय असते तर एखादी गोष्ट आपल्या संभाषणामध्ये यावी आणि त्यावर एखादा प्रश्न मधूनच विचारावा की जेणेकरून लोक आपल्याला मन लावून ऐकतील.

वक्त म्हणजे वेळ, प्रत्येक क्षणाच भान ठेवा.
शब्द म्हणजे मंत्र, प्रत्येक शब्दात जिव ओता.
सर्वात महत्त्वाच जीवनात नकलीपणा कटाक्ष पणे टाळा.
नाही तर ईदुरीकरला जबरदस्ती मुख्यमंत्री करायला काही हरकत? ते त्याच्या जागी ठीक आहे.

जास्त बोलुन काम बिघडते, ओम शांती बरी आहे, पण मग शांत राहून वक्तृत्वस्पर्धा कधी होणार? त्यामुळे बोलत राहा, हसत राहा. मन कायम मोकळे ठेवले की वक्तृत्व अथवा संभाषण करताना दबाव येत नाही.
नमोस्तुते!

नक्की वाचा – Samajrhun In Marathi

निष्कर्ष

आज आपण वक्तृत्व स्पर्धेबद्दल म्हणजेच Vaktrutva spardha in marathi बद्दल अधिक माहिती बघितली

Leave a Comment