वर्तमानपत्रे बंद झाली तर…मराठी निबंध Vartman Patra Band Zali Tar Essay In Marathi

Vartman Patra Band Zali Tar Essay In Marathi आजच्या या लेखात वर्तमान पत्र बंद झाली तर या विषयावर लहान व मोठे मराठी निबंध देण्यात आले आहेत. हे निबंध शालेय विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त आहेत.

Vartman Patra Band Zali Tar Essay In Marathi

वर्तमानपत्रे बंद झाली तर…मराठी निबंध Vartman Patra Band Zali Tar Essay In Marathi

आपल्या दैनंदिन जीवनातील महत्वाचा भाग म्हणजे वर्तमानपत्र. ज्याच्या नावाचा शब्दशः अर्थ आहे वर्तमान बद्दल माहिती देणार पत्र, मराठी भाषेत सुरू केलेल्या पहिल्या वर्तमान पत्राचे नाव दर्पण होते.

जगभरातील घडामोडींची माहिती देणारे, जगभरात चालणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीं सांगणारे वर्तमानपत्र..! परंतु तुम्ही कधी विचार केलाय कि, जर ही वर्तमानपत्र बंद पडली तर…? काय होईल बर… खर म्हणजे तर सध्याचा या डिजिटल जगात आपण सर्वजण एवढे मोबाईल ,फोन , लॅपटॉप, कॉम्प्युटर इत्यादि मध्ये रमले आहोत की आपल्यातील काही लोकांना त्या वृत्तपत्राची आठवण देखील येत नाही.

परंतु एकेकाळी याच माध्यमातून आपणास सर्व आर्थिक, सामाजिक, राजकीय तसेच जागतिक घडामोडींची माहिती मिळायची. आणि आजही काही लोक ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्या तर दिवसाची सुरुवात वर्तमानपत्रानेच होत असते. आणि जर ही वृतपत्रच बंद पडली तर त्या लोकांच्या दिवसाची पूर्ण रूप रेखाच बदलून जाईल…..

वर्तमानपत्र बंद झाली तर आपण सर्वांना चालू घडामोडी साठी फक्त आणि फक्त टीव्ही व इंटरनेट या दोनच गोष्टींवर अवलंबून राहावं लागेल. परंतु आर्थिकदृष्ट्या टीव्ही व इंटरनेटपेक्षा वर्तमानपत्राचा वापर हा फायदेशीर आहे.

त्यामुळे सर्वच दृष्टिकोनातून बघायला गेले तर वर्तमानपत्र बंद होणे म्हणजे आपल्या सर्वांसाठी खूप नुकसानदायक आहे.

काही लोक असे आहेत ज्यांना वर्तमान पत्रात दररोज राशी भविष्य वाचण्याची सवय असते. आपले राशी भविष्य वाचूनच ते दिवसाची सुरुवात करतात. आशा लोकांना तर रोज काही तरी चुकल्या चुकल्यासारखं वाटेल.

जी लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करणे पसंत करतात त्यांना रोजच्या शेअर च्या किमती कश्या कळतील? आणि जर गुंतवणूकदार गुंतवणूक नाही करणार तर आपल्या देशाचा विकास कसा होणार ? वृत्तपत्र बंदीमुळे इत्यादि अनेक गोष्टींवर परिणाम होईल जो आपल्या व आपल्या येणाऱ्या पिढीला नक्कीच त्रासदायक ठरेल.

जगाच्या कुठल्या कोपऱ्यात युद्ध चालू आहे, कुठल्या भागात नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत, देशात कुठे कोणत्या पक्ष्याची सत्ता चालली आहे या सर्वां पासून आपण आज्ञान राहिलो असतो.वर्तमान पत्रांमध्ये आपल्याला घरी बसल्या जगातील सर्व ठिकाणांची माहिती आपल्या पर्यंत पोहोचते. कोणता कार्यक्रम कुठे होणार आहे, याविषयी आपल्याला वर्तमान पत्रांशिवाय हे कसे कळले असते ?

आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाची असणारी ही वर्तमान पत्रे बंद झाली तर त्याचा परिणाम आपल्या वरच होईल. वर्तमान पत्र बंद झाल्याने ज्या लोकांचा उदरनिर्वाह या वर्तमान पत्रांवर चालत आहे ते लोक निकामी होतील. त्यांना पोट भरविण्यासाठी दुसरा व्यवसाय शोधावा लागेल.

त्या घरोघरी जाऊन वर्तमान पत्र वाटप करणाऱ्या व्यक्ती पासून ते वर्तमान तयार करणाऱ्या कंपनीतल्या पत्रकार, संपादक, लेखक इत्यादी सर्वांचा समावेश यामध्ये होतो.

ज्ञान आणि विज्ञानाची सांगड घालणाऱ्या या जगात आज वर्तमानपत्रांना महत्त्वाचे स्थान आहे. वर्तमानपत्रे जगातील प्रत्येक कोपऱ्याला एकमेकांशी जोडण्याचे काम करतात. आणि अशा या वर्तमान पत्रांच्या आरशात आपण क्षणा- क्षणात बदलत असलेल्या जगाचे प्रतिबिंब पाहतो.

म्हणून वर्तमान पत्रे आज सर्वसामान्यांची गरज बनली आहे.

त्यामुळे वर्तमान पत्र बंद झाल्याने खूप लोक बेरोजगार होतील त्यामुळे आपल्या देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल करेल. आणि याचाच परिणाम महागाई वाढीवर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. शाळेत जाणारी मुलं ज्यांना वर्तमानपत्र वाचल्यामुळे वाचनाचा छंद लागण्यास मदत होते ते कुठेतरी नाहीसा होईल.

मग जास्त वेळ टीव्ही आणि मोबाईल बघितले तर डोळ्यांचे आजार, कंबर दुखी यांसारखे आजारांना बळी जावे लागेल. तसेच वर्तमानपत्र आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर ठरते. पाच रुपयांत येणारे वर्तमानपत्र बंद झाले तर टीव्ही आणि मोबाईला महाग रिचार्ज करावा लागेल.

वृत्तमानपत्रे बंद झाली तर आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. थोडक्यात सांगायचे म्हणजे, जगभरातील घडामोडींची माहिती देणारे महत्त्वाचे साधन म्हणजे वर्तमानपत्र !

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment