वर्तमानपत्र बंद झाली तर मराठी निबंध | Vartmanpatra Band Zali Tar Essay In Marathi

Vartmanpatra Band Zali Tar Essay In Marathi आज रविवार सुट्टीचा दिवस !रविवार म्हटले की ,आईला खूप काम !नेहमीप्रमाणे आम्ही दोघं सकाळी उठलो व नेहमीप्रमाणे त्या वर्तमानपत्रावर आमची भांडणे सुरू झाली. का तर, वर्तमानपत्रात येणार्‍या बालमित्र या पुरवणी वरून ! तेवढ्यात आईचा आतून जोरात आवाज आला.

 Vartmanpatra Band Zali Tar Essay In Marathi

वर्तमानपत्र बंद झाली तर मराठी निबंध | Vartmanpatra Band Zali Tar Essay In Marathi

वर्तमानपत्र आहेत ना तीच बंद झाली पाहिजेत! म्हणजे ही भांडणं तरी होणार नाही. नंतर मी विचारात पडले की ,खरंच जर ही वर्तमानपत्रे बंद झाली तर काय होईल ? आजच्या काळात वर्तमानपत्रांची जागा मोबाइलने घेतली आहे. त्यामुळे जगात काय चाललय त्या बातम्या लगेच सगळ्यांना कळतात .

व्हाट्सअप वर फेसबुक या माध्यमांमुळे या बातम्या जगभर सगळीकडे पोहोचल्या जातात. त्यामुळे सकाळी उठून वर्तमानपत्रे वाचायची गरज वाटत नाही मग वर्तमानपत्र विकत कशाला घ्यायची ? खरंच ही वर्तमानपत्रे बंद झाली तर? काय होईल बरे! परंतु काही लोकांची सुरुवात ही वर्तमानपत्रांनीच होते .सकाळी चहा घेताना काही लोकांना पेपर वाचायची सवय असते. चहा घेताना पेपर वाचता नाही तर, त्यांना चहा घेतल्यासारखे वाटत नाही.

मोबाईल ,टीव्ही ही माध्यम आपल्याला विविध नवीन कार्यक्रम दाखवतात. विविध विषयांवर चर्चा, मुलाखती रोचक बातम्या, रोज पाहायला मिळतात. त्यामुळे आपण सगळे हे आनंदाने पाहतोच .त्यामुळे या माध्यमांनी वृत्तपत्राची जागा घेतली आहे हे खरे ! पण या माध्यमांसाठी ठराविक वेळ द्यावा लागतो.

मोबाईल ,संगणक, टीव्ही हे सर्व विजेवर चालणारे माध्यमे आहेत .त्यामुळे ही महागडी व खर्चिक आहेत. पावसाळ्यात कधीकधी पावसामुळे दोन दोन दिवस वीज पुरवठा खंडित होतो. तेव्हा या माध्यमांचा काय उपयोग, कारण ही सर्व माध्यमे विजेवर चालणारी आहेत. तसेच या माध्यमांचा खर्चही खूप आहे.

त्यामुळे ही माध्यमे वापरताना माणसाला आपल्या आर्थिक बजेटचा ही विचार करावा लागतो.मोबाईलचा रिचार्ज हा खूप महाग आहे. परंतु वर्तमानपत्रे हे कमी खर्चिक व वापरही सहज व सुलभ असतो .वर्तमानपत्रात इतर बातम्या प्रमाणेच नोकरीच्या जाहिराती, कोणाला नोकर पाहिजेत, वधू-वरांच्या अपेक्षा, कुठे काय मिळते, कुठे सेल लागला आहे, कोणत्या गोष्टीत डिस्काउंट आहे अशा अनेक जाहिरातींना वर्तमानपत्र व्यापून जाते.

तसेच वर्तमानपत्रात पंचांग म्हणजे कोणती तिथी, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त याबद्दल माहिती मिळते. तसेच आपल्याला आपल्या राशीचे भविष्य ही सांगितले जाते. सोन्या-चांदीचे भाव, लॉटरीचे निकाल ,पौंड – डॉलर यांच्या रुपयातील किमती याबाबतच्या बातम्या वृत्तपत्रात घरबसल्या मिळतात .

तसेच शेअर मार्केटची माहिती दिली जाते.  तसेच वेगवेगळ्या बँकेच्या जाहिराती, संस्थेच्या जाहिराती या वृत्तपत्रात छापल्या जातात. अशा अनेक प्रकारच्या रंग-बिरंगी आकर्षक जाहिराती वृत्तपत्रात झळकत असतात. आता जर ही वर्तमानपत्रे बंद झाली तर, आपल्याला ही माहिती कोठून मिळणार ! या सर्व गोष्टी सामान्य माणसापर्यंत कशा पोहोचणार!याचा ही विचार केला पाहिजे.

तसेच वृत्तपत्रात एक पुरवणी अशी असते की, जेथे शालेय विद्यार्थ्यांसाठी भरपूर माहिती दिलेली असते .त्याचा उपयोग शाळकरी मुलांसाठी भरपूर प्रमाणात होतो. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पुढील जीवनात कोणती शाखा निवडावी, कोणता अभ्यास करावा अशा करिअर विषयक मार्गदर्शन वृत्तपत्रात दिले जाते.

तसेच क्रीडा ही एक स्वतंत्र पुरवणी असते. त्यामुळे आपल्याला जगभरातील खेळाची माहिती मिळत असते. तसेच समाजात चालणाऱ्या कोणत्यातरी गोष्टीवरून वादळ उठत असते. लोकशाही राज्यात लोकांना आपली मते मांडण्यासाठी वृत्तपत्र हे एक उत्तम व्यासपीठ आहे.

वर्तमानपत्र हे लाखो लोकांच्या उदरनिर्वाहाचे एक साधनही आहे. बारा ते सोळा पानांचे हे वर्तमानपत्र लाखो लोकांचा उदरनिर्वाह करतात. भरपूर लोक हे वृत्तपत्रांच्या प्रेस मध्ये काम करत असतात. तसेच हजारो पत्रकार वर्तमानपत्रात बातम्या देण्यासाठी बातम्यांच्या शोधात असतात.

तसेच वर्तमानपत्रात कितीतरी लेखक लेख व स्तंभ लिहतात.  कथा, नाटक ,कविता इत्यादी पुस्तकेही रविवारच्या पुरवणीत प्रकाशित होत असतात. तसेच वर्तमानपत्रे विकून कितीतरी लोक आपले आपला उदरनिर्वाह करत असतात .म्हणजे या वर्तमानपत्रावर कितीतरी लोकांचा उदरनिर्वाह आहे.

जर हे वर्तमानपत्र बंद झाले तर लाखो लोक हे बेरोजगार होतील हेही खरे !अशी ही वर्तमानपत्रे समाज जीवनात चैतन्य निर्माण करतात. यशस्वी समाजाच्या नाड्या त्यांच्या हातात असतात.मग ती वर्तमानपत्रे बंद पडून कसे चालेल ! सध्याच्या वर्तमानपत्राचा दर्जा हा घसरत चालला आहे. मुख्यत्वे देशाबाहेरील व आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बातम्यांना कमी महत्त्व दिलेले दिसते तर अनावश्यक जाहिरातींना महत्त्व दिलेले दिसत आहे.  त्यामुळे सध्याच्या पिढीला जे महत्त्वाचे लेख व बातम्या उपयोगी आहेत त्या दिल्या पाहिजेत.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment