Vathlelya Vrukshache Aatmvrutta Marathi Nibandh नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे पाहणार आहोत वठलेल्या वृक्षाचे आत्मवृत्त वर मराठी निबंध. हा निबंध तुम्ही वठलेल्या वृक्षाचे मनोगत, वठलेल्या वृक्षाचे आत्मकथा आणि मी वृक्ष बोलतोय या विषयावर सुद्धा वापरू शकता.
वठलेल्या वृक्षाचे आत्मवृत्त मराठी निबंध Vathlelya Vrukshache Aatmvrutta
Nibandh
नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे एक सत्य आहे. आम्ही एकदा आमच्या गावाला गेलो होतो तेथे घराच्या अंगणात एक मोठे वडाचे झाड आहे. आता तुम्हाला हे सांगितल्यावर नवल वाटेल की ते झाड माझ्याशी बोलले.
आता मी तुम्हाला त्या झाडाचे मनोगत सांगणार आहे .आम्ही खूप वर्षांपासून शहरात राहत होतो. एकदा माझ्या मनात आले की गावाला जे आपले जे पडीक घर आहे ते पाडावे व तेथे काहीतरी नवीन करावे.
या कल्पनेने आम्ही गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर आम्ही ते जुने घर पडायचे ठरवले. पण ते घर पाडण्या आधी घराच्या अंगणात एक मोठे वडाचे झाड होते.ते झाड खूप विस्तारलेले व खूप जुने आहे. त्यामुळे घर पडण्याआधी वडाचे झाड पाडणे महत्त्वाचे होते. त्यानुसार आम्ही प्रथम झाड पडायचा निर्णय घेतला व तशी तयारीही केली .
आम्ही झाड पाडण्यास सुरुवात करणार तेवढ्यात आम्हाला एक आवाज ऐकू आला .अरे थांब! हे काय करतोस, असा निर्दयी होऊ नकोस! मला पाडू नकोस! माझे हात तोडू नको ! मी इकडे तिकडे पाहीले पण तेथे कोणीच नव्हते नंतर मला उमजले की आवाज या वडाच्या झाडातून येतोय .नंतर मी त्या झाड पाडायला आलेल्या लोकांना थांबवले व झाडाच्या जवळ गेलो.
तेव्हा त्या झाडाने मला आपुलकीने आवाज दिला. बाळा! नंतर ते झाड माझ्याशी बोलू लागले. ते झाड मला म्हणाले ,मला तुझ्या घरच्या अंगणातून बाहेर काढू नकोस! मला कापू नकोस !अरे तुझ्या आजोबांनी मला पाणी घालून एवढे मोठे केले आहे .मला कोणी रोपाच्या स्वरूपात लावले नाही या अंगणात आपोआपच मी जमिनीतून जन्म घेऊन आलो. नंतर तुझे आजोबा मला रोज खत,पाणी घालत असे.जसे तुझे आजोबा मोठे झाले तसा मीही मोठा होत गेलो
.तुझ्या आजोबाचे आणि माझे एक वेगळेच नाते निर्माण झाले होते. तुझे आजोबा बाहेरून दमून आले की माझ्या झाडाच्या सावलीत बसायचे व अंगणात माझ्या सावलीत पडून तासनतास माझ्या फांद्यांवर बसणारे पक्षी, त्यांचा किलबिलाट, माझ्या मोठ्या मोठ्या पारंब्या न्याहाळत बसायचे.
माझ्या सावलीखाली त्यांना खूप हायसं वाटायचं ,शांत वाटायचे. अरे तुझे बाबा, सर्व शेजारी पाजाऱ्यांची मुले ,अरे तुम्ही सुद्धा माझ्या फांद्यांना झोका बांधून खेळले आहात. कधी कधी माझ्या पारंब्या चा झोका केला आहे. आठवते का! कितीही असले तरी माझ्या या विस्तारलेल्या फांद्यांमुळे मी तुम्हाला कधी ऊन लागून दिले नाही. सतत सावली दिली.
अरे एवढ्या उन्हात तुम्ही सर्वजण माझ्या सावलीत किती खेळ खेळले आठवते का ! आज मी तुझ्या आजोबांपासून ते तुझ्यापर्यंत तुम्हाला मोठे होताना पाहिले आहे .तुमच्या प्रत्येक आनंदात दुःखात मी सहभागी झालो आहे .पण आज कामानिमित्त तुम्ही सर्वजण शहरात निघून गेलात. मी एकटा झालो पण तुम्ही नसले तरी अजूनही येथून येणार्या जाणार्या लोकांना मी सावली देतो.
लोक खूप दमले की माझ्या सावलीत बसतात .अजूनही मुले माझ्या सावलीखाली खेळतात .माझ्या पारंब्याचा झोका म्हणून खेळतात. तुम्ही इथे नसलात तरी मी दुसऱ्यांना उपयोगी येत आहे. परंतु आज तू इथे आलास आणि माझे अस्तित्वच नष्ट करायला लागला. अरे असं करू नकोस! माझे अस्तित्व नष्ट करू नकोस! असे म्हणून ते झाड शांत झाले.
मी मीही थोडा वेळ थक्क झालो. त्या झाडाचे बोलणे ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी आले. मला सर्व काही डोळ्यांसमोर दिसत होते. शेवटी मी तिथून उठलो व झाडांकडे पाहात उभा राहिलो व एक निर्णय घेतला कि काही झाले तरी हे झाड पाडायचे नाही .मी झाडाला म्हणालो, काही झाले तरी मी तुम्हाला काही इजा करणार नाही. असे म्हणून मी त्या झाडाला जोरात मिठी मारली.
पण ती मिठी इतकी आपुलकीची व प्रेमाची वाटली की हे शब्दात सांगता येणार नाही. तुम्हाला माहित आहे का, मी ते झाड पाडले नाही .फक्त जुने घर पाडून तेथे एक नवीन घर बांधले. सुट्टी लागली की, आम्ही सुट्ट्यांमध्ये गावाला जातो व तासनतास त्या झाडाखाली सावलीत बसून त्या झाडाला न्याहाळत राहतो .मला माझी चूक कळली, पण तुम्ही या चुका करू नका. कारण आपल्या प्रगतीसाठी आपण निर्दयीपणे झाडे तोडतो पण त्याचे होणारे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील हे खरे!
हे सुद्धा अवश्य वाचा :-
- हत्ती विषयी संपूर्ण माहिती
- वाघाची संपूर्ण माहिती
- बैलाची संपूर्ण माहिती
- उंटाची संपूर्ण माहिती
- म्हैस बद्दल संपूर्ण माहिती
FAQ
वटवृक्षाची दोन वैशिष्ट्ये कोणती?
वडाच्या झाडाची दोन वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या वाढीची पद्धत आणि तापत्या सूर्यापासून मिळणारी सावली .
वटवृक्षाची वैशिष्ट्ये काय आहेत?
वटवृक्ष 30 मीटर (100 फूट) पर्यंत उंचीवर पोहोचतो आणि पार्श्वभूमी अनिश्चित काळासाठी पसरतो . त्याच्या फांद्यांपासून विकसित होणारी हवाई मुळे खाली येतात आणि नवीन खोड बनण्यासाठी जमिनीत मुळे येतात.
वटवृक्ष वाढण्यास किती वेळ लागतो?
वटवृक्षाची छाटणी, पर्यावरणीय परिस्थिती, पाण्याची उपलब्धता इत्यादी अनेक घटकांवर आधारित वटवृक्ष वाढतो. त्याच्या फांद्या झाडाची मुळं तयार होण्यासाठी बराच वेळ घेतात. ही वनस्पती वाढण्यास सुमारे एक वर्ष लागते. त्यामुळे बोन्साय पिकवण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागतात असे म्हणता येईल.
वडाच्या झाडाची काळजी कशी घ्याल?
वसंत ऋतु, उन्हाळा आणि शरद ऋतूमध्ये दर आठवड्याला पाणी दिले जाऊ शकते. मुळे कुजण्यापासून रोखण्यासाठी जमिनीत जास्त पाणी साचणे टाळा. वटवृक्ष उन्हाळ्यात जोमाने वाढतो. तापमान जास्त असल्यास आणि पाण्याचे लवकर बाष्पीभवन होत असल्यास, पाणी पिण्याची वारंवारता आणि प्रमाण योग्यरित्या वाढवले पाहिजे.