व्हेज कटलेट रेसिपी मराठी Veg Cutlet Recipe in Marathi आज तुमच्याकरता खास व्हेज कटलेट रेसिपी घेऊन आलो आहोत. मुलांना नेहमीच बाहेरची खाण्याची आवड असते. बाहेर मिळणारे चटपटीत रेसिपीज आपण आपल्या घरी बनवून जर मुलांना खायला दिले तर ते बाहेर खायला जाणार नाहीत. तुम्ही मुलांकरिता व्हेज कटलेट्स बनवून बघा घरातील लहान पासून मोठ्या मंडळींपर्यंत ही रेसिपी नक्कीच आवडेल व तुमच्यावर ती खुश झाल्याशिवाय राहणार नाही. व्हेज कटलेट करण्याकरिता आपल्या घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. त्यामुळे मोठ्या साधनसामग्रीचा देखील येथे अभाव पडणार नाही.
तर चला मग जाणून घेऊया पौष्टिक अशा वेज कटलेट रेसिपी विषयी माहिती.
व्हेज कटलेट रेसिपी मराठी Veg Cutlet Recipe in Marathi
रेसिपी प्रकार :
व्हेज कटलेट ही रेसिपी बनविण्याकरता विविध भाज्यांचा उपयोग केला जातो. जसे की गाजर, टोमॅटो, आलु, कांदा आणि सर्वच घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक व पोषक आहेत. तुम्ही बनवलेला हा नाश्ता सर्वांनाच आवडेल. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी झटपट व चटपटीला असा हा सकाळचा नाश्ता कमी वेळात करू शकता. कटलेट बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. व्हेज कटलेट, ओट्स कटलेट, पनीर कटलेट, ब्रेड कटलेट, आलू केला कटलेट, मटर कटलेट, पत्ता गोबी कटलेट, चिकन कटलेट, बीट कटलेट अशा वेगवेगळ्या चवींमध्ये आपण कटलेट बनवू शकतो.
तर आज आपण येथे व्हेज कटलेट रेसिपी बघणार आहोत.
आपण किती व्यक्तींकरिता बनवणार आहोत ?
रेसिपी आपण 4 व्यक्ती करता बनवणार आहोत.
पूर्वतयारीकरिता लागणारा वेळ :
व्हेज कटलेट तयार करण्यासाठी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. त्याकरिता आपल्याला 15 मिनिटे एवढा वेळ लागतो.
कुकिंग टाईम :
व्हेज कटलेट कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
व्हेज कटलेट रेसिपी पूर्ण बनवण्यासाठी एकूण वेळ 35 मिनिटे एवढा लागतो.
व्हेज कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
1) अर्धी वाटी बारीक चिरलेली कोबी
2) अर्धी वाटी मटारचे दाणे
3) पाव वाटी बारीक चिरलेले फरसबी
4) पाव वाटी गाजर बिटचे तुकडे
5) एक वाटी बारीक चिरलेला कांदा
6) दोन उकडलेले बटाटे
7) दोन चमचे आलं लसूण पेस्ट
8) दोन चमचे मिरची पेस्ट
9) अर्धा चमचा लाल तिखट
10) पाव चमचा हळद
11) एक चमचा जिरे धने पावडर
12) एक चमचा बडीशोप पूड
13) चवीनुसार मीठ
14) तेल
15) बारीक रवा
पाककृती :
- सर्वप्रथम आपल्याला फ्लावर, मटरचे दाणे, फरसबी गाजर, बीट कुकरमध्ये घालून छान शिजवून घ्यायचे आहेत. बटाटे देखील उकडून घ्यायचे आहेत.
- नंतर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून त्यामध्ये कांदा तपकिरी रंग होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे.
- त्यामध्ये आलं लसूण पेस्ट तसेच मिरची पेस्ट घालून घ्यायची आहे.
- नंतर त्या शिजवलेल्या सगळ्या भाज्या आणि बटाटे कुस्करून घ्यायच्या आहेत.
- नंतर त्यामध्ये तिखट हळद धने जिरे पावडर बडीशेप पावडर घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्या.
- नंतर थोडे परतून झाल्यावर सगळे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे हवे त्या आकारात कटलेट करून घ्यायचे आहे.
- नंतर हे कटलेट बारीक रव्यामध्ये गोडवावेत आणि तव्यावर हलके फ्राय करून घ्यावेत.
- अशाप्रकारे कमी तेलामध्ये चविष्ट व्हेज कटलेट तयार आहे.
- व्हेज कटलेट एका डिशमध्ये घेऊन त्यासोबत हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघावा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
पोषक घटक :
व्हेज कटलेट तयार करताना आपण त्यामध्ये गाजर, कोबी, कांदा, बिट अशा अनेक प्रकारचे फळभाजी वापरली जाते तसेच रवा, आलू, मसाले वापरले जातात. जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये प्रोटीन फायबर कॅल्शियम फॉस्फर, सोडियम, व्हिटॅमिन्स आणि इतर पोषक घटक असतात. व्हेज कटलेटमध्ये विटामिन ए, व्हिटॅमिन के, बायोटीन, व्हिटॅमिन बी 6 इत्यादी पौष्टिक घटक असतात.
फायदे :
व्हेज कटलेट आपल्या शरीरासाठी पोषक डिश आहे. ज्यामुळे आपल्या शरीराला प्रथिन मिळतात व ऊर्जा निर्माण होते.
व्हेज कटलेट मधील फायबर मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपले अन्नपचन व्यवस्थित होते. वजन नियंत्रित राहते.
त्यातील कॅल्शियमच्या प्रमाणामुळे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात.
व्हेज कटलेट नाश्ता मध्ये खाल्ल्यामुळे आपल्याला पोषक घटक तर मिळतात व पोट भरल्यासारखे वाटते. दिवसभर काम करण्याचा उत्साह राहतो.
तोटे :
व्हेज कटलेट जास्त प्रमाणात खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे पोटदुखी व पोट फुगणे असा त्रास आपल्याला होऊ शकतो.
व्हेज कटलेट नाश्त्यामध्ये प्रमाणातच खाल्ले पाहिजे.
अन्यथा त्यापासून आपल्याला हानी होऊ शकते.
तर मित्रांनो, तुम्हाला व्हेज कटलेट ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
No schema found.