व्हेज कोल्हापुरी रेसिपी मराठी Veg Kolhapuri Recipe in Marathi आपल्याला रोजच्या जेवणामध्ये विविध पदार्थ खायला मिळाले तर किती आनंद वाटेल, दररोज कंटाळवाण्या भाज्यांचा जर कंटाळा आला असेल तर मसालेदार चटपटी अशा रेसिपी विषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जी तुम्ही घरच्या घरी सहज बनवू शकता आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेऊ शकता. तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास व्हेज कोल्हापुरी रेसिपी. जी बनवायला अगदी सोपी परंतु चवीला रेस्टॉरंट पेक्षा कमी नाही. एखाद्या हॉटेलमधील जशी मसालेदार चटपटी भाजी असते, त्याच प्रकारची ही मसालेदार भाजी आता तुम्ही घरीच बनवू शकता. तर चला मग जाणून घेऊया या रेसिपी विषयी माहिती.
व्हेज कोल्हापुरी रेसिपी मराठी Veg Kolhapuri Recipe in Marathi
ही रेसिपी किती जणांकरिता आहे ?
ही रेसिपी आपण 6 जणांंकरता करणार आहोत.
पूर्वतयारी करता लागणारा वेळ :
पूर्वतयारी करताना लागणारा वेळ एकूण 20 मिनिटे एवढा आहे.
कुकिंग टाईम :
व्हेज कोल्हापुरी रेसिपी कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.
टोटल टाईम :
व्हेज कोल्हापुरी रेसिपी साठी एकूण टाईम 40 मिनिटे एवढा लागतो.
रेसिपी प्रकार :
व्हेज कोल्हापुरी रेसिपी ही एक मराठी रेसिपी आहे ज्यामध्ये अनेक भाज्या मसालेदार ग्रेव्हीमध्ये शिजवल्या जातात हे केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात देखील प्रसिद्ध आहे. कोल्हापुरी रेसिपी खूपच चविष्ट व प्रसिद्ध आहेत. व्हेज कोल्हापुरी रेसिपी विषयी बोलायचे झाले तर, व्हेज कोल्हापुरी रेसिपी बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. ज्या प्रकारे व्हेज कुर्मा, छोले भटूरे, काजू करी मसाला, पनीर टिक्का मसाला याच पद्धतीने मध्ये ती रेसिपी बनवली जाते. कोल्हापुरी तडका म्हटलं की थोडी तिखटपणा आणि चटकदारपणा त्या भाजीला येतोच. तर चला मग जाणून घेऊया व्हेज कोल्हापुरी रेसिपी बनवण्यासाठी लागणारी सामग्री.
सामग्री :
1) दोन टोमॅटो बारीक चिरलेले
2) दोन कांदे बारीक चिरलेले
3) अर्धी वाटी गाजराचे बारीक तुकडे
4) पाव वाटी फरसबीचे तुकडे
5) एक वाटी बटाट्याचे मोठे तुकडे
6) अर्धी वाटी हिरवे वाटाणे
7) एक वाटी फ्लॉवरचे मध्यम तुकडे
8) दोन चमचे आले-लसूण पेस्ट
9) वेलची पावडर चिमूटभर
10) लवंग पावडर चिमूटभर
11) दालचिनी पावडर चिमूटभर
12) जायफळ पावडर चिमूटभर.
13) अर्धा चमचा बडीशोप
14) अर्धा चमचा हळद
15) दोन चमचे लाल तिखट
16) दोन चमचे कोल्हापुरी मसाला
17) चार चमचे तेल
18) जिरे पाव चमचा
19) मीठ चवीनुसार
व्हेज कोल्हापुरी रेसिपी बनवण्याची पाककृती :
- सर्वप्रथम एक कढाई गॅसवर ठेवा त्यामध्ये तेल घाला
- तेल गरम झाले की आले लसूण पेस्ट परतून घ्या. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.
- नंतर त्यामध्ये लाल तिखट आणि टोमॅटो घाला. नंतर थोडे मीठ घालावे सर्व मसाले एकजीव करून चांगले परतून घ्यावे नंतर मसाला थंड होऊ द्यावा.
- हा मसाला नंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यावा.
- कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये जिरे हळद गरम करून घ्यावे. नंतर बटाटे, वटाणे, गाजर, फ्लॉवर व फरसबी टाकावी. नंतर त्यामध्ये थोडं पाणी घालून ते शिजवून घ्यावे.
- शिवल्यानंतर त्यामध्ये आधीचा टोमॅटो कांदा मसाला टाकून घ्यावा व हे मिश्रण चांगले ढवळून घ्यावे.
- मिश्रणाला थोडी उकळी आली की त्यामध्ये चिमूटभर वेलची पावडर लावून पावडर जायफळ पावडर आणि बडीशेप टाकावी. आता हे सर्व मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्या व त्यामध्ये चवीपुरते मीठ टाका.
- सर्व पदार्थ शिजले का ते पाहावे व नंतर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिटं मिश्रणातली वाफ काढून घ्यावे.
- आता गरमागरम व्हेज कोल्हापुरी रेसिपी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही भाकरी, पोळी किंवा चपाती बरोबर खाऊ शकता.
ही रेसिपी तुम्ही घरी बनवून पहा व कशी वाटली ते कामाला कमेंट मध्ये सांगा.
पोषक घटक :
व्हेज कोल्हापुरी रेसिपी मध्ये कॅलरीज, प्रथिने, कार्बोहायड्रेट, फायबर, कोलेस्ट्रॉल यासारखे आवश्यक घटक असतात. ज्यामुळे आपल्या शरीराचे हाडे मजबूत होतात. तसेच या रेसिपीमध्ये वापरण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर खनिजे असतात. तसेच सूक्ष्म पोषक घटकांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे त्या रेसिपीची लज्जत वाढते व ही रेसिपी स्वादिष्ट होते.
फायदे :
व्हेज कोल्हापुरी रेसिपी मध्ये वापरण्यात येणारे मसाले आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.
तसेच त्यामध्ये असणाऱ्या विविध फळभाज्यांचे मिश्रण हे देखील आपल्या शरीराला आवश्यक असते.
त्यातून वेगवेगळे प्रकारचे विटामिन्स, प्रोटीन, फायबर आपल्या शरीराला मिळत असते त्यामुळे आपले आरोग्य ठणठणीत राहते.
तसेच आपल्या शरीरातील रक्तदाबाची पातळी नियंत्रित करण्यासाठी देखील उपयोग केला जातो.
तोटे :
मसालेदार रेसिपी आपल्या शरीरासाठी जेवढी आवश्यक आहे, तेवढीच ती घातकही आहे. त्यामुळे या रेसिपीचे जेवण नियमित न घेता कधी कधीच घ्यावे.
या मसालेदार भाजीचे नियमित सेवन केल्याने मूळव्याध, ऍसिडिटी, पोटदुखी यांसारखे आजार उद्भवू शकतात.
तर मित्रांनो, तुम्हाला व्हेज कोल्हापुरी रेसिपी कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.