व्हेजिटेबल मोमोज रेसिपी मराठी vegetable momos Recipe in Marathi

व्हेजिटेबल मोमोज रेसिपी मराठी vegetable momos Recipe in Marathi  बऱ्याचदा आपल्याला काही वेगळं करून खाण्याची इच्छा होते, अशा वेळेस काय करून खावे ते आपल्याला कळत नाही. आपण मेनू लिस्ट बघितली तर आपल्याला त्यामध्ये मोमोज हे रेसिपी दिसताच मोमोज खावेसे वाटतात. परंतु बाहेर जाऊन मोमोज खाण्यापेक्षा आपण जर आपल्या घरामध्ये स्वतःच्या हाताने जर मोमोज ही रेसिपी बनवून खाल्ली तर त्याची मजाच वेगळी येईल. आपल्याला वाटते मोमोज बनवीणे खूपच कठीण आहे; परंतु तसे नाही.
अतिशय सोप्या पद्धतीने आम्ही तुमच्या करिता खास मोमोज रेसिपी घेऊन आलो आहोत. अगदी बाहेर मिळणाऱ्या मोमोज सारखी चविष्ट व चटपटीत रेसिपी आहे, तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.

 vegetable momos

व्हेजिटेबल मोमोज रेसिपी मराठी vegetable momos Recipe in Marathi

रेसिपी प्रकार :

मोमोज ही रेसिपी एक चायनीज स्ट्रीट फूड आहे. जी भारतात लोकप्रिय झाली असून लहान पासून मोठे लोकही आवडीने खातात. भारतामध्ये त्याची बरेच स्टॉल आहेत. मोमोज बनवण्याच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत. तसेच या रेसिपीचे प्रकारही बरेच आहेत. आज आपण येथे व्हेजिटेबल मेमोज रेसिपी बघणार आहोत. त्याच्या उत्कृष्ट चवीमुळे मोमोज हे भारतात सर्वोत्तम स्ट्रीट फूड पैकी एक आहे. मोमोज बनवण्यासाठी तेलही खूपच कमी लागते कारण ते वापरले जातात. मोमोज पचण्यासाठी देखील पौष्टिक असतात.

मोमोजचे अनेक प्रकार आहेत, त्यामधील पनीर मोमोज, चीज मोमोज, व्हेजिटेबल मोमोज, सूप मोमोज, सोया मोमोज, चिकन मोमोज, बटर चिकन मोमोज, चॉकलेट मोमोज, अफगाणी मोमोज इ आपण या सर्व प्रकारांमध्ये मोमोजची रेसिपी तयार करू शकतो. सर्वप्रथम मोमोज वाफवले जातात. व नंतर तळले जातात. मोमोजणी तडले नाही तरीही चालतात. कारण ते ऑलरेडी शिजलेलेच असतात. चला मग व्हेजिटेबल मोमोजसाठी लागणारे साहित्य व पाककृती बघूया.

मोमोज किती व्यक्तींकरता बनवणार आहोत?
ही रेसिपी आपण 5 व्यक्तींकरता बनवणार आहोत.

पूर्वतयारीकरता लागणारा वेळ :

मोमोज ही रेसिपी तयार करण्याकरता आपल्याला पूर्वतयारी करावी लागते पूर्ण तयारी करता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

कुकिंग टाईम :

मोमोज कुकिंग करण्याकरता आपल्याला 20 मिनिटे एवढा वेळ लागतो.

टोटल टाईम :

रेसिपी पूर्ण तयार करण्याकरिता आपल्याला एकूण 40 मिनिटे एवढा वेळ लागतो.

साहित्य :

1) दोन वाटी मैदा
2) एक कांदा बारीक चिरलेला
3) एक चमचा लसूण पेस्ट
4) अर्धा किलो कोबी बारीक
5) अर्धी वाटी पनीर किसलेले
6) एक चमचा तेल स्टफिंग करिता
7) एक चमचा काळी मिरी पावडर
8) मीठ चवीनुसार
9) दोन चमचे बारीक चिरलेला कोथिंबीर
10) हिरवी मिरची बारीक चिरलेली

मोमोज बनवण्याची पाककृती :

  • सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मैदा टाकून त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि पाणी घालून मळून घ्या. हे स्वीट सेट होण्याकरता झाकण ठेवून बाजूला ठेवा.
  • आता मोमोजचे स्टफिंग बनवण्यासाठी एका भांड्यात किसलेली कोबी, पनीर, कांदा, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर व घालून अर्धा तास तसेच ठेवून द्यायचे आहे असे केल्याने भोगी नरम होते.
  • आता मैद्याची छोटे छोटे गोळे करून कोरड्या मैद्यात गुंडाळून छोट्या पातळ पोरांमध्ये लाटून घ्यायचे आहेत.
  • नंतर मोमोजचे स्टफिंग पुरीच्या मध्यभागी ठेवा आणि आकार देताना बंद करा. सर्व मोमोज अशाच प्रकारे बंद करून घ्यायचे आहेत.
  • आता ते वाफवण्याकरिता एका भांड्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरून गॅसवरती गरम करून घ्या.
  • मोमोज वाफेचे भांडे घ्या, जेवढे मोमोज बसतील तेवढे मोमोज त्या भांड्यामध्ये ठेवा. व त्याची वाफ जाणार नाही. याची खात्री करून दहा मिनिटे मंद आचेवर वाफवून घ्या. अशाप्रकारे सर्वच मोमोज वाफवून घ्या.
  • दहा मिनिटानंतर मोमोज काढून गरमागरम व्हेज मोमोज लाल मिरची चटणी, मेयोनेजझ किंवा टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही सर्व्ह करू शकता.

पोषक घटक :

मोमोज मध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांवर त्यातील पोषक तत्व अवलंबून असतात जसे आपण व्हेजिटेबल मोमोज तयार केले आहेत तर यामध्ये कॅल्शियम, फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, विटामिन, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात आढळतात. मात्र मैदा हा शरीरासाठी घातक आहे. आपण तांदुळाच्या पिठापासून देखील मोमोज तयार करू शकता.

फायदे :

खाण्याचे फायदे म्हणजे त्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या व्हेजिटेबलमध्ये असणारे सर्वच घटक आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात.

जसे आपण कोबीचा वापर येथे केलेला आहे, त्यामुळे आपल्याला लोह, पोटॅशियम त्यामधून मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे आपले रक्त शुद्ध ठेवण्यास मदत होते. कोबी हे शरीरातील रक्ताची कमतरता देखील दूर करते.

पोटॅशियम बीपी आणि हृदयाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी महत्त्वाचे आहे.

तसेच आपण यामध्ये कांदा मिक्स केलेला आहे कांदा हा शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतो. त्यामुळे आपले वजन देखील कमी होते.

मोमोज खाल्ल्यामुळे आपल्या शरीराला कॅलरीज मिळतात. व त्यापासून आपल्याला ऊर्जा देखील मिळते चरबी शरीरातील कमी होते.

तोटे :

मोमोज जास्त प्रमाणात खाणे हे आरोग्यासाठी अतिशय धोकादायक आहे. मोमोज हे मैद्यापासून तयार केले जातात.

मोमोज बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या जर आपण स्वच्छ धुतल्या नाही तर त्यामधील बॅक्टेरियाचा संसर्ग आपल्याला हानी पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्याला टायफाईड पोट दुखी आणि अन्नाची विषबाधा देखील होऊ शकते.

आपण जर बाहेरील स्टॉल वरील मोमोज खात असाल तर त्यामध्ये एजोडिकार्बोन आणि बेंजोइल पेरोक्साईड सारखे घटक मैद्यात मिक्स केली जातात जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय घातक असतात.

त्याचा परिणाम आपल्या स्वादुपिंडावर होतो हे घटक घातल्याशिवाय मोमोज मऊ होत नाहीत.

म्हणून मोमोज खाताना वरील खबरदारी आपण घेतली पाहिजे.

तर मित्रांनो, मोमोजणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा तसेच ही रेसिपी आपल्या घरी करून बघायला विसरू नका.

Leave a Comment