विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी | vidnyan shap ki vardan marathi nibandh

विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी | vidnyan shap ki vardan marathi nibandh

आजच्या या लेखामध्ये आपण विज्ञान शाप की वरदान (vidnyan shap ki vardan marathi nibandh) या विषयावर निबंध पाहणार आहोत.

आजचे विज्ञानाचे युग हे अनेक शोधांचे आणि चमत्कारांचे युग आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञानाने आज क्रांती केली आहे. विजेचा शोध विज्ञानाची एक खूप मोठी भरारी आहे. विजेमुळे आज आपलं जेवण बनत, पंखा फिरतो, प्रकाश मिळतो. अनेक कारखाने याच विजेच्या शक्तीमुळे चालतात. आपली जास्तीत जास्त कामे विजेमुळे अगदी लवकर पूर्ण होतात. 

एक काळ होता जेव्हा एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर तो सांगण्यासाठी काही वर्षे लागायची. परंतु विज्ञानाने ते अगदी सहज पूर्ण झाले आहे. एक काळ होता जेव्हा लोक भुकेने मरत होते. परंतु विज्ञानामुळे यामध्ये खूप प्रगती झाली आहे. एकेकाळी प्लेग मलेरिया डेंगू अशा आजारामुळे लोक मृत्युमुखी पडत होते. परंतु आजच्या काळात विज्ञानाने सर्व आजारावर नियंत्रण केले आहे. 

शैक्षणिक क्षेत्रात विज्ञानाची कमाल

विज्ञानामुळे माणूस सुखमय झाला आहे. आजच्या काळात विज्ञान मनुष्याच्या जीवनाबरोबर जोडले गेले आहे. विज्ञाना विना मनुष्याचे जीवन आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही. विज्ञानाने मनुष्याचे जीवन सुखमय करण्यासाठी अनेक शोध लावलेले आहेत. विज्ञानाच्या नवनवीन शोधांमुळे हे जग खूप छोट बनलं आहे.

रेल्वे, मोटार, जहाज, विमान यांच्यामुळे आज आपल्याला हजारो किलोमीटर यात्रा अगदी कमी कालावधीत करता येऊ शकते. आपल्याला नेहमी बातम्या सांगणारे वैज्ञानिक उपकरणे सुद्धा विज्ञानाची एक देण आहे. रेडिओ, टीव्ही यांच्या करामती तर आपल्या सर्वांना माहीतच आहेत. ई-मेल च्या मदतीने आपण काही मिनिटांमध्ये जगातील कोणत्याही व्यक्तीला संदेश पाठवू शकतो. 

शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये विज्ञानाने अनेक शोध लावले आहेत. जसे की इंटरनेट कॉम्प्युटर ही विज्ञानाची सर्वात मोठी देण आहे. आज छपाईयंत्रा मुळेच पुस्तके छापणे सुद्धा शक्य झाला आहे. छपाईयंत्र मुळेच क्रांती निर्माण झाली आहे त्यामुळेच घरोघरी लोकांना ज्ञान मिळू लागल आहे. 

विज्ञानाची प्रगती

विज्ञानाची प्रगती अगदी गरीब माणस पासून ते श्रीमंत माणसांपर्यंत पोहोचली आहे. एके काळी भाकरीच्या पिटासाठी खेड्यामध्ये भटकावे लागायचे परंतु आता विजेमुळे त्यांचे हे कष्ट खूप कमी झाले आहेत. विज्ञानामुळे आपल्याला हवामान आणि नैसर्गिक आपत्तींची माहिती मिळू लागली. त्यामुळे आपण याबद्दल जागरूक होऊ लागलो आहोत.

साक्षर भारत, समर्थ भारत | मराठी निबंध येथे वाचा

विज्ञानामुळे आपल्या देशभरातील घडामोडी अगदी काही सेकंदांमध्ये समजू लागल्या आहेत. आणि मोबाईल च्या शोधा मुळे तर माणूस अगदी जवळ आला आहे. विज्ञानाच्या शोधामुळे लोकांना अंधश्रदधेची खरी रुपी लोकांना कळू लागली. इंटरनेट मुळे लोका लोकांमधील अंतर खूप कमी झाले आहे. रेडिओ आणि टीव्ही मुळे आपल्या सर्वांचं खूप सार मनोरंजन होत. चित्रपट ही सुद्धा विज्ञानाची एक मोठी देन आपल्याला लाभलेली आहे. याचा उपयोग मनोरंजनाबरोबरच शिक्षणासाठी सुद्धा केला जात आहे.

दूरदर्शन मुळे आपण देश-विदेशातील दृश्य घरी बसून पाहू शकतो. व्हिडिओमुळे आपण आपल्याला जेव्हा वेळ असेल असेल तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम पाहू शकतो. मेडिकल क्षेत्रामध्ये सुद्धा विज्ञानाने चांगली प्रगती केली आहे. एकशे द्वारे आपण शरीराच्या आतील भाग पाहू शकतो. त्यामुळे आपल्या आजारावरील निदान लवकर होण्यास मदत होते.
 
विज्ञानामुळे आज अनेक भयंकर रोगांचे निदान करण्यास सोपे झाले आहे. विज्ञानामुळे शेतकऱ्यांसाठी उपयोगी असणारे अनेक ट्रॅक्टर्स आणि वेगवेगळी उपकरणे तयार करण्यात आली आहेत. त्यांचा वापर करून शेतकरी आपला वेळ आणि पैसा वाचवू शकतो. विज्ञानाचा मुख्य शोध म्हणजे छपाई. ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी यामुळे खूप मदत झाली. अन तसं पाहायला गेलं तर विज्ञान मानवासाठी एक वरदान सिद्ध झाला आहे. 

विज्ञान शाप की वरदान

जेथे विज्ञान आणि आपल्याला आराम देणाऱ्या सुविधा दिल्या, तिथेच विज्ञानाने अनेक संकटे सुद्धा उभी केली आहेत. त्यामुळे विश्व एका वेगळ्या वळणाकडे ओढले गेले. विज्ञानामुळे हायड्रोजन आणि परमाणुबॉम्बची निर्मिती झाली. आणि त्यामुळे आपण एका विनाशाकडे गेलो. युद्धा संबंधी शस्त्रास्त्रे विज्ञानामुळे तयार केली गेली यामुळे विज्ञानाला शाप असं म्हटलं जातं. यामुळे आपली संस्कृती धोक्यात आली आहे.

आजच्या काळात पूर्ण जग बॉम्ब आणि मिसाईल मुळे घाबरतं आणि या सर्वामुळे पर्यावरणाचे प्रदूषण सुद्धा वाढले आहे. आणि विज्ञानाच्या या शोधांमुळे पर्यावरणाच्या ओझोन थराला नुकसान पोहोचू लागल आहे. 
तसं पाहिलं तर विज्ञान एक वरदान आणि शाप असे दोन्ही सुद्धा म्हटले जात. विज्ञानाचा वापर आपण कसा करतो यावर विज्ञान शाप की वरदान हे ठरलं जातं. 

निष्कर्ष: 

मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण विज्ञान शाप की वरदान (Vidnyan Shap Ki Vardan Marathi Nibandh ) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा.

1 thought on “विज्ञान शाप की वरदान निबंध मराठी | vidnyan shap ki vardan marathi nibandh”

Leave a Comment