विजयदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती Vijaydurg Fort Information In Marathi

Vijaydurg Fort Information In Marathi विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो. हा एक कठीण रस्त्याचा किल्ला आहे, जो मुंबईच्या दक्षिणेला येतो आणि तेथून 225 किलोमीटर तर गोव्याच्या उत्तर दिशेला 150 किलोमीटर अंतरावर आहे. हा दुर्ग 17 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. या किल्ल्याला तीन तटबंदी असून त्यास चिखलती तटबंदी असे सुद्धा म्हणतात. या किल्ल्याच्या तीन बाजू पाण्याने वेढलेल्या असून या किल्ल्यामध्ये दोन भुयारी मार्ग आहेत.

Vijaydurg Fort Information In Marathi

विजयदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती Vijaydurg Fort Information In Marathi

एक भुयारी मार्ग पूर्वेकडे जातो तर दुसरा भुयारी मार्ग हा पश्चिमेकडे जातो. या किल्ल्याला प्राचीन इतिहास लाभलेला आहे. तसेच येथे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, येथील हवामान समरशीतोष्ण असते. हिवाळ्यामध्ये अनेक पर्यटक येथे भेटी देण्यासाठी येत असतात तसेच उन्हाळ्यामध्ये येथील तापमान उष्ण असते. येथे पावसाळ्यामध्ये भाताची शेती केली जाते.

विजयदुर्ग हा एक अजिंक्य किल्ला होता. कारण याच्या तिन्ही बाजूंनी पाणी आणि चिखलात होत्या. तसेच पूर्वीच्या काळी या किल्ल्यावर समोरून एक खाडी होती आणि त्यावर पूल बांधलेला होता, त्यामुळे तिन्ही बाजूने समुद्र आणि एका बाजूने खाडी असल्यामुळे या किल्ल्यावर हल्ला करणे खूप कठीण होते.

या किल्ल्याचे प्रवेशद्वार उत्तरे कडील बाजूला येते. हा किल्ला खूप प्राचीन किल्ला आहे कारण या किल्ल्याचे बांधकाम हे एकूण 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी केले होते. कारण या राजाचे कोकण प्रांतावर वर्चस्व होते व या किल्ल्यावर विजय नगरचे सम्राट बहामनी सुलतान आणि विजापूरच्या आदिलशहाने या किल्ल्यावर राज्य केलेले होते.

विजयदुर्ग या किल्ल्याचा इतिहास :

विजयदुर्ग या किल्ल्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. या किल्ल्याचे बांधकाम हे 1193 ते 1206 मध्ये राजा भोज यांनी केले होते. हा किल्ला पाच एकर क्षेत्रामध्ये वसलेला आहे. आणि परंतु आता किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे. पूर्वीच्या काळी याचे नाव घेरिया असे होते. त्यानंतर या किल्ल्यावर विजयनगरचे सम्राट तसेच बहामनी सुलतान व विजापूरच्या आदिलशहा यांनी राज्य केले.

16 फेब्रुवारी 1653 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर हल्ला करून हा किल्ला आदिलशहाकडून आपल्या ताब्यात घेतला आणि किल्ल्याला तटबंदी बांधली तसेच या किल्ल्याचे क्षेत्रफळ 17 एकर केले. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला तीन तटबंदीच्या भिंती बांधल्या आहेत. कारण या किल्ल्यावर कोणालाही हल्ला करता येणार नाही.

1756 पर्यंत हा किल्ला कान्होजी आंग्रे व त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे तसेच तुलाजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. त्यानंतर या किल्ल्यावर इंग्रज पिशवी यांनी मिळून हल्ला केला व कान्होजी आंग्रे यांच्या सैन्याचा त्यांनी पराभव केला व हा किल्ला त्यांच्या ताब्यात त्यांनी घेतला. त्यावेळी इंग्रज व पेशव्यांमध्ये एक करार झाला होता.

त्या करारामध्ये असे ठरले होते की, हा किल्ला पेशव्यांनी घ्यायचा पण करारामध्ये ठरल्याप्रमाणे तसेच झाले नाही व इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांकडून बाणकोट जिल्ह्यातील पेशव्यांच्या वर्चस्वाखाली असलेली सात गावे घेतली व पेशव्यांना विजयदुर्ग हा किल्ला देण्यात आला या किल्ल्यावर 1653 पासून 1818 पर्यंत मराठ्यांचे राज्य होते.

किल्ल्याची वैशिष्ट्ये :

या किल्ल्याची आर्किटेक्चरल वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात तसेच या किल्ल्यापासून गावातील राजवाडा हा धुळप घरापर्यंत 200 मीटर लांबीचा समुद्र खालील एक बोगदा आहे. महासागराच्या खाली आठ ते दहा मीटर खोलीच्या खोलीमध्ये बांधलेल्या समुद्राखालील भिंती पहायला मिळतात.

या भिंतीवर आक्रमण करणारी जहाजे बर्‍याचदा आदळल्यामुळे त्यांचा पाण्यामध्ये बुडून मृत्यू व्हायचा अशी किल्ल्याची रचना केलेली आहे.

विजयदुर्ग या किल्ल्यावर अनेक स्मारके असून ती आता भग्न अवस्थेमध्ये आहेत. जी मराठा साम्राज्याची वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती दर्शवितात. तेथे अन्न साठवणूक आणि न्यायालय सुद्धा आहे, जी आजही आपण पाहू शकतो.

विजयदुर्ग या किल्ल्यावर पाहण्यासारखे ठिकाणे :

गोमुखी दरवाजा : या किल्ल्यावर तुम्ही गोमुखी दरवाजा पाहू शकता हेच या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. या किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना आहे, दाराजवळ गेल्याशिवाय दिसत नाही.

हनुमान मंदिर : आपल्याला या किल्ल्यामध्ये जाताना सुरुवातीलाच एक मंदिर लागते. जय हनुमानाचे मंदिर आहे तसेच हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर बांधले होते. असे म्हणतात की, समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांची गुरु होते आणि समर्थ रामदास यांची हनुमानावर खूप मोठी भक्ती होती. त्यामुळे आपल्या शिवाजी राजांच्या काळातील किल्ल्यावर आपल्याला हनुमानाची मंदिरे पाहायला मिळतात.

ध्वज स्तंभ : खलबद खाण्यापासून थोड्या अंतरावर गेल्यानंतर आपल्याला ध्वज स्तंभ दिसतो. या स्तंभावर किल्ल्याचे वरचस्व आहे तसेच या ध्वजावर झेंडा फडकला जातो.

तिहेरी तटबंदी : समुद्रात जवळची तटबंदी म्हणजे फळकोट खुशकी दुसरी तटबंदी ही बुरुंजाच्या भोवती आणि तिसरी तटबंदी ही किल्ल्याच्या भोवती आहे.

खूबलढा बुरुज : हा बुरुज या किल्ल्यावर खूप प्रसिद्ध होता. ज्याचा वापर समुद्रावरील शत्रूंवर तोफांचा मारा करण्यासाठी केला जातो. या बुरुजावरून समुद्री शत्रूंवर लक्ष ठेवणे सुद्धा सोपे जात होते. यावर जाण्यासाठी एक भुयारी मार्गाचा वापर केला जायचा.

विजयदुर्ग या किल्ल्यावर आपल्याला वेगवेगळ्या गृह पहायला मिळतात. ज्यांचा उपयोग आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये केला जायचा.

सदर किल्ल्याच्या आतमध्ये आपल्याला एक इमारत पाहायला मिळते. जी आजही चांगल्या अवस्थेमध्ये आहे, ती इमारत राजा भोज यांनी बांधली होती.

सुरुंग : या किल्ल्यामध्ये आपल्याला सुरंग पाहायला मिळतात. त्याचा उपयोग शत्रुने जर अचानक हल्ला केला तर बचावासाठी केला जायचा. या किल्ल्यामध्ये दोन सुरंग बनवल्या होत्या. एक सुरंग किल्ल्याच्या पूर्वेकडे आणि दुसरी सुरंग किल्ल्याच्या पश्चिमेकडे जाते.

विजयदुर्ग या किल्ल्यावर कसे जावे?

विजयदुर्ग या किल्ल्यावर तुम्ही रस्ते मार्गे, ट्रेन किंवा हवाई मार्गे सुद्धा जाऊ शकता.

जर तुम्हाला हवाई मार्गे जायचे असेल तर तुम्ही विमानाने येथे जाऊ शकता. या विजयदुर्ग किल्ल्याजवळील सर्वात जवळचे विमानतळ हे रत्नागिरी हे आहे तसेच तेथून तुम्ही किल्ल्यापर्यंत बस किंवा टॅक्सी भाड्याने घेऊन जाऊ शकता.

जर तुम्हाला रेल्वे मार्गाने जायचे असेल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कणकवली आहे आणि हा किल्ला तुम्हाला पाहण्यासाठी रेल्वेने प्रवास करायचा असेल तर कनकवलीला यावे लागते व तेथून तुम्ही किल्ल्यापर्यंत बस किंवा जाऊ शकता. जर तुम्हाला रस्ते मार्गाने यायचे असेल तर तुम्हाला केलेल्या पर्यंत बस नाही परंतु कणकवली पर्यंत तुम्ही बसले येऊ शकता व तेथून टॅक्सी घेऊन जेव्हा ऑटो घेऊन विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत जाऊ शकता व हा किल्ला पाहू शकता.

राहण्याची व जेवणाची व्यवस्था :

तुम्हाला विजयदुर्ग हा किल्ला पहायचा असेल आणि जेवणाची व्यवस्था किंवा राहायचे असेल तर किल्ल्यापासून काही अंतरावर हॉटेल्स, रेस्टॉरंट आहेत. तेथे तुम्ही आरामात जेवण करू शकता व विश्राम सुद्धा करू शकता.

FAQ

विजयदुर्ग या किल्ल्याचे बांधकाम कधी झाले?

विजयदुर्ग या किल्ल्याचे बांधकाम 1193 ते 1205 या दरम्यान झाले.

विजयदुर्ग हा किल्ला कोणी बांधला

राजा भोज यांनी बांधला

विजयदुर्ग हा किल्ला शिवाजी महाराजांनी कधी ताब्यात घेतला ?

विजयदुर्ग हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये ताब्यात घेतला.

विजयदुर्ग हा किल्ला कोणत्या नावाने ओळखला जात होता?

विजयदुर्ग हा किल्ला घेरिया या नावाने ओळखले जात असे.

विजयदुर्ग हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतो?

विजयदुर्ग हा किल्ला सिंधुदुर्ग या जिल्ह्यात येतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment