व्हर्चुअल रियालिटी म्हणजे काय? | virtual reality information in marathi

व्हर्चुअल रियालिटी म्हणजे काय? | virtual reality information in marathi

VR virtual reality व्हर्चुअल रियालिटी म्हणजे आभासी वास्तविकता .
आभासी चा अर्थ म्हणजे काही काही गोष्टी असल्याचा आपल्याला भास होतो की ही गोष्ट त्या ठिकाणी आहे,पण ती गोष्ट त्या ठिकाणी नसते. Reality चा अर्थ होतो वास्तविकता -वास्तविकता चा अर्थ असा होतो की आपण जे पाहातोय ते खरच आपल्या आजूबाजूला आहे असे वाटणे. सध्या सोप्या भाषेमध्ये जे सांगायच झालं तर virtual reality म्हणजे वास्तविक जगात असताना आभासी दुनियेचा अनुभव घेणे.

व्हर्चुअल रियालिटी थोडक्यात माहिती

तांत्रिक भाषेत जर सांगायचे झाले तर व्हर्चुअल रियालिटी म्हणजे कॉम्प्युटर ने तयार केलेले 3D त्रिमिती विश्व म्हणजे व्हर्चुअल रियालिटी चा अनुभव घेणारी व्यक्ती प्रवासाप्रमाणे आभासी दुनियेचा अनुभव घेऊ शकतो. सध्याच्या काळात VR चा अनुभव हा हेडसेटच्या माध्यमातून घेतला जातो.हेडसेट हे एक असे यंत्र हजे आपण आपल्या डोक्यावर बसवू शकतो. व त्याची स्क्रीन ही आपल्याला डोळ्यासमोर येते.डोळ्यासमोर स्क्रीन असताना संपूर्ण डोळे हे झाकलेले असतात व आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वस्तू दिसत नाही.

व्हर्चुअल रियालिटी रचना

या VR हेडसेटमध्ये सेन्सर्स बसवलेले असतात जे आपल्या डोक्याची व डोळ्याची स्थिती टिपतात .या हेडसेटवर आवाज ऐकण्यासाठी हेडफोन ची सुविधा असते. व्हर्चुअल रियालिटी मध्ये आपल्या दोन्ही डोळ्यांसमोर वेग वेगळी चित्रे दिसत असतात,मात्र आपल्या मेंदूमध्ये डोक्यामध्ये हे दोन चित्रे मिळून एक प्रतिमा निर्माण होते. 3D movie चित्रपट किंवा VR व्हर्चुअल रियालिटी मधील फरक
आपण जेव्हा 3D चित्रपट पाहतो तेव्हा त्याची स्क्रिन ही आपल्या डोळ्यापासून बरीच लांब असते,व स्क्रिनवर दिसणाऱ्या चित्रांचा 3Dअनुभव आपल्याला पाहायला मिळतो.

वाचा : सुपर कॉम्प्युटर काय आहे | supercomputer information in marathi

व्हर्चुअल रियालिटीचा वापर

मात्र व्हर्चुअल रियालिटी मध्ये कॉम्पुटर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. व्हर्चुअल रियालिटी मध्ये स्क्रिन अगदी आपल्या नजरेच्या टप्यात असते, व आपल्या आजूबाजूच काहीही दिसत नाही. त्यामुळे आपल्याला असा भास होतो की आपण तेथे उपस्थित आहोत व सर्वकाही अनुभवत आहोत.
उदाहरण अर्थ जर तुम्ही VR हेडसेट लावला कानात कॉड घातले आणि स्क्रिन वर जर तुम्ही चंद्राची दृश्ये पाहत असाल तर तुम्हाला चंद्रावर असल्याचा अनुभव मिळतो.

एका डोळ्याच्या समोर एक भाग व दुसऱ्या डोळ्याच्या समोर एक भाग असतो व हे दोन्ही चित्र मिळून आपला मेंदू एक चित्र तयार करतो. व आपल्याला प्रत्यक्ष तिथे असल्या सारखे वाटते.
VR हेडसेट साठी सध्या स्मार्टफोन स्क्रिन चा स्क्रिन सारखा वापर केला जातो.

या मध्ये VR हेडसेट मध्ये आपला स्मार्टफोन ठेवला जातो. VR अँप चालू करून आपण आभासी दुनियेत फिरू शकतो.
1.VR मध्ये आपण घरबसल्या पर्यटन स्थळांचा अनुभव घेऊ शकतो.
2.सध्या अनेक गेम्स हे VR साठी पूरक बनवले गेले आहेत त्यामुळे गमर्स साठी ही एक छान पर्वणी आहे.
3.VR मध्ये आपण अनेक आपल्याला आवडणारे व्हिडीओज हे 360° मध्ये पाहु शकतो.
4.शिक्षणामध्ये अवघड गोष्टी VR द्वारे अगदी सहजरित्या समजावल्या जाऊ शकतात.डोळ्याचे अंतर्गत भाग,शरीरातील अंतर्गत भाग,इंजिन कसे चालते इत्यादि.
5.क्रिकेटची स्पर्धा देखील आपण VR द्वारे पाहू शकतो.व मैदाना मध्ये उभे असल्याचा अनुभव आपल्याला मिळतो.
6.सध्या रियल इस्टेट च्या जगात कोणताही फ्लॅट,किंवा बंगला VR द्वारे आपण अगदी जवळून पाहु शकतो.
7.जंगलात आपण प्राण्यांबरोबर फिरण्याचा अनुभव देखील मिळवू शकतो.
8.जर तुम्ही कॉन्सर्ट चे चाहते असाल तर अगदी स्टेज वर असल्याचा देखील अनुभव तुम्हाला मिळतो.
9.VR द्वारे तुम्ही चित्रपट देखील पाहू शकता.

व्हर्चुअल रियालिटी साठी जे व्हिडीओ बनवले जातात किंवा चित्र फिती बनवल्या जातात त्यासाठी एक विशेष कॅमेरा वापरला जातो. या कॅमेऱ्यामध्ये 360° मध्ये व्हिडीओ बनवण्याची क्षमता असते.
तर वाचकहो हा लेख कसा वाटला नक्की कळवा.

3 thoughts on “व्हर्चुअल रियालिटी म्हणजे काय? | virtual reality information in marathi”

Leave a Comment