ज्वालामुखी विषयी संपूर्ण माहिती Volcano Information In Marathi

Volcano Information In Marathi ज्वालामुखी म्हटलं की आपल्याला लगेच डोंगराच्या शिखरावरून ओसंडून वाहणारा लाव्हारस आणि प्रचंड उष्णता आठवते. मुख्यत्वे जमिनीमध्ये होणाऱ्या विविध हालचालीमुळे जमिनीमध्ये असणारा वितळलेल्या स्वरूपातील लावा हा पृथ्वीचा पृष्ठभाग तोडून वर येत असतो. याला इंग्रजीमध्ये मॅग्मा या नावाने देखील ओळखले जाते.

Volcano Information In Marathi

ज्वालामुखी विषयी संपूर्ण माहिती Volcano Information In Marathi

ज्यावेळी जमिनीवर पोहोचतो, त्यावेळी तो उतराच्या दिशेने वाहू लागतो, व शंकू स्वरूपाची स्थिती तयार करतो. त्यामुळे डोंगर निर्मिती होत असते. पुढे जाऊन या ज्वालामुखीला वातावरणातील हवेमुळे थंड केले जाते, आणि त्याचे रूपांतर खडकामध्ये किंवा दगडांमध्ये होत असते. आजच्या भागामध्ये आपण या ज्वालामुखी बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावज्वालामुखी
इंग्रजी नावव्हॉल्कॅनो
प्रकारनैसर्गिक आपत्ती
स्वरुपवितळलेला लावारस जमिनीतून बाहेर पडणे
परिणामलावा थंड होऊन खडकाची निर्मिती होणे, व डोंगर निर्माण होणे.
बाहेर पडणारे पदार्थउष्ण वायू, लावारस आणि राख
सर्वात पहिला ज्वालामुखीमाउंट व्हेसूव्हीएस, इटली

    ज्वालामुखी ही संकल्पना सर्वात प्रथम इटली या देशाने अनुभवली होती. येथील माउंट वेसूव्हीएस या ठिकाणी जगभरातील सर्वात पहिला ज्वालामुखी झाला असे सांगितले जाते. पुढे कित्येक वर्षानंतर इथे जीवसृष्टी उदयास आली होती, सर्वत्र मस्त निसर्ग बहरलेला होता, लोक वस्ती देखील वाढली होती, मात्र त्यानंतर हजारो वर्षांनी पुन्हा एकदा या शहरातून पांढरा धूर बाहेर पडायला लागला. आणि येथील नागरिकांना काही समजण्याच्या आतच संपूर्ण शहर धुराने भरून गेले, आणि लावारस बाहेर येऊ लागला.

    या घटनेमधून अवघे दहा टक्के लोकच वाचू शकले, यांची संख्या तत्कालीन २००० इतकी होती. या घटनेचा दिनांक २४ ऑगस्ट १९०० हा समजला जातो. मोठ्याने गडगडाट होऊ लागला, सर्वत्र धूळ राख  इत्यादींचे साम्राज्य पसरले, लावारसा मधून उडणारे दगड मोठ्याने पावसाच्या स्वरूपात पडू लागले. शहरातील सर्व इमारती पडू लागल्या, सर्वत्र आग लागली होती, त्यामुळे लोकांना स्वतःचा जीव वाचवणे शक्य झाले नाही. यातून तप्त असा लावारस बाहेर पडला, आणि संपूर्ण शहराला त्याने क्षणात व्यापून टाकले.

    इतर नैसर्गिक आपत्ती प्रमाणेच ज्वालामुखी ही एक आपत्ती असूनही यामध्ये पृथ्वीच्या भूगर्भातील विविध हालचालींमुळे जमिनीतून तप्त लाव्हारस बाहेर पडत असतो.

    लावारस म्हणजे काय:

    लावारस म्हणजे दुसरे तिसरे काही नसून पृथ्वीच्या पोटातून फक्त खडकांचा वितळलेला रस बाहेर निघणे होय. यामुळे मोठ्या प्रमाणावर जमिनीच्या पृष्ठभागावर खडकांची निर्मिती होत असते. या लावारसामध्ये असणाऱ्या घटकांनुसार तेथील खडकाची निर्मिती ठरलेली असते, व त्याचे गुणधर्म देखील ठरत असतात.

    पुढे हा तप्त लाव्हारस बाहेर निघताना त्याच्यामुखाजवळ साचत जातो, परिणामी हळूहळू हा लावारसाचा मुख उंच व्हायला लागतो. आणि त्याला शंकुचे स्वरूप प्राप्त होते. त्यातून डोंगराची निर्मिती होत असते. महाराष्ट्रातील दख्खनचे पठार लाव्हारसाच्या थरांनीच निर्माण झालेली आहे असे सांगितले जाते. जे पूर्वेकडे वाहत जाताना हळूहळू थंड होत गेले, परिणामी पूर्वेकडे महाराष्ट्रामध्ये आपल्याला उतार बघायला मिळतो.

    लावारस हा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये साचलेला असतो, ज्यावेळी पृथ्वीच्या पोटामध्ये ऊर्जेची निर्मिती होते, त्यावेळी ही ऊर्जा बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधू लागते. त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभाग कमकुवत किंवा पातळ असेल, अशा ठिकाणावरून हा लाव्हारस बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो.

    ज्वालामुखी चे आकारावरून पडणारे प्रकार:

    लाव्हारसाचे त्यांच्या आकारावरून तीन गटात वर्गीकरण केले जात असते. ज्यामध्ये ढालचा ज्वालामुखी, कालडेरा ज्वालामुखी, आणि स्ट्रॅटो ज्वालामुखी इत्यादी प्रकारांचा समावेश होत असतो.

    ढालचा ज्वालामुखी हा जमिनीतून बाहेर पडण्याचा वेग अतिशय प्रचंड व त्याचे उष्णता देखील अतिशय जास्त असते. हा ज्वालामुखी ज्वालामुखीच्या मुखावर गोठत असल्यामुळे तो शंकू सारखा उतार निर्माण करत असतो. यामधून सुमारे ८०० ते १२०० अंश सेल्सिअस तापमानाचा लावा बाहेर पडत असतो.

    त्याच प्रकारे स्ट्रॅटो ज्वालामुखी हा तापमान कमी झाल्यानंतर गोठण्यास सुरुवात होते. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणावर वायूची निर्मिती होत असते, आणि वाफ देखील वातावरणात पसरत असते. हा ज्वालामुखी विविध थर निर्माण करत तरंगाच्या स्वरूपात वाहत असतो. याचे देखील तापमान ८०० ते १००० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आढळून येते.

    तिसरा प्रकार म्हणजे काल डेरा ज्वालामुखी होय. हा ज्वालामुखी खोऱ्याच्या आकाराचा असतो. यातील लावारस चिकट स्वरूपाचा असून, अवघ्या ६५० ते ८०० अंश सेल्सिअस दरम्यान याचे तापमान असते, त्यामुळे इतर प्रकारांपेक्षा हा थंड ज्वालामुखी म्हणून ओळखला जातो.

    ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी कुठलाही पर्याय उपलब्ध नाही, किंवा या आपत्तीला थांबवण्यासाठी काही उपाययोजना देखील केला जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ज्वालामुखी प्रवण क्षेत्रापासून दूर वास्तविकरण करणे हाच एक यावरील इलाज समजला जातो. त्यामुळे शक्यतो ज्वालामुखी उद्रेक होण्याच्या शक्यता असणाऱ्या विभागांमध्ये वास्तव्य करू नये असे सुचविले जाते.

    ज्वालामुखी कसा असतो हे बघण्याचे नशीब कोणाचेच नाही. कारण जो हे बघेल त्याचा मृत्यू अटळ असतो. त्यामुळे सामान्य लोकांना ज्वालामुखीच्या बाबत ज्ञान मिळावे, याकरिता यावर आधारित एक चित्रपट देखील बनवण्यात आलेला आहे. ज्यामुळे ज्वालामुखी कसा तयार होतो, त्याच्या स्वरूप कसे असते, त्यापासून विविध भूरूपांची निर्मिती कशी होते, याबाबत तुम्हाला माहिती नक्कीच मिळू शकेल.

    निष्कर्ष:

    ज्यावेळी कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवते, त्यावेळी प्रत्येकाची धावपळ होत असते. मात्र ज्वालामुखी ही अशी घटना आहे, जी वास्तव्यास असलेल्या लोकांना क्षणाचाही थांगपत्ता लागू न देता येणारी आपत्ती असते. शक्यतो, डोंगराळ प्रदेशांमध्ये उद्भवणारी ही आपत्ती मोठ्या प्रमाणावर नुकसानदायी असते.

    यामुळे आसपासच्या प्रदेशातील तापमान मोठ्या प्रमाणावर वाढते, त्याचबरोबर विषारी वायू देखील वातावरणामध्ये सोडले जातात. या ठिकाणावर आसपास कोणी असेल तर त्याचा जागीच मृत्यू देखील होऊ शकतो. आजच्या भागामध्ये आपण याच ज्वालामुखी बद्दल इत्यंभूत माहिती बघितली असून, त्यामध्ये ज्वालामुखी म्हणजे काय, त्याचा इतिहास काय आहे, ज्वालामुखी मधून निघणारा लावारस म्हणजे काय असतो, तो कसा दिसतो, ज्वालामुखीचा उद्रेकाची कारणे, ज्वालामुखी मध्ये असलेले घटक, जगातील सर्वात महत्त्वाच्या ज्वालामुखी बद्दल माहिती, इत्यादी गोष्टी बघितल्या आहेत.

    त्यासोबतच भारतातील ज्वालामुखीची देखील माहिती घेतलेली आहे. ज्वालामुखीचे मूळ म्हणजे काय, याबद्दल माहिती घेतानाच ज्वालामुखी बद्दल काही मनोरंजक तथ्य देखील जाणून घेतलेली आहेत.

    FAQ

    ज्वालामुखी ला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

    ज्वालामुखी ला इंग्रजी मध्ये व्हॉल्कॅनो या नावाने ओळखले जाते.

    जगभरात सर्वात मोठे समजले जाणारे पाच ज्वालामुखी कोणते आहेत?

    सर्वात मोठे समजले जाणारे पाच ज्वालामुखी म्हणून माउंट व्हेसुव्हीएस, माउंट रिज, माउंट प्ले, क्राकाटोआ पर्वत, आणि तंबोरा पर्वत इत्यादी ज्वालामुखीना ओळखले जाते.

    भारतातील सर्वात मोठे समजले जाणारे सहा ज्वालामुखी कोणते आहेत?

    भारतामध्ये देखील ज्वालामुखी आढळत असून, त्यातील महत्त्वाच्या ज्वालामुखींचे संख्या सहा इतकी आहे. ज्यांची नावे बॅरन बेट, नारकंदम बेट, डेक्कन ट्रॅप्स, बारातंग बेट, दिनोधर टेकड्या, आणि गिल्टी हिल अशी आहेत.

    ज्वालामुखीच्या उद्रेकांमध्ये कोणकोणते घटक आढळून येत असतात?

    ज्वालामुखीच्या उद्रेकांमध्ये तप्त लावारस, विषारी वायू, मोठ्या प्रमाणावर राख आणि उष्णता इत्यादी घटक बाहेर पडत असतात.

    ज्वालामुखीच्या उद्रेकाने कोणते परिणाम दिसून येत असतात?

    ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तप्त लावारस पृथ्वीच्या पृष्ठभागातून बाहेर पडत असतो, आणि हा थंड झाल्यामुळे पुन्हा खडकाच्या स्वरूपात रूपांतरित होतो. हळूहळू असे लावारसाचे थर पसरत गेल्यामुळे, शंकूचा आकार प्राप्त होऊन त्यापासून डोंगराची निर्मिती होत असते.

    Leave a Comment