वर्धा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Wardha Information In Marathi

Wardha Information In Marathi नमस्कार मित्रांनो आज आपण वर्धा या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत.

Wardha Information In Marathi

वर्धा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Wardha Information In Marathi

वर्धा जिल्ह्यामध्ये सापडलेल्या अवशेषांनंतर या ठिकाणी तामपाषाणयुगतील लोक वास्तव्य करत  होते असे मानले जाते. मौर्य, शुंग, सातवाहन, शक, गौतमीपुत्र सातकर्णी यांनी या प्रदेशावर राज्य केले असा इतिहास आहे.

सातवाहनानंतर आलेल्या वाकाटक घराण्याचा राजा म्हणजे दुसरा प्रवरसेन याने प्रवरपूरची म्हणजेच आत्ताच्या  पवनारची स्थापना केल्याचे आढळून येते .

सन १९३४ मध्ये महात्मा गांधीजी यांनी सेवाग्राम येथे आपला आश्रम स्थापन केला. त्यानंतर सेवाग्राम हे ठिकाण राष्ट्रीय आंदोलनाचे केद्रबिंदू बनले.

सन १९४२ च्या चले जाव आंदोलनाचा महत्वपूर्ण निर्णय येथेच घेण्यात आल्याचा इतिहास आहे.

१. भौगोलिक स्थान :

वर्धा नदीच्या नावावरून या जिल्ह्याला वर्धा हे नाव पडले असल्याचे कळते. वर्धा जिल्ह्याच्या ईशान्येस नागपूर जिल्हा; आग्नेयस चंद्रपूर; नैऋत्येस  यवतमाळ व वायव्येस  अमरावती हे जिल्हे वसलेले आहेत.

२. नद्या व धरणे :

वर्धा व वेणा या जिल्ह्यांतील प्रमुख नद्या आहेत बोर, धाम आणि आर्वी या  तालुक्यामध्ये उगम पावलेली यशोदा नदी या इतर नद्या आहेत.

३. प्रमुख पिके :

वर्धा जिल्ह्यात प्रामुख्याने ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात घेतली जातात  तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात घेतली जातात.

सोयाबीन, जिल्ह्यातील महत्त्वाचे पीके असून या जिल्ह्यात काही ठिकाणी संत्री व केळी ही फळ पिकेदेखील  घेतली जातात.

४. खनिज संपत्ती:

या जिल्ह्यात कोळशाच्या खाणी आहेत.

५. उद्योग व व्यवसाय :

वर्धा जिल्ह्यात वर्धा, सेलू, सिंदी, मांडगाव, हिंगणगाव, अळीपूर या ठिकाणी  हातमाग उद्योग मोठ्या प्रमाणावर चालताना आपल्याला दिसतो.

वर्धा जिल्ह्यातील दुसरबीड व जामणी येथे सहकारी साखर कारखाने आहेत.सेलू तालुक्यात महाराष्ट्र एक्सप्लोझिव्ह व नोबल एक्सप्लोकेम हे दोन स्फोटक द्रव बनवणारे   कारखाने देखील आहेत.

पुलगाव या ठिकणी  भारतीय सैन्याचा संरक्षण सामग्री तयार करण्याचा कारखाना आहे .वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव येथे औद्योगिक वसाहती मोठया प्रमाणावर आहेत.

६. दळणवळण :

या जिल्ह्यातून हाजिराह्नधुळे-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ जातो. वाराणसी-कन्याकुमारी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ जातो.

नागपूर-रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ या जिल्ह्ययातून जातो.

वर्धा शहर हे रेल्वेचे महत्त्वपूर्ण जंक्शन आहे, या ठिकाणावरून मध्य रेल्वेचा मुंबई-कोलकाता लोहमार्ग आणि चेन्नई-दिल्ली  लोहमार्ग गेलेला आहे.

वर्धा जिल्ह्याची वैशिष्ट्ये

वर्धा येथे अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय आहे, या ठिकाणी  ‘अखिल भारतीय ग्रामोद्योग संघ, विश्वशांती स्तुप आणि गीताई मंदिर देखील पहावयास मिळते आहे.

पवनार हे गाव धाम नदीकाठी वसलेले आहे. या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली छत्री व आचार्य विनोबा भावेंनी स्थापन केलेला ‘परमधाम’ आश्रम देखील आहे.

आर्वी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे, येथे काचेचे जैन मंदिर खूप प्रसिद्ध आहे.वर्धा जिल्ह्यातील आष्टी हे गाव सन १९४२ च्या चले जाव आंदोलनात विशेष गाजलेले गाव होते.

या आंदोलनात १६ ऑगस्ट १९४२ ला  येथे झालेल्या भीषण गोळीबारात अनेक सत्याग्रही धारातीर्थी पडले होते. वर्धा जिल्ह्यात बोर अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प आहे . राज्यात वर्धा  नदीचे खोरे दगडी कोळशाच्या साठ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

(अ) भौगोलिक माहिती

१. क्षेत्रफळ=६,३१० चौ. किमी.

२. जंगलाचे प्रमाण=१६.२%

३. अभयारण्ये =बोर अभयारण्य

४. व्याघ्र प्रकल्प = बोर व्याघ्र प्रकल्प

१. आयुक्तालय= नागपूर विभाग

२. जिल्ह्याचे मुख्यालय =वर्धा

३. तालुके=०८

आर्वी, वर्धा, देवळी,हिंगणघाट, सेलू, आष्टी,समुद्रपूर, कारंजा

५. पंचायत समित्या=०८

६. ग्रामपंचायत=५१७

७. नगरपालिका=०६

८. पोलीस मुख्यालय=०१

९. पोलीस स्टेशनची संख्या= १६

लोकसंख्या :सन २०११ च्या जनगणनेनुसार ची लोकसंख्या

१. लोकसंख्या=१३,००,७७४

२. साक्षरता=८६.९९%

३. लिंग गुणोत्तर: ९४६

४.लोकसंख्येची घनता:२९०

वर्धा जिल्हयातील पर्यटन स्थळं:

महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम, विनोबा भावेंचा आश्रम, विश्व शांती स्तुप, लक्ष्मीनारायण मंदीर, बोर अभयारण्य, पोथारा बांध, बोर बांध, फरीदबाबा दर्गा, ह्या जागा  पहाण्यासारख्या आहेत आणि खूप  अभूतपूर्व देखील आहेत.

सेवाग्राम आश्रम

महात्मा गांधीजींचा सेवाग्राम हा आश्रम वर्धा शहरापासुन 8 कि.मी. अंतरावर 300 एकरात पसरलेला आहे.  आत्मीक आणि मानसिक शांतता देणारा हा आश्रम आहे. या आश्रमाची आणखी  एक विशेषतः म्हणजेच महात्मा गांधींनी आपल्या आयुष्याची शेवटची 12 वर्ष इथेच घालवली होती.

या आश्रमात असतांना गांधीजींनी अनेक मोठे निर्णय घेतले, कित्येकांना भेटले, अनेकांच्या जीवनाला नवी दिशा दिली. सेवाग्राम आश्रमाचे  पुर्वीचे नाव सेगाव असे ठेवले होते, याच मार्गावर गजानन महाराजांचे देखील शेगावचे मंदिर आहे.

आपण या ठिकाणी आल्यानंतर ज्या शांततेचा  अनुभव येतो तेव्हांच लक्षात येतं की आपण अश्या महान विभुतीच्या सान्निध्यात आलो आहोत ज्या महान लोकांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याचा पाया रचला होता. इथे आजही सुतकताई केली जाते.

पवनार येथील विनोबा भावेंचा आश्रम –

भुदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावेंचा आश्रम हा वर्धा जिल्हयात आपल्याला पहाव्यास मिळतो .जवळपास 15 एकर जमीनीवर  पसरलेला  हा आश्रम  आहे. सिमेंट च्या जंगलांना, कंटाळलेला माणुस संपुर्णतः निसर्गाने वेढलेल्या जागी येउन शांतीची अनुभुती घेतो असे आढळते.

म्हणुनच इथे भेट देणारे अधिकतर लोक सुशिक्षीतच पहायला मिळतात. विनोबांनी स्वतःच या आश्रमाची स्थापना केली आहे. त्यांनी विशेषतः संत मिराबाईंसारखे जीवन जगणाऱ्या  महिलांकरता या आश्रमाची स्थापना केली होती.आश्रमातील महिला या आश्रमाला आपले ब्रम्ह विद्या मंदीर मानतात.

विश्व शांती स्तुप –

गिताई मंदीराच्या शेजारी संपुर्णतः पांढऱ्या रंगाने बनलेला हा स्तुप असून,  हे वर्धा जिल्हयाचे आणखी एक  आकर्षण आहे. स्तुपाच्या चारही बाजुने बुध्दाच्या मुर्ती पहावयास मिळतात.

स्तुपा जवळ एक मंदीर असून ज्यामध्ये सगळया जगामधील शांतीकरता प्रार्थना केली जाते. जगभरात बनवण्यात आलेल्या शांती स्तुपामधील हे एक स्तुप असून महात्मा गांधीच्या कार्य प्रणालीने प्रेरित झालेल्या फुजी गुरूजी ह्यांचे हे स्वप्न होते.

लक्ष्मीनारायण मंदीर –

अतिशय पुरातन  मंदीर म्हणून ओळख असणारे विष्णु आणि लक्ष्मी या देवतांचे असून या मंदीराचा लोकार्पण सोहळा 19 जुलै 1928 ला जमनालाल बजाज यांच्या हस्ते करण्यात आला होता.

या मंदीराची स्थापना हरिजनांकरता करण्यात आली होती ह्याचे मुख्य  कारण  आहे त्या काळी समाजात असणारा जातीभेद आणि स्पृश्यअस्पृश्यता . हरिजनांना मंदीर प्रवेश बंद होता त्यामुळे विशेषतः हरिजनांकरता या मंदराची निर्मीती करण्यात आली होती.

या ठिकाणी एक ग्रंथालय देखील आहे. जिथे वेगवेगळया भाषेतील पुस्तकांचा संग्रह करण्यात आला आहे. संस्कृत, प्राकृत, हिंदी या भाषेतील पुस्तकांव्यतीरीक्त वेद उपनिषदांचे ज्ञाने देणारी पुस्तकं देखील इथं उपलब्ध आहेत.

बोर अभयारण्य –

जर  व्याघ्र दर्शन करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी असलेल्या बोर अभयारण्याला  अवश्य भेट द्यायला हवी. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने 1 जुलै 2014 ला  वाघांकरता हा भाग आरक्षीत असून त्यामुळे बोर वन्यजीव अभयारण्य भारतातील 47 वे व महाराष्ट्रातील 6 वाघांचे आरक्षीत अभयारण्य बनले.

हे अभयारण्य नागपुर आणि वध्र्याच्या सिमेवर आहे. हे अभयारण्य 138 कि.मी. मधे पसरलेले आहे. या जंगलात बंगाल टायगर, चित्ता, हरिण, मोर, भुंकणारे हरिण, माकड, जंगली डुक्कर, अस्वल, पहायला मिळतात.

सापांच्या वेगवेगळया प्रजाती जसे भारतीय कोबरा, रसेल वाइपर, राॅक पायथन, चेकर्ड किलबॅक इत्यादी पाहायला मिळतात. जवळजवळ पक्ष्यांच्या 160 प्रजाती या अभयारण्यात विहार करतात.

वर्धा जिल्हयाची विशेष माहीती –

  • वर्धा हे मुंबई नागपुर रेल्वेमार्गावरचे महत्वाचे जंक्शन असून सर्व रेल्वेगाडया या ठिकाणी थांबतात.
  • बसेस आणि वाहतुकीची इतरही साधनं असल्याने वध्र्याला पोहोचणे सहज शक्य होते.
  • राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 या शहरातुन गेला असल्याचे माहिती होते.
  • वर्धा जिल्हयाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 1,300,774 आहे
  • क्षेत्रफळ एकुण 6310 कि.मी. आहे.
  • वर्धा जिल्ह्याचे साक्षरतेचे प्रमाण 37% असून,
  • एकुण 507 ग्रामपंचायती, आणि 1387 गावे आहेत.
  • 1000 पुरूषांमागे स्त्रियांचे प्रमाण 946 इतके आहे.

धन्यवाद!!!!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

वैयक्तिक संगणक म्हणजे काय ?
रॅम म्हणजे काय?
संगणकाचे उपयोग
संगणक म्हणजे काय
सुपर कॉम्प्युटर काय आहे

Leave a Comment