Wardha River Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण वर्धा या नदीची माहिती पाहणार आहोत वर्धा नदी ही भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भातील एक प्रमुख नदी असून महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी सर्वात मोठी नदी आहे महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे.
वर्धा नदीची संपूर्ण माहिती Wardha River Information In Marathi
वर्धा नदीचे खोरे हे विदर्भातील सर्वात मोठी नदी खोरे आहे वर्धा नदी गडचिरोली जिल्ह्यातील चपराला येथे वैनगंगा नदी ला जोडते व नंतर चार्मोशीच्या दक्षिणेस पैनगंगा नदी जोडली जाते आणि तेलंगणा मधील आदिलाबाद जिल्ह्यात प्रणाहीता नदी बनते व शेवटी गोदावरीत जाऊन मिळते.
वर्धा नदीस ‘विदर्भाची वरदायिनी नदी’ असे म्हणतात. मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांच्या परिसरातील मुलवाई या ठिकाणी वर्धा नदी उगम पावते.वर्धा नदीचे खरे नाव ‘वरदा’ असे आहे. प्राचीन काळापासून वाहणारी वर्धा नदी म्हणजे वर देणारी नदी होय.
कौंडिण्यपूर ही विदर्भाची प्राचीन राजधानी वर्धा नदीच्या तीरावरच वसली होती. वर्धा नदीचा उगम महाराष्ट्राबाहेर असला, तरी महाराष्ट्रातून प्रवास करून तिने वैदर्भी जनतेला सुखी-समृद्ध करण्यास हातभार लावला आहे.आपल्या प्रवासात ती अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहताना दक्षिणमुखी होते. येथे तिचा प्रवाह छोटासा आहे.
वर्धा नदीला अमरावती जिल्ह्यातून वाहत येणाऱ्या ‘बेल’, ‘मांड’ आणि ‘चुडामन’ या उपनद्या येऊन मिळतात. त्यानंतर ती दक्षिणवाहिनी होते. वर्धा नदीमुळेच वर्धा जिल्ह्याची पश्चिम सीमा ठरली आहे. वर्धा जिल्ह्यातून वाहणाऱ्या ‘यशोदा’, ‘वेण्णा’, ‘बाकळी’ या नद्या वर्धा नदीला मिळणाऱ्या तिच्या उपनद्या आहेत.वर्धा नदी ज्या ज्या प्रदेशातून वाहत जाते, तेथील भाग अनेक प्रकारच्या वनस्पतींनी समृद्ध झाला आहे.
वर्धेच्या तीरावर बांबू आणि सागाची वनसंपदा बहरली आहे. याशिवाय, चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा नदीचे खोरे महत्त्वाच्या खनिज संपत्तीने संपन्न झालेले पाहायला मिळते. दगडी कोळसा, चुनखडी आणि चिनी मातीच्या खाणी आहेत. वर्धेच्या तीरावर वसलेले चंद्रपूर शहर ऐतिहासिक आहे.कागद-उद्योगासाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर वर्धेच्या खोऱ्यातच आहे.
वर्धा नदीने विदर्भातला प्रदेश संपन्न बनवून ती लोकांची वरदायिनी गंगामाताच बनली आहे.
वर्धा नदीचा उगम
मध्य प्रदेश राज्यातील बैतुल जिल्ह्यात जाम या खेड्याजवळ सातपुडा पर्वत रांगेत उगम पावते व पुढे अमरावती जिल्ह्यात वरुळ तालुक्यात निमठाण्याजवळ महाराष्ट्रात प्रवेश करते.
वर्धा नदीची लांबी
वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी 455 किलोमीटर आहे.
वर्धा नदीचे क्षेत्रफळ
वर्धा नदी जलवाहन क्षेत्र 46,180 चौरस किलोमीटर इतके आहे.
राजकीय क्षेत्र
वर्धा नदी ही अमरावती, नागपूर, वर्धा ,यवतमाळ व चंद्रपूर या जिल्ह्यातून प्रवास करते. वर्धा नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई तहसील मधील खैरवाणी गावाजवळ 777 मीटर उंचीवर सातपुडा पर्वताच्या उंचीवर उगम पावते व त्या उगमापासून ती मध्यप्रदेशात 32 किलोमीटर वाहते आणि नंतर महाराष्ट्रात प्रवेश करते. 528 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ती वैनगंगा मध्ये जोडली जाते आणि प्रणाहीता बनते जी शेवटी गोदावरी नदीत वाहते. वर्धा नदीच्या खोऱ्यात वर्धा पुलगाव हिंगणघाट इत्यादी महत्त्वाची शहरे आहेत वर्धा नदी संगमावरील गावे वर्धा व वैनगंगा चपराळा ही आहेत.
भौगोलिक क्षेत्र
भौगोलिक सीमा बाबतीत या नदीचा प्रवाह उत्तरेकडून दक्षिणेकडे आहे .पूर्वेकडे वर्धा व चंद्रपूर जिल्हा असून पश्चिमेला यवतमाळ जिल्ह्याची सीमा आहे.
वर्धा नदीच्या उपनद्या
वर्धा नदीला डाव्या बाजूने म्हणजेच पूर्वेकडून बोर, वेण्णा, इरई व उजव्या बाजूने म्हणजेच पश्चिमेकडून रामगंगा, बेवळा, पैनगंगा ,निरगुंडा इत्यादी नद्या येऊन मिळतात.
मध्यप्रदेश राज्यातून वाहत येऊन महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर ती नागपूर-अमरावती, अमरावती-वर्धा, यवतमाळ-वर्धा, चंद्रपूर-यवतमाळ या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून साधारणपणे दक्षिणेस, पश्चिमेस नंतर पुन्हा दक्षिणेस व आग्नेयीस वाहत जाते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहराजवळ वर्धा नदीला उजवीकडून पैनगंगा नदी मिळते.
संगमानंतर वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्नेयीस व नंतर महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला सेवनीजवळ ती मिळते.
यामुळे वर्धा नदीचे खोरे मोठे होऊन तिने मोठा प्रदेश व्यापला आहे वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो. एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत.
पैनगंगा नदी वर्धा नदी आणि वैनगंगा नदी त्यांच्या उपनद्यांच्या विस्तृत झाल्यामुळे या नदीने विदर्भातील सर्व भाग व्यापून घेतलेला आहे एराई नदी वर्धा नदीची उपनदी असून ती महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाची नदी आहे
वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते पैनगंगा नदीला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे. भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग दख्खन ट्रॅपचा, तर दक्षिण, आग्नेय भाग निम्न, उच्च गोंडवन प्रदेशाचा आहे.
वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात काळी, सुपीक रेगूर मृदा आहे तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे दगडी कोळशाचे साठे विपुल प्रमाणात सापडतात. शेती हा वर्धा खोऱ्यातील प्रमुख व्यवसाय असून भात, ज्वारी, गहू, कापूस इ. पिके होतात. वर्धा नदीच्या तीरावर अनेक ठिकाणी मंदिरे, स्मारके आणि मराठा-पेंढारी काळातील किल्ल्यांचे अवशेष पहावयास मिळतात.
वर्धा नदीवरील धरणे
वर्धा नदीवर मोर्शीजवळ अप्पर वर्धा धरण बांधले गेलेले आहे. अमरावती शहर आणि मोर्शी वरुड वारा यांची ती जीवन वाहिनी आहे. लोअर वर्धा धरण हे अमरावती जिल्ह्यातील वरुड बगाजी गाव व धानोडी खेडे जवळ बांधले गेलेले आहे .हे धरण वर्धा जिल्ह्याला पाणी पुरवते.
यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव गावाजवळ बेंबळा नदीवरील धरणाचा एक बाण बांधण्यात आला असून यवतमाळ जिल्ह्यातील काही भागांना तिच्या पाण्याचा उपयोग शेतासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी होऊन ती एक प्रकारची जीवनवाहिनी आहे. चौथ्या क्रमांकाचे वर्धा नदीची प्रमुख उपनदी वैनगंगा या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे चौथ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे.
मध्यप्रदेश राज्यातून वाहत येऊन महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर ती नागपूर-अमरावती, अमरावती-वर्धा, यवतमाळ-वर्धा, चंद्रपूर-यवतमाळ या जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून साधारणपणे दक्षिणेस, पश्चिमेस नंतर पुन्हा दक्षिणेस व आग्नेयीस वाहत जाते. त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस शहराजवळ वर्धा नदीला उजवीकडून पैनगंगा नदी मिळते.
संगमानंतर वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्नेयीस व नंतर महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला सेवनीजवळ ती मिळते.
वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो. एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.