पश्चिम बंगाल राज्याची संपूर्ण माहिती West Bengal Information In Marathi

West Bengal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आज आपण पश्चिम बंगाल या राज्याची माहिती पाहणार आहोत.हे भारतातील पूर्व भागात असलेले एक राज्य आहे आणि लोकसंख्येच्या घनतेनुसार देशातील चौथ्या क्रमांकाचे राज्य आहे. तसेच जगातील सातव्या सर्वात दाट लोकवस्ती असलेला प्रदेश आहे.

West Bengal Information In Marathi

पश्चिम बंगाल राज्याची संपूर्ण माहिती West Bengal Information In Marathi

भारताच्या पूर्व भागात स्थित एक राज्य आहे . त्याच्या शेजारी नेपाळ , सिक्कीम , भूतान , आसाम , बांगलादेश , ओडिशा , झारखंड आणि बिहार आहेत . त्याची राजधानी कोलकाता आहे . या राज्यात 23 जिल्हे आहेत. येथील मुख्य भाषा बंगाली आहे.

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे भारतातील दुसरे सर्वात मोठे शहर आणि देशातील पाचवे मोठे बंदर आहे.कोलकाता शहराकडे कम्युनिस्ट चळवळीचा बालेकिल्ला म्हणूनही पाहिले जाते. कोलकाता शहराला ‘सिटी ऑफ जॉय’ असेही म्हणतात.

पश्चिम बंगाल राज्याची स्थापना व नामकरण

पश्चिम बंगाल ची स्थापना 26 जानेवारी 1950 ला झाली होती. पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता आहे.

१९४७ च्या भारतीय स्वातंत्र्य अधिनियमाने प. बंगाल हे राज्य प्रथम अस्तित्वात आले. १ जानेवारी १९५० रोजी कुचबिहार हा प्रदेश प. बंगालमध्ये समाविष्ट करण्यात आला आणि फ्रेंचांच्या ताब्यात असलेले चंद्रनगर हे २ ऑक्टोबर १९५४ पासून बंगालचा भाग बनले. १९५६ च्या राज्यपुनर्रचना अधिनियमानुसार बिहार राज्यातील (८,१७७ चौ. किमी.) प्रदेश प. बंगालमध्ये समाविष्ट करण्यात आला.

बंगालचे जुने नाव गौर आहे

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सर्वजण या राज्याला ‘बंगाल’ नावाने हाक मारायचे.  पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘पश्चिम बंगाल’ असे नाव पडले.    बंगाली भाषेत या राज्याला पश्चिम बंगा म्हणतात.

पश्चिम बंगाल राज्याचा इतिहास

बंगालवर इस्लामिक शासन 13व्या शतकात सुरू झाले आणि 13व्या शतकात मुघल राजवटीत व्यापार आणि उद्योगाचे एक समृद्ध केंद्र म्हणून विकसित झाले . 15 व्या शतकाच्या अखेरीस, युरोपियन व्यापारी येथे आले होते आणि 18 व्या शतकाच्या अखेरीस हा भाग ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात आला होता .

भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा उगम येथूनच झाला. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि त्यासोबत बंगालचे मुस्लिमबहुल पूर्व बंगाल (जे नंतर बांगलादेश बनले ) आणि हिंदूबहुल पश्चिम बंगाल (भारतीय बंगाल) मध्ये विभागले गेले

पश्चिम बंगाल चा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे. अलेक्झांडर द ग्रेटने भारतावर आक्रमण केले तेव्हा हा प्रांत गंगारिडाई म्हणून ओळखला जात होता.  अनेक राजघराण्यांनी बंगालवर आलटून पालटून राज्य केले.

येथील प्रमुख राजवंशांबद्दल बोलायचे तर, गुप्त, मौर्य, शशांक, पाल, मुघल, सेन आणि त्यानंतर ते ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आले.  बंगालवर पाल घराण्याच्या शासकांनी 400 वर्षे राज्य केले.  आधुनिक बंगाल म्हणजे सोळाव्या शतकानंतर बंगाल ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात गेला.

प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांचा कायदेशीररित्या भारताचा अधिकार आणि बंगालचा शासक बनला होता.भारतात आल्यावर त्यांनी फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण स्वीकारले, त्याचा परिणाम म्हणजे 1905 मध्ये लॉर्ड डलहौसीने बंगालची फाळणी केली. लोकांच्या पुढाकाराने 1911 मध्ये बंगाल पुन्हा एकत्र आला.

पण कदाचित हे देखील मान्य नव्हते. 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीत त्याचे दोन भाग झाले. 1956 मध्ये बंगालच्या भारतीय भागाला पश्चिम बंगाल म्हटले गेले आणि 1971 पर्यंत पूर्व बंगाल पाकिस्तानच्या ताब्यात होता.  जे 1971 मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले.

भूरचना

क्षेत्रफळ व विस्तार :

पश्चिम बंगालचे क्षेत्रफळ 87,854 चौरस किलोमीटर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने चौदावे सर्वात मोठे राज्य पश्चिम बंगाल आहे. उत्तरेस नेपाळ, सिक्कीम व भूतान यांच्या सीमा प. बंगालला भिडल्या आहेत.

पश्चिमेस बिहार व ओरिसा ही राज्ये, तर पूर्वेस आसाम व बांगला देशाची सीमा असून, गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातील ही सीमा अत्यंत गुंतागुंतीची  आहे. राज्याची दक्षिणोत्तर लांबी 800 किमी. व रुंदी 300 किमी. आहे.

भारताच्या पूर्वेकडील भागात हे राज्य 88,853 चौरस किमी क्षेत्र व्यापते .

उत्तरेकडील हिमालय पर्वत रांगेच्या पूर्वेकडील भागापासून दक्षिणेला बंगालच्या उपसागरापर्यंत राज्याच्या भौगोलिक स्थितीत लक्षणीय विविधता आहे. उत्तरेकडील दार्जिलिंगची शिखरे हिमालय पर्वतरांगेचा भाग आहेत. यात संदाकफू शिखर आहे जे राज्यातील सर्वोच्च शिखर आहे.

दक्षिणेकडे येत असताना, लहान सखल प्रदेशानंतर मैदाने सुरू होतात. या मैदानाचा शेवट दक्षिणेकडील गंगा डेल्टासह होतो. पूर्वीच्या बांगलादेशातही हाच सपाट प्रदेश बराच विस्तृत आहे . पश्चिमेकडील भूखंड पठार आहे.

बंगालच्या प्रमुख नद्या

बंगालमधून 80 पेक्षा जास्त मोठ्या आणि लहान नद्या वाहतात. त्यापैकी बन्सलोई, पगला, मयुराक्षी, अजय, जलंगी, चुर्णी, दामोदर, द्वारकेश्वर, कानसई, भागीरथी, पद्मा, तिस्ता, महानंदा, तोरशा इत्यादी प्रमुख नद्यांची संख्या सुमारे 19 आहे. गंगा ही पश्चिम बंगालची प्रमुख नदी आहे.

ते झारखंडमार्गे पश्चिम बंगालमध्ये प्रवेश करते. पुढे गंगा नदीचे नाव हुगळी पडले. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता हे हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे. त्याच वेळी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील मिठापूर गावात भागीरथी नदी गंगेला ओलांडते. ते दक्षिणेकडे वाहते आणि सागरद्वीपजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.

हवामान

पश्चिम बंगालचे उष्ण, आर्द्र आणि मान्सून प्रकारचे आहे. भारताच्या इतर भागांत आढळणारे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हेच ऋतू येथेही अनुभवास येतात. १ मार्च ते १० जूनपर्यंत उन्हाळा आढळतो. दिवसा तापमान ३८० से. पेक्षाही जास्त असते, तर रात्री ते २२० से, पर्यंत कमी होते. १० जून ते १० ऑगस्टपर्यंतचा काळ पावसाळ्याचा आहे. राज्यातील सरासरी वार्षिक पर्जन्य १७५ सेंमी. आहे, पैकी १२५ सेंमी. जून ते सप्टेंबर या काळात पडतो.

उत्तरेकडे पर्वतीय भागात पर्जन्यमान ४०० सेंमी. असून, नैर्ऋत्येस ते कमी होते. बांकुरा जिल्ह्यात केवळ ११८ सेंमी. पाऊस पडतो. पूर्वेस चोवीस परगणा, मिदनापूर, हावडा व दक्षिणेस सुंदरबन या भागांत पावसाची सरासरी १४० ते १६० सेंमी. आहे. १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर हा काळ मान्सूनच्या परतीचा असून या काळात तपमान पुन्हा वाढते व उच्च आर्द्रतेमुळे हा काळ अत्यंत त्रासदायक ठरतो. १५ नोव्हेंबर ते मार्चपर्यंत हिवाळा असतो.

हिवाळ्यात उत्तरेकडील पर्वतांचा भाग सोडल्यास तपमान कधीही १५० से. खाली जात नाही. दिवसा तपमान २०० ते २८० से. पर्यंत आढळते, रात्री ते १५० ते २०० से. पर्यंत कमी होते. उत्तरेस दार्जिलिंगजवळच्या सिंगलिला डोंगररांगेवर मात्र हिमवर्षाव होतो व बर्फ मार्च महिन्या पर्यंत टिकते.

काही वेळा उत्तरेकडून येणाऱ्‍या थंडीच्या लाटा संपूर्ण राज्यातील तपमान अचानक घटवितात. मे, ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यात चक्री वादळे बंगालच्या उपसागरावरून राज्यात येतात. त्यामुळे मुसळधार वृष्टी आणि वेगवान समुद्राच्या लाटा यांमुळे खूपच नुकसान होते.

लोकसंख्या

पश्चिम बंगाल या राज्याची लोकसंख्या 91,347,736 असून हे भारतातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आहे.  2021 ची अंदाजे लोकसंख्या सुमारे दहा कोटी आहे.  पश्चिम बंगाल हे राज्य विस्ताराने खूप छोटे आहे. परंतु येथील लोकसंख्या जास्त आहे.

राज्यातील सुशिक्षितांच्या दराबद्दल बोलायचे झाले तर, सरासरी साक्षरतेचे प्रमाण 76.26 आहे.  राज्यातील महिला साक्षरतेचे प्रमाण सुमारे 70% आणि पुरुष साक्षरतेचे प्रमाण 87% आहे.राज्यातील धार्मिक लोकसंख्येबद्दल बोलायचे तर राज्यातील सुमारे 70 टक्के लोक हिंदू धर्माचे अनुयायी आहेत, त्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  हिंदूंनंतर, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक लोकसंख्या मुस्लिम धर्माची आहे, जी एकूण लोकसंख्येच्या 30 टक्के आहे.

भारतातील या राज्यातील बहुतांश लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते. येथे विविध धर्माचे लोक एकोप्याने राहतात. राज्यातील बहुसंख्य लोकसंख्या हिंदू समाजाची आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर मुस्लिम लोकसंख्या आहे.

याशिवाय आदिवासी जमातींचा समुदायही येथे राहतो. येथे अनेक प्रकारच्या जमाती आढळतात ज्यामध्ये लेपचा, संताल, भुतिया आणि ओराव इत्यादी प्रमुख आहेत.

पश्चिम बंगालची राजकीय रचना

प्रशासनाच्या सोयीसाठी राज्याचे बरद्वान, जलपैगुरी व प्रेसिडेन्सी असे तीन विभाग पाडलेले आहेत. नडिया, बीरभूम, दार्जिलिंग, जलपैगुरी, पश्चिम दिनाजपूर, चोवीस परगणा, माल्डा, कुचबिहार, मुर्शिदाबाद, कलकत्ता, हावडा, हुगळी, बरद्वान, बांकुरा, मेदिनीपूर व पुरूलिया असे १६ जिल्हे असून जलपैगुरी व बरद्वान विभागांत प्रत्येकी सहा आणि प्रेसिडेन्सी विभागात दोन जिल्हे आहेत. कलकत्ता ही राजधानी असून उच्च न्यायासन तेथेच आहे.

१९६४ मध्ये पंचायत राज्याची त्रिसूत्री योजना अंमलात येऊन १५ जिल्हा परिषदा, ३२५ अंचलिक परिषदा, १९,६६२ ग्रामपंचायती, २,९२६ अंचलपंचायती व ५२ न्यायपंचायती स्थापन झाल्या याशिवाय राज्यात एकूण ९० नगरपरिषदा असून कलकत्ता महानगरपालिकेची पुनर्रचना १९६९ मध्ये करण्यात आली.

पश्चिम बंगाल राज्याची शेती

शेती हा राज्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय आहे. राज्यातील बहुसंख्य लोकसंख्या शेती करणारे आणि शेतमजूर आहेत. तांदूळ हे पश्चिम बंगालचे प्रमुख अन्न पीक मानले जाते. इतर प्रमुख अन्न पिकांमध्ये मका, डाळी, तेलबिया, गहू, बार्ली, बटाटे आणि भाज्या यांचा समावेश होतो.राज्याचा सर्वात मोठा उत्पन्न हिस्सा कृषी उत्पादनातून येतो.

हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने लहान असले तरीही देशाच्या एकूण उत्पन्नातील 14 टक्के तांदूळ याच राज्यातून येतो. राज्याच्या दक्षिण विस्तार मध्ये गहू आणि आल्याची शेती सर्वात जास्त केली जाते. पश्चिम बंगालमध्ये सफरचंद, संत्री, अननस यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते.

पश्चिम बंगालच्या मध्यभागात आणि दक्षिण भागांमध्ये आंबा आणि केळी यांचे उत्पादन घेतले जाते.नारळाखाली ३६,००७ हे. जमीन असून १३ कोटी नारळ मिळाले. यांशिवाय २,८४,००० टन कडधान्ये ७,६५,००० टन तेलबिया यांचे उत्पादन झाले.

चहाखालील क्षेत्रफळ व उत्पादन यांत प. बंगाल हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असून चहामळे दार्जिलिंग व जलपैगुरी या जिल्ह्यांत आहेत.देशातील ५०% ताग, २४% चहा व २५% मेस्ता उत्पादन या राज्यात होते. दार्जिलिंगच्या भागात थंड हवामानातील फळे मोठ्या प्रमाणात पिकतात.

मृदा व खनिजे

बंगालमध्ये मातीचे प्रकार फारसे नाहीत. पर्वतीय भागात मुरमाड माती, तर पश्चिमेकडे पठारी भागात लाल विदारित माती व मैदानी प्रदेशात गाळजमीन आढळते. किनाऱ्‍यालगत खारजमीनही बरीच आहे.

राज्यात अनेक खनिजे आढळतात, तरी त्यांत दगडी कोळसा व आगबंद माती ही दोन खनिजे मूल्यदृष्ट्या ९९% उत्पादन देतात. पश्चिम बंगालमध्ये मॅग्नीज, लोह, पेट्रोल, कोळसा यासारखी खनिज तत्त्व मिळते.

कोळसा उत्पादनात या राज्याचा देशात तिसरा क्रमांक आहे. दार्जिलिंग कोळसाक्षेत्र हे विकसित करण्यात आलेले असून, बाग्राकोट व माल येथे खाणी आहेत. कोळशाच्या काही खाणींत आगबंद माती सापडते, ती उच्चतापसह द्रव्ये व भांडी यांसाठी वापरली जाते. शिवाय चिनी माती, डोलोमाइट, शंखजिरे इ. खनिजे व टंगस्टन, मँगॅनीज, लोह, आर्सेनिक यांची धातुके अल्प प्रमाणात सापडतात.

उद्योगधंदे

पश्चिम बंगाल भारतातील मुख्य आर्थिक केंद्र असलं तरीही येथे शिक्षण आणि रोजगार यांची खूप मोठी समस्या आहे.

मासेमारी व्यवसायाचा बराच विकास झाला असून, गोड्या पाण्यातील मासेमारी महत्त्वाची आहे. १९७५-७६ साली गोड्या पाण्यातून २·५ लक्ष मे. टन उत्पादन झाले. कोंताई येथे माशांची भुकटी बनविण्याचा व मासे डब्यात भरण्याचा कारखाना असून, कल्याणी व जनपत येथे मत्स्यसंवर्धन केंद्रे आहेत. देशातील ५·६% पशुसंपत्ती प. बंगालमध्ये आहे.राज्यातील औद्योगिक उत्पादन सबंध देशातील एकूण औद्योगिक उत्पादनाच्या २०%, तर कोळसा उत्पादन ३०% आहे. देशातील औद्योगिक कामगारांपैकी २२·५% कामगार या राज्यातच होते.

कापड उद्योग हा सर्वांत महत्त्वाचा उद्योग असून, त्यात ३३% कामगारांस रोजगार मिळतो. ताग गिरण्या हा प्रमुख उद्योग असून देशातील ६५ तागगिरण्यांपैकी राज्यात असलेल्या ५३ गिरण्यांत २,९७,००० मजुरांस रोजगार आहे. येथे ४१ कापड गिरण्या असून हातमाग-यंत्रमागही बरेच आहेत.

तागाचे कापड ९·५ लाख टन, तर सूत ५४५ लाख किग्रॅ. व सुती कापड २,००० लाख मी. असे उत्पादन झाले (१९७४). हे उद्योग कलकत्ता शहर परिसरात हुगळीच्या दोन्ही काठांवर ७० किमी. मध्ये आहेत. लोह-पोलाद उद्योग हा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग असून, राज्यात दोन पोलादाचे कारखाने आहेत.

बर्नपूर येथील पोलाद कारखाना व कुल्टी येथील ओतशाळा इंडियन आयर्न अँड स्टील कंपनीची असून कारखाना १८७५ साली स्थापन झाला.दुसरा कारखाना सार्वजनिक क्षेत्रात दुर्गापूर येथे असून त्याची अधिकृत क्षमता २५ लाख टन आहे. १९७४ साली पोलाद उत्पादन १४·३८ लक्ष टन होते. चित्तरंजन येथे रेल्वेएंजिन कारखाना व रूपनारायणपूर येथे हिंदुस्थान केबल्स कारखाना आहे.

दुर्गापूरजवळ खाणयंत्रे कारखाना, कलकत्त्यामध्ये नॅशनल इंस्ट्रुमेंट्‌स कारखाना, उत्तरपाडा येथील हिंदुस्थान मोटर्स कारखाना, आसनसोल व कलकत्ता येथील सायकलींचे कारखाने, गार्डन रीच येथील जहाजबांधणी कारखाना, बेलूर व आसनसोल येथे ॲल्युमिनियम कारखाने, टिटाघर, राणीगंज, नैहाटी व त्रिवेणी या ठिकाणी चार कागद कारखाने आहेत. रसायन उद्योग महत्त्वाचा असून गंधकाम्ल, रंग, रसायने, छपाईची शाई, तसेच औषध कारखाने, कॉस्टिक सोडा कारखाने, बर्नपूर आणि दुर्गापूर येथे खत कारखाने आहेत.

हल्‌डिया येथे खनिज तेलशुद्धीकरण कारखाना व नत्रखत कारखाना हे स्थापण्यात आले आहेत. साखर कारखाने, चिनी मातीच्या भांड्यांचे प्रसिद्ध बेंगॉल पॉटरी वर्क्स कारखाने, बाटानगर येथील पादत्राणे व चामड्याच्या वस्तूंचा कारखाना, शिवण यंत्रे व विद्युत् उपकरणांचे कारखाने प्रसिद्ध आहेत.

राज्यातील लघू व कुटिरोद्योगांची गेल्या दशकात लक्षणीय वाढ झाली आहे.

पश्चिम बंगाल राज्याचा पेहराव

पुरुष धोतर, कुडते व वर स्वच्छ उपरणे किंवा शाल पांघरतात. स्त्रिया गोल पातळ नेसून डोक्यावर लांब पदर घेतात. बंगाली स्त्री-पुरुषांस पांढऱ्या रंगाचे वेड आहे. विशेषत: गडद रंगाची रुंद किनार असणाऱ्या पांढऱ्या साड्या हे बंगाली रमणींच्या पोशाखाचे वैशिष्ट्य आहे.

पश्चिम बंगाल राज्याचे खाद्य

कोणत्याही राज्याचे खाणेपिणे हे तेथील हवामान आणि भौगोलिक स्थानावरही अवलंबून असते. पश्चिम बंगालमध्ये भातशेती खूप आहे. तसंच इथल्या लोकांना मासे खूप आवडतात.

त्यामुळे पश्चिम बंगालमधील लोकांचे मुख्य अन्न म्हणजे मासे आणि भात. येथील मिठाईंमध्ये बंगाली रसगुल्ला हा भारतभर प्रसिद्ध आहे. याशिवाय पश्चिम बंगालच्या पारंपारिक जेवणात लुची-अलूर दम, काठी रोल्स इत्यादी प्रसिद्ध आहेत.

वनस्पती व प्राणी

राज्याचा १२,००० चौ. किमी. किंवा १४ % भाग जंगलव्याप्त आहे. जंगल मुख्यतः उत्तरेस डोंगराळ भागात असून त्यात उष्ण कटिबंधीय वृक्ष आढळतात. पश्चिमेकडील पठार कड्यावर पानझडी अरण्ये आहेत, तर सुंदरबनात खाजणी जंगल आहे.

उत्तरेस डोंगरपायथ्याच्या भागांत सदाहरित जंगले आहेत, पण १,००० मीटरनंतर हिरडा, तून, सोनचाफा, लॉरेल आणि बांबू आढळतात. १,५००–३,००० मीटरच्या भागात ओक व पाइन ही झाडे व उंचीवर कवठी चाफा, ऱ्‍होडोडेंड्रॉनची झाडे व त्यांत सिल्व्हर फरचे मिश्रण आहे. पठाराच्या पश्चिमेकडच्या भागात शाल, पळस, मोह, लाल सावर , हिरडा आणि बांबू आहेत. घाणेरी, वनतुलसी आणि आखरा ही झुडुपेही या भागात आहेत.

सुंदरबनच्या  भागात सुंद्री, गोरान, गेवा, तिवर व धुंडाल ही खारजमिनीत वाढणारी झाडे आहेत. किनाऱ्‍यावर केवड्याची झुडुपे आढळतात. मैदानी भागात फारसे जंगल नाही. काही तुरळक  छायावृक्ष व शेतकऱ्‍यांनी राखलेले वृक्ष आहेत.

त्यांत वड, पिंपळ व आंबा हे प्रमुख असून, पश्चिमेस बाभळीची झाडे आहेत. एकूण जंगले कमी असल्याने वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊन उत्तरेस साग व शाल वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊन येत आहेत. त्याचबरीबर खैर, शिसू, शिवण, चिलौनी आदी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे.

वन्य प्राणिजीवन राज्याच्या उत्तर भागात विपुल आहे. जलपैगुरी, दार्जिलिंग व प. दिनाजपूर या जिल्ह्यांत गेंडा, हत्ती, हरिण आणि वाघ हे वन्य प्राणी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यासाठी जलदापारा अभयारण्य विकसित करण्यात आले असून त्याचे क्षेत्रफळ ९३ चौ. किमी. आहे.

जलभाग विशेष असल्याने अनेक प्रकारचे पाणपक्षी व साप या प्रदेशात आहेत. सुंदरबनमध्ये समुद्रतटीय विपुल प्राणिजीवन आहे, खास परवानगी घेऊन शिकार करण्याची काही भागांत व्यवस्था आहे.

पश्चिम बंगालमधील प्रमुख प्रार्थनास्थळे

बंगालमधील कालीघाटचे कालीघाट मंदिर, दक्षिणेश्वर काली मंदिर कोलकाता, हंसेश्वरी मंदिर बांसबेरिया, त्रिपुरा सुंदरी मंदिर गरिया, कनका दुर्गा मंदिर मिदनापूर, तारापीठ मंदिर बीरभूमी, कृपामयी काली मंदिर, बारदाल मंदिर, बरडाल मंदिर 24, कृपामयी काली मंदिर. , रामपारा काली मंदिर कालीबारी, किरीत्स्वरी मंदिर मुर्शिदाबाद. ही सर्व कालिका मातेची मंदिरे होती. याशिवाय हुगळीच्या काठावर तारकेश्वर मंदिर, श्री रामकृष्ण मठ, हंगेश्वरी मंदिर, हुगळी इमामबारा आणि बंदेल चर्च पाहता येते.

पश्चिम बंगालमधील प्रमुख ठिकाणे

पश्चिम बंगालमध्ये भेट देण्याची खास ठिकाणे म्हणजे कोलकाता, दिघा (मिदनापूर), बक्खली सी रिसॉर्ट, सागर बेट आणि सुंदरबन (दक्षिण २४ परगणा), बांदेल, तारकेश्वर, कामरपुकर (हुगली), गढियारा (हावडा), शांतिनिकेतन आणि बकरेश्वर (बीरभूम), दुर्गापूर (बर्धवान), मुकुटमणीपूर आणि विष्णुपूर (बाकुरा), अयोध्या पर्वत (पुरुलिया), मुर्शिदाबाद, गौर, पडुआ (मालदा), दार्जिलिंग, मिरिक, कालिम्पॉन्ग, संदकफू आणि फालुत आणि कुर्सेलिंग (जेडीपी) डूअर्स (जलपाईगुडी). या ठिकाणी तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल. विशेषतः तुमच्यासाठी कोलकाता, दार्जिलिंग, सुंदरबन्स नॅशनल पार्क, मुर्शिदाबाद आणि संदकफू ट्रेक खास आहे.

धन्यवाद!!!

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

पश्चिम बंगाल कशासाठी ओळखला जातो?

पश्चिम बंगाल हे बिष्णुपूरच्या टेराकोटा मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. हजारदुवारी पॅलेस, एक लोकप्रिय पर्यटक आकर्षण, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा झुंबर आणि भारतातील सर्वात मोठा जिना म्हणून ओळखला जातो.

पश्चिम बंगाल का म्हणतात?

1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा बंगालचे धार्मिक आधारावर विभाजन करण्यात आले. पश्चिम भाग भारतात गेला (आणि त्याला पश्चिम बंगाल असे नाव देण्यात आले) तर पूर्वेकडील भाग पूर्व बंगाल नावाचा प्रांत म्हणून पाकिस्तानमध्ये सामील झाला (नंतर त्याचे नाव पूर्व पाकिस्तान ठेवण्यात आले, 1971 मध्ये स्वतंत्र बांगलादेशाचा उदय झाला).

पश्चिम बंगाल सर्वोत्तम का?

पाच वेगवेगळ्या राज्यांच्या सीमेवर, त्याची राजधानी कोलकाता ही अनेकदा भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखली जाते. विविध भाषा, धर्म, चालीरीती, परंपरा, पाककृती आणि जीवनशैली यांच्या संश्लेषणासह पश्चिम बंगाल भारताच्या समृद्धीला एक अनोखा स्वाद देते .

पश्चिम बंगालमध्ये किती सीमावर्ती जिल्हे आहेत?

भारताच्या पश्चिम बंगालमधील नऊ सीमावर्ती जिल्ह्यांचे स्थान [राखाडी-निळा]. स्रोत: लेखक. दोन जिल्हे जेथे गव्हाच्या लागवडीवर आधीच बंदी आहे (निळ्या रंगाचे जिल्हे) [३४] वर आधारित आहेत. बांगलादेशात 2015-16 गव्हात गहू-स्फोटाचा उदय (ट्रिटिकम एस्टिव्हम एल.)

पश्चिम बंगालमध्ये किती देश स्पर्श करतात?

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पश्चिम बंगालचा उत्तरेकडील विस्तार अरुंद असल्यामुळे तिची सीमा तीन देशांसोबत आहे. ते देश आहेत – पूर्वेला बांगलादेश आणि उत्तरेला नेपाळ आणि भूतान.

Leave a Comment