What is ATM in Marathi: असे मशीन (उपकरण) ज्याद्वारे आपल्याला पैशाचे व्यवहार करता येतात, जसे की पैसे काढणे, पैसे टाकणे, पैसे पाठवणे (ट्रान्सफर करणे), आपल्या खात्याची माहिती घेणे. या उपकरणाद्वारे आपल्या बँकेशी निगडीत सर्व कामे आपण कोणत्याही वेळेला बँकेशी काही संबंध न ठेवता करू शकतो.
एटीएम ची विविध नावे- Full Form of ATM
- ATM : Automated Teller Machine (ग्लोबल)
- ATM : Automatic Teller Machine (युनायटेड स्टेट)
- ABM : Automated Banking Machine (कॅनडा)
- Cashpoint or Cash Machine (ब्रिटिश)
- Any Time Money, Time Machine, Cash Dispenser, Cash Corner, Bankomat, or Bancomat
ATM चा इतिहास- History of ATM in Marathi
जगातील पहिले एटीएम हे 30 जून 1960 मध्ये निघाले. त्याचे नाव होते Bankograph (बँकोग्राफ) यातून आपण पैसे काढू शकत नव्हतो. फक्त त्यात पसे टाकू शकत होतो. नाणे आणि चेक पण ते घेत होते. नंतर यामध्ये प्रगती होत होत आज आपण बँकेची 90% कामे ही एटीएम द्वारे करत आहोत.
कुठे बर मिळते हे मशीन बघायला?
बँकेच्या जवळ किंवा बँकेत, Shopping center/Mall, विमानतळ, बसस्थानके, रेल्वेस्थानके, Metro stations, पेट्रोल/डिझेल पंप, हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणे, तसेच महाविद्यालये, धार्मिक स्थळे इ.
ATM चे विविध पार्ट्स- Parts of ATM Machine in Marathi
1) हार्डवेअर (Hardware)
A. CPU (Central Processing Unit)-
जसे आपल्या मोबाइल/संगणक मध्ये असतो तसंच हे यूनिट ATM मध्येही असते. त्याचे कामही तसेच आहे, म्हणजे ATM चा मेंदू म्हणूनच तो काम करतो. तो सर्व व्यवहारावर लक्ष ठेवतो. ग्राहकाचे खाते नेहमी अद्ययावत करत असतो.
B. Magnetic/Chip card Reader-
हा असा भाग असतो तेथे आपण आपले कार्ड ओळखले जाते, म्हणजेच आपली ओळख करून घेतली जाते. आणि मग CPU आपल्या नावाचे खाते आपल्या बँकेत शोधते.
C. PIN Pad-
आपण जेव्हा आपले कार्ड Magnetic/Chip card Reader मध्ये घालतो, तेव्हा आपले खाते ताब्यात घेण्यासाठी आपल्याला एक 4 अंकी PIN (Personal Identification Number) विचारला जातो. तो टाकण्यासाठी आपण PIN Pad चा उपयोग करतो.
D. Display-
ज्याप्रमाणे आपल्या मोबाइल/संगणक ला Screen असते, तशीच ATM ला ही असते. आपण जे व्यवहार करणार आहोत ते सर्व आपल्याला समोर Display वर दिसावे हाच त्यामागे हेतु असतो.
E. Function Key/Buttons-
खास असे हेतुपूर्वक बटन Pin Pad च्या बाजूलाच, Display च्या साइड ला किंवा टचस्क्रीन मध्ये दिलेली असतात. याचा उपयोग आपल्याला एखादा व्यवहार पूर्ण करण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी होतो. आपले व्यवहार पूर्ण झाल्यावर उपकरण क्लियर करण्यासाठीही एक वेगळे बटन असते.
F. Record Printer-
आपला व्यवहार पूर्ण झाल्यावर Display च्या साइड ला एक छोटा प्रिंटर ही बसवलेला असतो. त्याद्वारे आपले व्यवहार त्यावर प्रिंट केली जातात. ग्राहकालाही आपल्या व्यवहाराबद्दल खात्री होते आणि संतुष्टी मिळते.
G. Sensor/Indicator-
विविध प्रकारचे sensor/Indicator पूर्ण उपकरणामद्धे कार्यरत असतात. उदा. आपण जेव्हा पैसे काढतो तेव्हा PIN Pad च्या खालच्या बाजूला असलेल्या छोट्या दरवाजातून पैसे बाहेर येतात आणि त्याच्या वरच्या बाजूचा indicator चालू होतो तसेच एक वेगळा आवाज यायला लागतो. जेव्हा आपण ते पैसे घेतो तेव्हा Sensor द्वारे तो दरवाजा आपोआप बंद होतो.
2) सॉफ्टवेअर (Software)
आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकणारे असे सुचनाचे संच जसे संगणकामध्ये असतात तसेच काहीसे ATM मध्येही असतात. आज पाहिले तर जास्तीत जास्त मशीन मध्ये Microsoft Windows हीच ऑपरेटिंग सिस्टम (OS) वापरली जाते. परंतु 2014 मध्ये 95% ATM हे Windows XP या ऑपरेटिंग सिस्टम वर चालत होते.
ATM चे उपयोग- Uses of ATM Machine in Marathi
- हे उपकरण मूलतः पैसे काढण्यासाठीच तयार केले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा त्यासाठीच उपयोग होतो.
- आपल्या खात्यावर पैसे जमा करणे.
- आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट मिळवणे.
- आपल्या खात्यावरील शिल्लक माहीत करून घेणे.
- आपले खातेपुस्तक अद्ययावत करून घेणे.
- चेक जमा करणे.
- आपल्या एका खात्यातून दुसऱ्या खात्यावर पैसे पाठवणे.
- फोन बिल, लाइट बिल, टॅक्सेसही आपण ATM द्वारे भरू शकतो.
वरील सर्व कामे ATM द्वारे होत असल्याने आज माणसाने बँकेत जाणे बंदच केले आहे. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांवर येणारा ताण बऱ्यापैकी कमी झाला आहे. शिवाय वरील सर्व कामे आपण कोणत्याही वेळेला करू शकतो.
आपण काय शिकलो?
ATM म्हणजे काय What is ATM in Marathi ? त्याचा इतिहास, त्याचे विविध नावे, अंग याची आपण सविस्तर माहिती ATM Machine Information in marathi घेतली. विविध क्षेत्रात होणारे त्याचे उपयोग आपण बघितले. ATM बद्दल मूलभूत माहिती आपणाला समजली असेलच. या लेखबद्दल आपली प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. भेटूया परत, अश्याच नवीन माहिती सोबत, तोपर्यंत नमस्कार !