What is cpu in marathi – मित्रांनो आपण संगणकाची माहिती, इतिहास, त्याचा उपयोग इत्यादी सर्व गोष्टींची माहिती करून घेतली आहे. परंतु आपल्याला माहित आहे का ? संगणक ही सर्व कामे कोणाच्या मदतीने करतो. मानवाच्या शरीरात मेंदू हा शरीराचा अविभाज्य भाग आहे. विचार करणे ,उठणे , बसने , कोणत्याही क्रियेवर प्रतिक्रिया देणे या सर्व गोष्टी मेंदू नियंत्रित करतो.
जर मानवाच्या शरीरातून मेंदू काढून घेतला तर ते शरीर संपूर्णपने निष्क्रिय होते. तसच संगणकाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे सीपीयू. आज या लेखात आपण सीपीयू आणि त्याबद्दल ची संपूर्ण माहिती बघणार आहोत.
सीपीयू म्हणजे काय (what is cpu in marathi)
सीपीयू चा फुल फॉर्म Central Processing Unit हा आहे. CPU ला “कॉम्प्युटर्स मेंदू” ( Brain of the computer ) देखील म्हटले जाते हा एक प्रकारचा प्रोसेसिंग डिवाइस आहे. एकदम साध्या सरळ भाषेत समजायचं झालं तर आपण जेव्हा सीपीयू ला एखादी गोष्ट करण्यासाठी कमांड देतो तेव्हा त्या कमांड वर प्रोसेस करून म्हणजेच त्यावर इनपुट करून सीपीयू संगणकाद्वारे ती गोष्ट किंवा ती माहिती आपल्याला उपलब्ध करून देतो.
सध्या सीपीयू ला प्रोसेसर किंवा मायक्रोप्रोसेसर देखील म्हटले जाते. सीपीयू कॉम्प्युटरला जोडलेल्या सर्व हार्डवेअर, सॉफ्टवेअर तसेच काही इनपुट डिवाइस कडून जो डाटा मिळतो त्यांना निर्देश करण्याचं काम, त्यावर प्रोसेस करून परिणाम देण्याचे महत्त्वपूर्ण काम सीपीयू करत असतो. तसेच ऑपरेटिंग सिस्टिमच्या प्रोग्रॅम्स संचालन करण्याच सर्वात महत्वपूर्ण काम सीपीयू करत असतो.
सीपीयू काम कसे करतो (working of cpu in marathi)
आपण पाहिलं की सीपीयू ला ब्रेन ऑफ द कंप्यूटर म्हटले जातात कारण त्याचा महत्त्वपूर्ण कार्य आहे कॉम्प्युटरला दिलेल्या इन्स्ट्रक्शन्स वर प्रोसेस करणे आहे. सीपीयू कडून Arthmetical, logical आणि input output ऑपरेशन्स कंट्रोल केले जातात. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट समजून घ्यायची असते तेव्हा सर्वात महत्त्वपूर्ण भाग असतो ती म्हणजे भाषा.
असेच सीपीयू ची सुद्धा एक भाषा असते त्याला आपण Binary code (0-1 ) असे म्हटले जाते. जेव्हा आपण एखादी माहिती देण्यासाठी कॉम्प्युटरचा किबोर्ड वरच्या keys दाबतो तेव्हा कीबोर्ड कंट्रोलर त्या माहितीला बायनरी कोड मध्ये प्रोसेस करून ती माहिती सीपीयू पर्यंत पोचवतो. सीपीयू स्वतः मध्ये असलेल्या काही घटकांच्या मदतीने उपलब्ध माहिती संगणकाच्या स्क्रीनवर दाखवतो.
सीपीयू मध्ये एक Motherbord लावलेला असतो. आयताकृती दिसणारी ही एक चीप असते. त्यावर खूप सारे ट्रांजिस्टर लावलेले असतात. या ट्रांजिस्टर च्या मदतीने कीबोर्ड, माऊस या हार्डवेअर कडून आलेले इनपुट प्रोसेस करण्याचं काम केलं जातं आणि मिळालेला परिणाम हा आउटपुट डिवाइस ला पाठवला जातो.
जवळपास 1970 च्या दशकात सी पी यु चा शोध लावला गेला. एका खोली एवढा तो सीपीयू होता. तेव्हापासून आतापर्यंत सीपीयू च्या आकारात पासून ते त्याच्या काम करण्याच्या वेगामध्ये अनेक बदल झालेले आहेत.
सीपीयू चे भाग आणि त्याचे कार्य (parts of cpu in marathi) :-
सीपीयू चे विविध भाग खालील प्रकारे आहेत:
- Arithmetic logic unit (ALU)
- Control unit (CU)
- Memory unit
- System Buses
- Arithmetic logic unit (ALU)
सीपीयू च्या आत Arithmetic logic unit नावाचे युनिट असते. जेव्हा आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सर्व गणिती क्रियांचे उत्तर वेळ असते तेव्हा त्यावर प्रोसेस करण्याचे काम Arithmetic logic युनिटचे असते. CPU चा हा वेग CORE वर आधारित असतो. हा CORE म्हणजे एक प्रकारचा ALU असतो.
आपण सध्या ऐकतो Single Core, Dual Core हे या प्रोसेसर चे प्रकार आहेत. ते आपण पुढे पाहूच. तसेच Core i3, i5, i7, i9 हे CPU च्या असलेल्या वेगा बद्दल माहिती देतात.
Memory Unit
मेमरी युनिट हा सीपीयू मधला असा भाग आहे ज्याला सीपीयू मधील ” तात्पुरते साठवण्याची जागा” (Temporary Storage) असे म्हटले जाते. सीपीयू मध्ये काही रजिस्टर असतात त्यांच्या वेगानुसार 2 bit register, 4 bit register , 8 bit register असे म्हटले जाते.
मेमरी युनिटमध्ये आपण विचारणा केलेली माहिती किंवा डाटा तात्पुरत्या स्वरूपात साठवला जातो व ती माहिती या त्यात बीटच्या स्वरुपात साठवली जाते. पुढे या मेमरी युनिट मध्ये असलेले सर्व डेटा प्रोसेस करण्यासाठी ALU कडे पाठवण्यात येतो.
या मेमरी घेण्याचे काही प्रकार असतात ते खालील प्रमाणे:-
- Memory Address Register (MAR)
- Memory Data Register (MDR)
- Program Counter (PC)
- Current Instructions Register (CIR)
- Accumulator Register (AR)
- Control unit:-
कंट्रोल युनिट हा सीपीयू चा प्रमुख घटक आहे. कंट्रोल युनिट चे महत्त्वपूर्ण काम हे मेमरी युनिट कडून आलेला डाटा प्रोसेसिंग साठी ALU कडे पाठवणे. म्हणजेच काय तर संगणकात होणाऱ्या सगळ्या ऑपरेशनला कंट्रोल आणि डायरेक्ट करण्याचे काम कंट्रोल युनिट करत असतो.
कंट्रोल युनिट System clock या दिशेत कार्य करत असतो. ज्यामुळे मिळालेल्या डाटा हा त्याच्या योग्य स्थानी पोचविण्यास मदत होते.
System Buses.
system Buses हा एक communication path असून त्याचा उपयोग प्रोसेसर आणि मेमरी मध्ये असलेल्या डाटा ला एकीकडून दुसरीकडे घेऊन जाण्यास मदत करतो. हा केबल आणि कनेक्टर पासून बनलेला असतो.
या कॉम्प्युटर सिस्टिम चे सुद्धा तीन प्रकार पडतात (Types of computer system in marathi) :-
- Address Bus
- Control Bus
- Data Bus
CPU चे प्रकार (types of computer in marathi)
कॉम्प्युटर ची मुल्यता ही CPU च्या असलेल्या प्रोसेसरवर ठरत असते. जेवढा जास्त प्रोसेसरचा वेग तेवढा जास्त संगणक उपयोगी. तर आता आपण प्रोसेसर म्हणजे काय आणि त्याचे प्रकार ते बघूया.
Single Core CPU
सिंगल कोर हा सिंगल प्रोसेस करण्यासाठी बनवला गेलेला आहे. यामध्ये एका वेळी जास्त एप्लीकेशन चा उपयोग करता येत नाही. जर वापरण्याचा प्रयत्न केला तर कॉम्प्युटर पूर्णपणे स्लो होतो. मल्टिटास्किंग साठी सिंगल कोर चा उपयोग नाही.
Dual Core CPU
यात दोन कोर असतात म्हणजेच सिंगल कोर पेक्षा याचा स्पीड जास्त असतो. मल्टिटास्किंग साठी याचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. एका सिंगल सिलिकॉन चिप मध्ये दोन प्रोसेसर चा उपयोग करून Dual core टेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो.
Quad Core CPU
यामध्ये चार प्रोसेसर असतात आणि चारही कोर स्वतंत्रपणे काम करतात. मल्टिटास्किंग साठी याचा खूप जास्त प्रमाणात उपयोग केला जात आहे. सिंगल कोर आणि ड्युअल कोर पेक्षा अतिशय वेगवान प्रोसेसर आहे.
जर तुमच्याकडे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप असेल तर तुम्ही त्यावर intel i3 किंवा AMD ग्राफिक्स असे काही Stickers नक्की पाहिले असतील. याचा अर्थ सीपीयू चे लेटेस्ट मॉडेल हे intel आणि AMD जगप्रसिद्ध कंपन्याकडून हा laptop व computer डिझाईन केला आहे.
Core Class
i3 = यामध्ये 4 core असतात आणि 4 thread असतात. budget gamer साठी डिझाईन केलेला हा लॅपटॉप आहे.
i5 = यामध्ये 6 core असतात व 6 thread असतात. heavy gamer यूजर साठी व खूप चांगल्या ग्रफिक साठी याचा उपयोग केला जातो.
i7 = यामध्ये 6 core असतात व 12 thread असतात. मल्टिटास्किंग साठी याचा अतिशय चांगला उपयोग आहे.
i8 = हा अतिशय वेगवान असा प्रोसेसर असून यामध्ये 10 core आणि 20 thread असतात. हे आत्ताच latest version आहे.
आपण काय शिकलो ?
आपण या लेखात सीपीयू म्हणजे काय (what is cpu in marathi) ते बघितले व सी पी यु ची प्रोसेसर कसे असतात ते बघितले. जर तुम्हाला कम्प्युटर घ्यायचा असेल तर सीपीयूचा प्रोसेसर बघायला विसरू नका.
हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नक्की शेअर करा. आणि यांसारखे लेख वाचण्यासाठी फॉलो करत राहा.