इनपुट उपकरणे म्हणजे काय (what is input devices in marathi) आजचे आधुनिक युग हे संगणक आणि इंटरनेटचे युग आहे. संगणकाला इंग्रजीत कॉम्प्युटर म्हटले जाते. आज अनेक वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेगळ्या आकारातील संगणक बाजारात उपलब्ध आहेत. आजच्या या लेखात संगणकाच्या इनपुट उपकरणांची माहिती देण्यात आली आहे.
संगणकाला चालवण्यासाठी लागणाऱ्या उपकरणांचे दोन भागात वर्गीकरण केले जाते. हे वर्गीकरण पुढील प्रमाणे आहे-
1) इनपुट उपकरण
2) आउटपुट उपकरण
इनपुट उपकरण म्हणजे काय | What is input device in marathi
इनपुट device अशी उपकरण असतात ज्यांच्या मदतीने संगणकाला निर्देश दिले जातात. इनपुट उपकरण संगणक आणि मनुष्या मधील दुवा असतात. यांच्या मदतीने आपण संगणकाला सूचना देऊ शकतो.
आपण असे म्हणू शकता की इनपुट उपकरण संगणकाला दिलेले इन्स्ट्रक्शन स्वीकार करण्याचे कार्य करतात. उदाहरण म्हणून जेव्हा आपण की-बोर्डवर कोणतेही बटन दाबतो किंवा माऊस च्या मदतीने क्लीक करतो तेव्हा संगणकाला एक संदेश जातो आणि हा संदेशच विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी मदत करतो.
इनपुट उपकरणांचे प्रकार (types of input devices in marathi)
- Keyboard
- Mouse
- Trackball
- Scanner
- Joy Stick
- Microphone
- Touch Screen
- Graphic tablet
- Digital Camera
- Webcam
- Biometric Scanner
- OMR Reader
- OCR Reader
Input device म्हणजे काय आणि त्याचे प्रकार (types of input devices in marathi)
- कीबोर्ड : कीबोर्ड संगणकाचे प्राथमिक इनपुट डिवाइस आहे. जास्तकरून हे प्लास्टिक च्या बटणाचे बनलेले असते. कीबोर्ड मध्ये 80 ते 110 बटणे असतात. यामध्ये टायपिंग बटन, नुमेरिक बटन, फंक्शन बटन, कंट्रोल बटन आणि नेव्हिगेशन बटनांचा समावेश असतो.
2) माऊस
माऊस ला पॉइंटिंग डिव्हाइस म्हटले जाते. माऊस हे संगणकाचे महत्वपूर्ण इनपुट उपकरण आहे. याचा उपयोग कॉम्प्युटर वरील मॉनिटर स्क्रीनचे कर्सर मुव्ह करण्यासाठी केले जाते.
माऊसचे मुख्य कार्य एखाद्या फोल्डर वर क्लिक करून त्याला ओपन करायचे असते. यासाठी माऊस वर दोन बटणे असतात. एक left बटन आणि दुसरे right बटन.
3) स्कॅनर
स्कॅनर देखील एक इनपुट डिवाइस आहे, याचा उपयोग चित्र किंवा डॉक्युमेंट ला स्कॅन करण्यासाठी केला जातो. स्कॅनर फोटोकॉपी मशीन प्रमाणे कार्यकर्ते. याचा उपयोग चित्र प्रिंट करण्यासाठी देखील केला जातो.
4) जॉयस्टिक
माऊस प्रमाणेच जॉयस्टिक चे कार्य देखील स्क्रीन वरील कर्सर इकडून तिकडे हलविण्याचे असते. याच्या मुख्य उपयोग कॉम्प्युटर मधील व्हिडिओ गेम्स खेळण्यासाठी केला जातो. याच्यावर काही बटन देखील दिलेले असतात.
5) मायक्रोफोन
मायक्रोफोन एक महत्त्वपूर्ण इनपुट डिवाइस आहे. याचा उपयोग संगणकामध्ये वोईस रेकॉर्ड करण्यासाठी केला जातो. त्यानंतर संगणक मायक्रोफोन च्या मदतीने मिळालेल्या anaolg डेटा ला digital मध्ये कन्वर्ट करून ऑडिओ रूपात स्टोअर करते.
6) कॅमेरा
कॅमेरा अथवा डिजिटल कॅमेरा एक असे इनपुट डिवाइस आहे जे चित्रांना डिजिटल रूपात कॅप्चर करून ठेवते. डिजिटल camera च्या मदतीने चित्र काढणे, संगणकावरून व्हिडिओ कॉल करणे इत्यादी कामे केली जातात.
7) बायोमेट्रिक डिवाइस
बायोमेट्रिक डिवाइस एक असे यंत्र आहे जे कोणत्याही व्यक्तीचे फिंगरप्रिंट स्कॅन करू शकते. बँक तसेच इतर official ठिकाणी याच्या मदतीने योग्य व्यक्तीची ओळख केली जाते. व्हॉईस स्कॅनर, फेस स्कॅनर आणि फिंगर प्रिंट स्कॅनर हे बायोमेट्रिक डिवाइस चे प्रकार आहेत.
आपण काय शिकलो ?
तर मित्रांनो या लेखात आपण इनपुट डिवाइस म्हणजे आहे (what is input device in marathi) याबद्दल माहिती मिळवली. आशा आहे की ही माहिती तुम्हाला इनपुट उपकरणांचे प्रकार (types of input devices in marathi) नक्कीच उपयुक्त ठरली असेल. या माहितीला कॉम्प्युटर क्षेत्रात आवड असणाऱ्या आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.