IP Address म्हणजे काय ? | What is ip address in marathi

What is ip address in marathi : मित्रांनो तंत्रज्ञानाच्या या लेखमालिकेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे.या लेखमलिकेत आपण भन्नाट आणि रोजच्या वापरातल्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती घेणार आहोत.

ह्या लेखात आपण रोजच्या वापरातील तंत्रज्ञानातील एक टेक्निकल गोष्टी विषयी माहिती करून घेणार आहोत. पोलिसांना जेव्हा एखाद्या फरार गुन्हेगाराला शोधायचे असते तेव्हा पोलीस त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या मोबाईल नंबर द्वारे त्या गुन्हेगाराचा पत्ता शोधून काढतात व त्याला अटक करतात. पोलिसांनी हे कशामुळे केले शक्य झाले तर त्या मोबाईलचा असलेल्या आयपी ऍड्रेस मुळे. त्यांनी IP Adress ट्रेस करून फरार गुन्हेगाराचा शोध लावला. याच IP ऍड्रेस ची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

IP Address म्हणजे काय ? ( What is ip address in marathi)

IP Address म्हणजे Internet Protocol Address तसेच IP number किंवा Internet Address म्हणून देखील ओळखले जाते.
थोडक्यात काय तर हा एक प्रकारचा IP Address असतो जो इंटरनेटशी जोडला जात असतो. समजा तुमच्या घरी कोणी पाहुणे येत असेतिल तर तुम्ही त्यांना तुमच्या घराचा पत्ता सांगितला आणि ते बरोबर त्या पत्त्यावरच पोहोचले तर हा पत्ता झाला तुमचा घराचा आय पी ऍड्रेस.


अशाच प्रकारे प्रत्येक तयार होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस ज्यात इंटरनेटचा उपयोग केला जातो. त्या डिव्हाईस ला स्वतःचा एक IP Addressअसतो. हा IP Address प्रत्येक उपयोग कर्त्याला माहीत असायला हवा. तो कसा माहित होईल हे आपण पुढे बघू यात.

IP Address चा उपयोग (uses of ip address in marathi)

जसा तुम्हाला सुरुवातीलाच पोलिसांच्या आणि घराचा उदाहरण देऊन सांगितले की IP Address चा उपयोग नेमका कशा पद्धतीने केला जातो. पण एवढाच उपयोग आहे का ? तर नाही.


आयपी ऍड्रेस हा कोणत्याही नेटवर्क डिव्हाइस ला एक identity देत असतो. जसे आपण घराचे उदाहरण पाहिले तसे प्रत्येक डिव्हाईस ला वेगवेगळ्या आयपी ॲड्रेस ने वेगवेगळं केलं जात असते. जेव्हा एखादा व्यक्ती एखादा वेबसाईटला ओपन करण्यासाठी वेबसाईट चा URL टाकतो तेव्हा त्या पेजला ओपन करण्यासाठी DNS Server ला विनंती पाठविली जाते.

त्याच्या मदतीने DND Server त्या website च्या hostname ला शोधते त्याच्या चालू IP Address ने. विना IP Address कोणताच कॉम्प्युटर कोणत्याच वेबसाईटला शोधू शकत नाही.

IP Address चे प्रकार ( Types of ip address in marathi)

जसे आपण एका लेखात पाहिले की प्रत्येक QR कोड हा वेगळा असतो. तसेच प्रत्येक IP Address हा सुद्धा वेगळा असतो आणि त्याचे उपयोग सुद्धा.त्यामुळे त्याचे चार प्रकार पडतात ते पुढीलप्रमाणे –

  • Private IP Address
  • Public IP Address
  • Static IP Address
  • Dynamic IP Address

सोबतच प्रत्येक IP Address मध्ये सुद्धा ipv4 Address आणि ipv6 Address असे दोन प्रकार असतात.

Private IP Address

अशा प्रकारचा IP Address चा उपयोग एका router ला दुसऱ्या डिवाइस ला कनेक्ट करण्यासाठी होतो. घरगुती वापरासाठी याचा उपयोग जास्त करून होता म्हणून याला प्रायव्हेट नेटवर्क IP Address असे म्हटले जाते. हा आयपी ॲड्रेस पूर्णपणे मॅन्युअली सेट केला जात असतो म्हणजे यात राउटर चा प्रायव्हेट आयपी ऍड्रेस असणार आणि तो ऑटोमॅटिकली राउटर ला कनेक्ट होणाऱ्या डिवाइस ला प्राप्त होणार.

Public IP Address

नावाप्रमाणेच याचा उपयोग पब्लिक साठी म्हणजेच एखाद्या मोठ्या क्षेत्रासाठी केला जात असतो. खास करून याचा उपयोग बिझनेससाठी मोठ्या प्रमाणावर केला जात असतो. यात एक Main Address असतो ज्याचा उपयोग बिझनेस नेटवर्क साठी केला जात असतो आणि आपण आपला डिव्हाइसने जगभरातील दुसऱ्या डिव्हाइस सोबत किंवा वेबसाइट सोबत डायरेक्ट कम्युनिकेट करू शकतो.

Dynamic IP Address

हा IP Address DHPC Server द्वारे assignd केला जात असतो म्हणून ह्या IP Address ला Dynamic IP Address असे म्हणतात.

Static IP Address

जर IP Address मध्ये DHCP enabled नसेल तर IP Address mannually assigned करला जात असतो म्हणून याला static IP Address असे म्हणतात.

IPV4

1983 मध्ये पहिले version IPv4 चा शोध लागला.
हा 32 Bits चा होता. अंकामध्ये हा IP Address दिसत असे. उदाहरणार्थ 182.18.240.1 दशांश नंबरने ते वेगळे केले जातात. 0 – 255 एवढी त्याची रेंज असते. आणि प्रत्येक भाग हा 8 bits चाच असतो.

IPV6

IPV6 हर IPV4 चे पुढचे Version आहे. याचे निर्मितीचे कारण म्हणजे इंटरनेट वापरकर्त्यांची वाढलेली संख्या आहे. यात 128 बीटस असतात आधुनिक सर्व्हर IPV6 वर आधारित आहेत. हा राउटर ला त्याच्या स्पीड व त्यावर आलेल्या लोड वरून ऑटोमॅटिकली नेटवर्क मध्ये चेंज करू शकतो.

आपल्या मोबाईलचा किंवा कॉम्प्युटरचा IP Address कसा मिळवाल

आपण आतापर्यंत पाहिले की आयपी ऍड्रेस म्हणजे काय. ते समजून घेतले. आता आपण मोबाईल, कॉम्प्युटरचा किंवा आपल्याकडे असलेला डिवाइस चा आयपी ॲड्रेस कसा मिळेल ते बघूया.


तुमच्या डिवाइस मध्ये असलेल्या ब्राउजरला ओपन करा. त्यावर what is my IP Address असे टाका. लगेच आपल्या डिवाइस आय पी ऍड्रेस आपल्याला मिळेल ब्राऊजर मध्ये दिसेल.

मोबाईलचा IP Address कसा शोधाल ?

आपल्या मोबाईल मध्ये setting ओपन करा. about मध्ये जाऊन device मधील status चेक करा. तेथे मोबाईलचा IP Address मिळेल. परंतु सिमकार्ड बदलताच ऍड्रेस देखील बदलला जातो.

निष्कर्ष

आपण IP Address ची संपूर्ण माहिती पहिली, ip address म्हणजे काय (what is ip address in marathi). IP Address चे महत्त्व देखील समजले. त्यामुळे तुमच्या कडे असलेल्या डिव्हाईस चा IP Address बघायला बिलकुल विसरू नका.


आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असेल तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर शेअर करायला विसरू नका .

Leave a Comment