Wipro Company Information In Marathi अलीकडील काळामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला प्रचंड मागणी वाढलेली असून, भारतातील कर्नाटक व बेंगलोर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी आपले बस्तान बसवलेले आहे. यातीलच एक दिग्गज कंपनी म्हणून विप्रो या कंपनीला ओळखले जाते.
विप्रो कंपनीची संपूर्ण माहिती Wipro Company Information In Marathi
१९४५ या वर्षी मोहम्मद हशम प्रेमजी यांच्याद्वारे या कंपनीची स्थापना केली गेली होती. त्या दिवसापासून आजपर्यंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी म्हणून या कंपनीचा मोठा दबदबा आहे. या कंपनीने स्वतःला शेअर मार्केटमध्ये देखील लिस्ट केलेले असून, एक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा व सल्ला पुरवणारी कंपनी म्हणून या कंपनीला ओळखले जाते.
आज या कंपनीची संपत्ती प्रचंड प्रमाणात वाढलेली असून, प्रति वर्ष सुमारे ६०० अब्ज रुपये या कंपनी द्वारे कमावले जात असतात. ज्यातील सुमारे ७० अब्ज रुपये केवळ निव्वळ नफा असतो. सेवा क्षेत्रातील ही कंपनी परदेशात देखील आपली सेवा देत असून, या कंपनीने आपला विस्तार अनेक देशांमध्ये केलेला आहे.
अतिशय दिग्गज असणारी ही कंपनी काही अंशी इतर व्यवसायांमध्ये देखील उतरलेली असून, ग्राहकपयोगी वस्तूंचे निर्माण करण्यामध्ये देखील या कंपनीने पाऊल ठेवलेले आहे. आजच्या भागामध्ये आपण याच उद्योग क्षेत्रात चांगले नाव असणाऱ्या विप्रो कंपनी बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.…
नाव | विप्रो |
प्रकार | कंपनी |
क्षेत्र | माहिती तंत्रज्ञान क्षेत्र |
स्थापना वर्ष | इसवी सन १९४५ |
संस्थापक | मोहम्मद प्रेमजी |
संचालक | अजीम प्रेमजी |
मुख्य कार्यालय | बेंगलोर, भारत |
कर्मचाऱ्यांची संख्या | ९० ते ९५ हजार |
सद्यस्थितीमध्ये अझीम प्रेमजी यांच्या मालकीची असणारी विप्रो कॉर्पोरेशन ही कंपनी दिनांक २९ डिसेंबर १९४५ या दिवशी स्थापन करण्यात आली होती. गुजराती मुस्लिम कुटुंबात जन्मलेले अजीम प्रेमजी सुरुवातीला साबण या व्यवसायामध्ये उतरले होते, मात्र काहीच दिवसांमध्ये त्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रवेश करत विप्रो नावाचे लहानसे रोपटे लावले होते. आज या रोपट्याचे महाकाय वृक्षांमध्ये रूपांतर झालेले असून, या अंतर्गत विविध सॉफ्टवेअर संदर्भातील कार्य देखील केले जाते.
सुरुवातीला विप्रो ही तेलाची कंपनी होती. मात्र त्यांनी नाव न बदलता केवळ आपला व्यवसाय बदलून एका वेगळ्या दिशेने वाटचाल करणे सुरू केले होते. आज बहुराष्ट्रीय स्तरावर प्रचंड मोठे नाव असणारी ही विप्रो कंपनी बाजार मूल्यानुसार १.८ लाख कोटी रुपयांची असून, हायटेक क्षेत्रामधील एक दिग्गज व्यक्ती म्हणून आज अजीम प्रेमजी यांना ओळखले जाते.
विप्रो कंपनीचे ठिकाण:
विप्रो कंपनी ही मुख्यतः भारतामध्ये २९ डिसेंबर १९४५ रोजी स्थापन झाली होती. सुरुवातीला तेल व्यवसायात असणारी ही कंपनी १९८९ यावर्षी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आली. आज संपूर्ण भारतभर या कंपनीच्या अनेक शाखा उघडल्या असल्या तरी देखील याचे मुख्यालय बंगळूर या ठिकाणी उघडले गेलेले आहे. या कंपनीचे मुख्य नाव विप्रो कॉर्पोरेशन असे असून, या कंपनी अंतर्गत सॉफ्टवेअर तयार करणे, त्याचबरोबर विविध तांत्रिक बाबींवर सल्ला व मार्गदर्शन पुरवणे हे आहे.
विप्रो कंपनीचे बाजार मूल्य:
सुरुवातीला तेल व्यवसायात असणारी ही कंपनी आज सॉफ्टवेअर क्षेत्राला आपलेसे करत मोठ्या उंचीवर पोहोचलेली आहे. त्याचबरोबर ही कंपनी काही काळ हार्डवेअर वर देखील लक्ष केंद्रित करून होती. भारतातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी माहिती तंत्रज्ञान कंपनी म्हणून आज विप्रोची ओळख आहे.
अलीकडील काळामध्ये अनेक नवनवीन कंपन्यांची बाजारात रेलचेल वाढल्यामुळे विप्रो कंपनीची संपत्ती किंवा उत्पन्न काहीसे कमी झाले असले तरी देखील ते जास्तच म्हणावे लागेल. गेल्या वर्षीच विप्रो या कंपनीने जवळपास साडेआठ बिलियन संपत्तीची कमाई केलेली असून, टीसीएस आणि इन्फोसिस यांच्यासारख्या कंपन्यांची प्रतिस्पर्धी कंपनी म्हणून विप्रो अतिशय दिग्गज ठरलेली आहे.
नवनिर्मिती करणे हे या कंपनीचे मुख्य ध्येय असून, तांत्रिक विकास करतांनाच सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये देखील देशाला पुढे घेऊन जाणे हे या कंपनीचे मुख्य उद्देश समजले जाते. विविध प्रकारच्या डिजिटल क्षेत्रामधील एप्लीकेशनच्या निर्मितीसाठी, त्यांच्या मेंटेनन्स साठी, या सर्व गोष्टीतून उत्पन्न मिळवण्यासाठी ही कंपनी आघाडीवर असून, विप्रोने आपल्या अनेक उपविभागांची देखील निर्मिती केलेली आहे. यामध्ये विप्रो इनोवेशन हब, विप्रो होम्स, विप्रो ऑटोमोशन, यासारख्या घटकांचा समावेश होतो.
आज घडीला या कंपनी द्वारे मशीन लर्निंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रामध्ये देखील पाऊल ठेवले जात असून, त्यामध्ये देखील अल्पावधीतच या कंपनी द्वारे प्रगती केली जाईल असे सांगितले जाते. कॉर्पोरेट संस्कृतीत एक यशवंत कंपनी म्हणून नेहमीच विप्रो ची ओळख राहिलेली आहे.
आपल्या प्रामाणिक सेवेसाठी आणि जबाबदारी पूर्ण काम करण्यासाठी या कंपनीला ओळखले जाते. त्यामुळे कॉर्पोरेट जगतामध्ये या कंपनीला चांगला मान देण्यात आलेला आहे. मात्र अलीकडील काळामध्ये विप्रो कंपनीला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांच्या कपातीचा देखील निर्णय घेतलेला होता. त्यामुळे ही कंपनी मध्यंतरीच्या काळामध्ये मोठ्या चर्चेमध्ये देखील आली होती.
निष्कर्ष:
अजीम प्रेमजी यांच्याद्वारे चालवण्यात येणारी विप्रो कंपनी २९ डिसेंबर १९४५ रोजी स्थापन झाली, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये एक चांगले नाव असणारी ही कंपनी मध्यंतरीच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या बाबीवरून चांगलीच चर्चेत आली होती.
या कंपनीने चांगला नफा कमवलेला असून, दरवर्षी नफा कमावण्यामध्ये ही कंपनी अग्रेसर असते. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये या कंपनीच्या नावाचा चांगलाच दबदबा असून, भारतातील अनेक राज्यांसह संपूर्ण जगभर बऱ्याचशा देशांमध्ये या कंपनीची सेवा पुरवली जात आहे. या कंपनीने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा देण्याबरोबरच सल्ला देण्याचे देखील कार्य केलेले आहे, यातून या कंपनीला चांगला नफा मिळत आहे.
बेंगलोर या ठिकाणी मुख्यालय असणारी ही कंपनी काही अंशी ग्राहकपयोगी वस्तूंच्या निर्माण कार्यामध्ये देखील सामावलेली असून, त्या कंपनीच्या उत्पन्नाचे एकाधिक स्त्रोत निर्माण झालेले आहे. आजच्या भागामध्ये आपण या विप्रो कंपनी बद्दल इत्यंभूत माहिती बघितली असून, विप्रो कंपनीच्या मालकाबद्दल देखील जाणून घेतले आहे.
या कंपनीचे मुख्यालय, कंपनीचे कार्य, अजीम प्रेमजी यांच्या बद्दल काही माहिती, आणि विप्रोच्या संपत्ती आणि नफ्याबद्दल देखील जाणून घेतलेले आहे. ती माहिती तुम्हाला विप्रो कंपनी बद्दल सर्व काही समजण्यासाठी खूपच उपयोगी ठरलेली असेल अशी आशा आहे.
FAQ
विप्रो ही कोणत्या क्षेत्रांमधील दिग्गज कंपनी समजली जाते?
विप्रो ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक दिग्गज कंपनी असून, या क्षेत्रामध्ये सेवा पुरवण्याबरोबरच सल्ला देण्याचे कार्य देखील या कंपनीद्वारे केले जात असते.
विप्रो या कंपनीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
भारतातील बराचसा माहिती तंत्रज्ञान उद्योग हा बेंगलोर आणि कर्नाटक या ठिकाणी एकवटलेला असून, विप्रो या कंपनीचे मुख्यालय भारताच्या बंगळूर या ठिकाणी वसलेले आहे.
विप्रो या कंपनीची स्थापना कोणत्या दिवशी व कोणा द्वारे करण्यात आली होती?
विप्रो या कंपनीची स्थापना दिनांक २८ डिसेंबर १९४५ या दिवशी मोहम्मद प्रेमजी यांच्या हस्ते करण्यात आली होती.
अजीम प्रेमजी यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?
बिल गेट्स हे परदेशी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती असल्यामुळे अजीम प्रेमजी यांना भारताचे बिल गेट्स या नावाने ओळखले जाते.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसाय स्थापन करण्याआधी अझीम प्रेमजी कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करत होते?
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यवसाय स्थापन करणे आधी अझीम प्रेमजी हे साबण व तेल उत्पादनाचा व्यवसाय करत होते.