Yamuna River Information In Marathi मित्रांनो नमस्कार, मित्रांनो भारत या देशांमध्ये नदीला पवित्र आणि मानाचे स्थान प्राप्त आहे. अगदी हिंदू धर्मियांचे धर्मग्रंथ, विविध विधी, इतकेच काय तर लग्नाच्या मंगलाष्टकातही मानाच्या रांगीत देखील भारतीय नद्या विराजमान होताना दिसतात. आज आपण यमुना या भारताच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा नदी बद्दल माहिती घेणार आहोत.
यमुना नदीची संपूर्ण माहिती Yamuna River Information In Marathi
गंगा या सर्वात मोठ्या नदीची यमुना ही प्रथम क्रमांकाची मोठी उपनदी आहे. जिचा उगम यमुनोत्री या ठिकाणी होतो. पुढे मोठा प्रवास करून गंगेला प्रयाग याठिकाणी जाऊन मिळते. या नदीला छोटी सिंधू, बेतवा, चंबळ, केन, आणि सेंगर या प्रमुख नद्या उपनद्या म्हणून कार्य करतात.
या नदीकाठी सर्वपरिचित दिल्ली व आग्रा त्याचप्रमाणे कालपी, इटावा, हमीरपुर आणि प्रयाग ही महत्त्वाची शहरे वसलेली आहेत. गंगा या नदीला यमुना ज्या ठिकाणी जाऊन मिळते, अशा प्रयाग याठिकाणी प्रसिद्ध ऐतिहासिक किल्ला आहे. ब्रज या संस्कृतीत यमुनेला विशेष स्थान प्राप्त आहे.
यमुनेला अगदी पुराणकाळापासून महत्त्व प्राप्त झालेले आहे. लहानपणी आपल्या कानावर पडणारी महत्त्वाची आख्यायिका म्हणजे, वासुदेव बाल श्रीकृष्णाला टोपलीमध्ये घेऊन यमुना नदी पार करून गेले, आणि बाल श्रीकृष्णाच्या पायाचा स्पर्श होताच यमुनेचे पाणी ओसरले.
अशाप्रकारे यमुनेला अनादिकालापासूनच ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. विविध वेदांमध्येही जसे की अथर्ववेद, ऋग्वेद इत्यादी मध्येही यमुने चा उल्लेख आढळतो. गंगा ही जरी तपस्वी लोकांचे माहेरघर मानले जात असले, तरी यमुना करूणा आणि अनंत प्रेम याचे प्रतीक आहे.
श्री वल्लभाचार्य देखील आपल्या ग्रंथात उल्लेख करतात की, कालींद या पर्वतावरून खाली उतरणारी आणि श्रीकृष्णाच्या विविध लीलांची साक्ष असणारी म्हणून तिला कालिंदी या नावाने देखील ओळखले जाते.
या नदीचे पाणी गडद रंगाचे असल्याने त्याचा संबंध भगवान श्रीकृष्णांच्या रंगासोबतही जोडला जातो. यमुना या नदीलाच काही ऐतिहासिक ग्रंथांमध्ये असिता या नावाने देखील ओळखले जाते. आजच्या दिल्लीस्थित ठिकाणाचे उल्लेखदेखील पुराणात बघावयास मिळतात. महाभारत या ग्रंथात इंद्रप्रस्थाची पांडव राजधानी म्हणून देखील यमुनेच्या काठावरील सध्याच्या दिल्लीचा उल्लेख केला जातो.
काही भूगोलतज्ञ/भूवैज्ञानिक या नदी बद्दल विविध पुरावे सादर करतात. त्यांच्यामध्ये पूर्व कालखंडामध्ये यमुना ही घागर नदीची प्रमुख उपनदी होती, मात्र काळाचे ओघात तिने आपला मार्ग पूर्व दिशेने बदलला, आणि त्यामुळे ती गंगेला जाऊन मिळाली आणि गंगेची उपनदी झाली.
तर काहींचा असा देखील दावा आहे की, टेक्नोटिक घटनांमुळे सरस्वती ही नदी कोरडी पडून तिथे थार वाळवंट तयार झाला असावा, आणि हेच कारण हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाचे मूळ ठरले असावे. मात्र आधुनिक भूवैज्ञानिक याबद्दल सांगतात की, यमुनेचे गंगेच्या उपनदी मध्ये रूपांतर प्लेईस्टॉसिन कालखंडादरम्यान झाले असावे, मात्र त्याचा हडप्पा चा ऱ्हासाशी संबंध जोडला जाऊ शकत नाही.
पूर्वीच्या काळी शहरे ही नदीच्या काठी वसविण्याचे संकेत असत. अनेक महान राज्यांच्या राजधान्या नद्यांच्या काठी वसलेल्या असत. यामधील गंगा-यमुनेच्या काठी मगध साम्राज्य, मौर्य साम्राज्य, व शुंगा साम्राज्य या अनेक साम्राज्यांचा उल्लेख बघावयास मिळतो.
पाटलीपुत्र आणि मथुरा यांसारख्या शहरात कृषण आणि गुप्त साम्राज्याचा राजधानी होत्या. येथील सर्वच राज्यांमध्ये नद्या पवित्र मानून त्यांची पूजा केली जात असे.यमुना हि नदी यमुनोत्री या ठिकाणी उगम पावून पुढे गंगेला जाऊन मिळते. यमुना या नदीचे मूळ कालींद या पर्वतास समजले जाते.
हे पर्वत हिमालयातील 6200 मीटर उंचीच्या बर्फाच्छादित शिखरावर उत्तर-पश्चिम दिशेस सात ते आठ मैल अंतरावर आहे. या ठिकाणी यमुना ला कालींदजा किंवा कालिंदी असे संबोधले जाते. या नदीचा प्रवाह यमुनोत्री पर्वतावरून स्पष्ट दिसतो. येथे बर्फाच्या पाण्यापासून या नदीला बरेच पाणी मिळते.
या ठिकाणाला अतीशय पवित्र मानले जाते, त्यामुळे येथे दरवर्षी हजारोंच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी भेट देतात. पुढे ही नदी बरेच डोंगरदऱ्या-खोऱ्यातून वाहते, आणि पुढे हिमालयाला सोडून दून खोऱ्यात येते. पुढे ती बरेच अंतर नैऋत्य दिशेकडे वाहते. आणि गिरी, सिरमौर या आणि अशा अनेक छोट्या नद्या स्वतःमध्ये सामावून घेते. पुढे वाहत जाऊन ती स्वतःला गंगेमध्ये विलुप्त करते.
यमुनेबद्दल अधिक माहिती घ्यायची झाल्यास, या नदीला जुमना असे देखील म्हटले जाते. ही उत्तर भारतातील एक प्रमुख नदी असून, उत्तराखंड व उत्तर प्रदेश येथे प्रामुख्याने या नदीचा लाभक्षेत्र आहे. तसेच मथुरा येथे या नदीवरील मोठा घाट आहे. या नदीला टोन्स, चंबळ, केन,हिंडन आणि बेतवा या प्रमुख उपनद्या तर, सिंध, उत्तगंन,गिरी,रिंद आणि सेंगर यांसारख्या लहान लहान उपनद्या देखील आहेत.
यमुनेला सांस्कृतिक दृष्ट्या देखील फार महत्त्व प्राप्त आहे. गंगेसह यमुने ला देखील पवित्र नदींच्या रांगेत स्थान मिळते. या दोन नद्यांच्या पवित्र संगमावर आर्य संस्कृतीचे दिमाखदार साम्राज्य उभे राहिले. ब्रज संस्कृतीमध्ये यमुनेला फक्त नदी न मानता संस्कृतीची आधारशिला मानले जाते. आणि हीच गोष्ट इथल्या धार्मिक आणि सांस्कृतिक गोष्टींचे प्रतीक आहे.
पौराणिक दृष्ट्या बघताना देखील ही नदी महत्त्वाची ठरते. सूर्य या नदीचे वडील अर्थात पिता मानले जातात, यम याला या नदीचा भाऊ, तर ब्रज संस्कृतीचे जनक भगवान श्रीकृष्णांना यमुनेचा पती म्हणून मानले जाते. या अर्थाने यमुना ही ब्रजवासी यांची आई होय. ब्रज मध्ये या नदीला यमुना मैया असे म्हटले जाते.
यमुना या नदीचे पाणी काळे दिसते असे आपण वर पाहिले, याचमुळे आपणास प्रश्न पडला असेल की यमुना नदी काळी का आहे?, तर भारताची राजधानी अर्थात दिल्लीचा पाण्याचा प्रमुख स्त्रोत यमुनेला समजले जाते. या नदीवर तरंगणारे फोम या नदीचे पाणी काळे करण्यास कारणीभूत ठरते.
असे असले तरीही या नदीकाठावर अत्यंत सुपीक असा प्रदेश निर्माण झाला आहे. शेत जमिनीसाठी गंगा नदी खूप वरदान ठरलेली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा राज्यामध्ये यमुनेमुळे शेती क्षेत्राची भरभराट झाली आहे.
यमुना ही कायम भरपूर पाण्याने भरलेली असते. त्यामुळे दिल्लीसह जवळपास काठावरील साडेसात लाख गावे व वस्त्या या नदीच्या प्रदूषणाचे शिकार ठरतात. या पाण्यात दिल्ली मधून अधिक प्रमाणात फास्फेट सोडले जाते, त्याच प्रमाणे कचरा देखील टाकला जातो.
परिणामी दिवसेंदिवस नदी अधिकच प्रदूषित होत चालली आहे तिच्यावर फोम निर्माण झाल्यामुळे नदीमधील ऑक्सिजनचे प्रमाण देखील कमी होत चालले आहे. परिणामी या नदीमध्ये जलचरांचे प्रमाणदेखील अगदीच नगण्य आहे. म्हणूनच या नदीला मृत नदी असे म्हटले जाते.
यमुना-गंगेच्या किनाऱ्यावर अनेक प्रेक्षणीय स्थळे देखील वसलेली आहेत. यामध्ये शिरगड हे यमुनेच्या काठावरील पहिले महत्त्वाचे शहर आहे. पुढे पूर्व दिशेला काही अंतर वाहिल्यानंतर यमुना दक्षिणेकडे वाहायला लागते, जिथे मथुरा हे प्रेक्षणीय स्थळ आहे. येथे बाल्यावस्थेत भगवान श्रीकृष्णांनी अनेक लीला केल्या या लीलांची साक्ष देणारे अनेक ठिकाणे, तसेच दोहो बाजूंनी वने आणि उद्याने यांनी हा नदीकाठ भरून गेला आहे.
पुढे जाऊन ही नदी ऐतिहासिक स्थळ वृंदावन येथे जाते, व वृंदावनाला तिन्ही बाजूने चक्कर मारते. पुरातन काळापासून वृंदावन येथे यमुनेचे अनेक प्रवाह असल्याने हा प्रदेश द्वीपकल्प सारखा बनलेला आहे.
याच ठिकाणी अनेक एकर गवताळ जमीन होती, तसेच खूप सारे जंगले देखील होती. आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत इथे गायी चारत असत. मात्र आजच्या काळात वृंदावनात यमुना नदीचा एकच प्रवाह बघावयास मिळतो. वृंदावनात यमुनेच्या काठी मोठमोठे घाट आहेत. जिथे अनेक धार्मिक स्थळे, मंदिरे, तीर्थक्षेत्रे आणि धर्मशाळा वसलेल्या आहेत. जे वृंदावणाचे पावित्र्य अधिकच वाढवतात.
तर मित्रांनो पवित्र अशा यमुना नदी बद्दलची माहिती आपणास कशी वाटली?, हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच पुढील लेख कोणत्या विषयावर असावा याबाबतही आपले अभिप्राय नक्की कळवा.