यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण माहिती Yavatmal District Information In Marathi

Yavatmal District Information In Marathi नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण यवतमाळ या जिल्ह्याची माहिती पाहणार आहोत.

Yavatmal District Information In Marathi

यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण माहिती Yavatmal District Information In Marathi

यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. यवतमाळ शहर हे जिल्ह्याची राजधानी आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत.

हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे कापूस पिंजण्याचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवायचे उद्योग आहेत. महाराष्ट्रात यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादनासाठी अग्रेसर असल्यामुळे यवतमाळला कापसाचे शहर किंवा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा(cotton city) म्हटले जाते.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथे उत्खनन केले असता, या ठिकाणी बृहदाश्मयुग-मौर्य व त्यानंतरच्या

उत्तर काळामधील लोकांची या ठिकाणी वस्ती असल्याचे अवशेष मिळाले आहेत. मौर्यनंतरच्या काळात या प्रदेशावर गोंड, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यांच्या सत्ता होत्या.

यवतमाळ जिल्ह्याची स्थापना व नामकरण

ब्रिटिश काळात वऱ्हाड प्रांतात १८६४ साली या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. त्यावेळी हा जिल्हा ‘वणी’  ( मराठी) किंवा ‘ऊन’  ( उर्दू) या नावाने ओळखला जाई. १९०५ मध्ये त्याचे यवतमाळ जिल्हा म्हणून नामांतर करण्यात आले.

१९५६ पर्यंत या जिल्ह्याचा मध्य प्रदेश राज्यात राज्यात समावेश होता. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेत तो मुंबई राज्याला जोडण्यात आला त्यानंतर १ मे १९६० पासून त्याचा महाराष्ट्र राज्यात समावेश करण्यात आला. यवतमाळ  ( लोकसंख्या–  ८९ , ०७१–   १९८१) हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे.

यवतमाळ शहराचे पूर्वीचे नाव यवत किंवा यवती , योतमाड असे होते . आजूबाजूला दाट व उंच झाडांची दाटी असल्यामुळे याला योतमाड असे नाव पडले होते . नंतर याला यवतमाळ म्हणजे माळावर वसले असल्या मुळे यवतमाळ म्हणायला सुरुवात झाली.

यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास

यवतमाळ हे बेरार सल्तनतेचे मुख्य शहर होते आणि जुन्या लिखाणांनुसार “जगातील सर्वात सुरक्षित ठिकाण” होते. यवतमाळ (सध्या यवतमाळ जिल्हा) नंतरचा प्रदेश, अलाउद्दीन हसन बहमन शाह यांच्या राजवटीत १३४७ मध्ये बहमनी सल्तनतीची स्थापना केली.

१५७२ साली, अहमदनगर सल्तनत (वर्तमान दिवस अहमदनगर जिल्हा )चे शासक मुर्तजा शाह, यवतमाळ जिल्हा १५९६ मध्ये, अहमदनगरच्या योद्धा रानी चांद बीबीने यवतमाळ जिल्ह्याचे मुघल साम्राज्य, नंतर भारताच्या मोठ्या भागाचे राज्यकर्ते सोडले.

१७०७ मध्ये सहाव्या मुघल सम्राट औरंगजेबच्या मृत्यूनंतर यवतमाळ हा मराठा साम्राज्यात गेला. १७८३ मध्ये जेव्हा रघोजी भोसले नागपूर साम्राज्याचे शासक झाले तेव्हा त्यांनी आपल्या क्षेत्रात यवतमाळ जिल्हाचा समावेश केला.

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने १८५३ मध्ये बेरार प्रांत उभारल्यानंतर १८६३ मध्ये यवतमाळ पूर्वेकडील बेरार जिल्हा बनला आणि नंतर दक्षिण पूर्व बेरार जिल्हा-मध्य प्रांत आणि बेरार या दोन्ही जिल्ह्यांचा भाग बनला. यवतमाळ १९५६ पर्यंत राज्य पुनर्रचना होईपर्यंत मध्य प्रदेशचा भाग राहिला.

ऐन -ई -अकबरी या प्राचीन ग्रंथात यवतमाळचा उल्लेख दिसून येतो . तसेच अकबरच्या दरबारात अबुल फाजल याच्या लेखकात यवतमाळ मधील योत लोहार या गावाचा उल्लेख पाहायला मिळतो . १९३० साली प्रसिद्ध झालेल्या केसरी प्रबोध या ग्रंथात यवत म्हणून यवतमाळचा उल्लेख मिळतो . १ जानेवारी १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्याने यवतमाळ जिल्हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला.

यवतमाळ जिल्ह्याचा भूगोल

यवतमाळ जिल्हा हा वर्धा पैनगंगा-वैनगंगा खो-याच्या दक्षिण-पश्चिम भागात वसलेला आहे. भौगोलिक दृष्ट्या जिल्ह्याचे स्थान १९.२६’ व २०.४२’ उत्तर अक्षांश मध्ये आणि ७७.१८’व ७९.९’पूर्व रेखांशा मध्ये मोडते. उत्तरे कडून अमरावती व वर्धा जिल्हा, पूर्वेकडून चंद्रपूर जिल्हा, आंध्र प्रदेश व नांदेड जिल्हा दक्षिणेकडून तर परभणी व अकोला जिल्हा पश्चिमे कडून वेढलेला आहे.

जिल्ह्याचे क्षेत्रफळ १३५८२ चौ.कि.मी.(राज्याच्या ४.४१ टक्के) असून २०७७१४४ (राज्याच्या २.६३ टक्के) एवढी लोकसंख्या आहे. लोकसंख्येची घनता १५३ व्यक्ती प्रती चौ.कि.मी. एवढी आहे. राज्याच्या एकूण ३५ जिल्ह्यांपैकी यवतमाळ जिल्ह्याचा क्षेत्रफळाच्या बाबतील ६वा तर लोकसंख्येच्या बाबतीत १९वा क्रमांक लागतो.

जिल्ह्याची भूमी उंचसखल आहे. संपूर्ण जिल्ह्यात अजिंठा डोगरमाला पसरलेल्या असून ,  त्यांमधून वर्धा-पैनगंगा व त्यांच्या उपनद्यांनी खोदलेल्या रुंद दऱ्यांमुळे अजिंठ्याचे डोंगर अनेक ठिकाणी खंडित झाले आहेत. वर्धा–  पैनगंगा व त्यांच्या उपनद्यांनी आपल्या काठांवर ५ ते १५ किमी. रुंदीचे मैदानी प्रदेशाचे पट्टे तयार केले आहेत.

जिल्ह्याचा मध्यवर्ती भाग सस.पासून ३०० ते ५०० मी. उंचीच्या पठारी प्रदेशाने व्यापला असून हा पठारी प्रदेश सामान्यपणे पूर्वेकडे एक किमी.ला दोन मीटर अशा मंद ढाळमानाने उतरत गेलेला दिसतो. ठिकठिकाणी तीव्र उतारही आढळतात. पठारी प्रदेशावर ७० ते १०० मी. उंचीचे कटक निर्माण झालेले असून त्यांवर तीव्र उताराची उंच शिखरे व मेसा आढळतात. पठाराचे उत्तरेकडील वर्धा नदीवरील कडे नदीपासून सरासरी २० किमी.

अंतरावर आहेत. त्या मानाने दक्षिणेकडील पैनगंगा नदीकडील कडे नदीपात्रापासून फारच जवळ आहेत. उत्तरेस ५ किमी.च्या अंतरातच पठाराची उंची २०० मी.नी कमी झालेली दिसते. वर्धा नदीखोऱ्याकडून पठाराचे उत्तर तट करवतीच्या दात्यांप्रमाणे ,  तर दक्षिणेकडील तट अधिक खडबडीत असल्याचे दिसतात.

पुसद तालुक्याच्या पूर्व भागात एकाआड एक अशा टेकड्या व खोगीरसदृश प्रदेश आणि उंच टेकड्या आढळतात. जमिनीच्या उंचसखलपणावरून जिल्ह्याचे मुख्य तीन भौगोलिक विभाग पडतात : ( १) उत्तर भागातील बेंबळा व वर्धा या नद्यांकाठचा सखल प्रदेश , ( २) नैर्ऋत्य व मध्यवर्ती भागांतील डोंगराळ व पठारी प्रदेश व  ( ३) दक्षिणेकडील पैनगंगा नदीखोऱ्याचा सखल प्रदेश.

नद्या व धरणे

यवतमाळ जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या असून, अरुणावती, पुस, अडना, वाघाडी, खुनी, विदर्भा, बेंबळा, रामगंगा व निर्गुणा उपनद्या आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात बेंबळा नदी वरील बेंबळा धरण, अरुणावती नदी वरील अरुणावती धरण व पूस नदी वरील पूस धरण ही मोठी व प्रमुख धरणे आहेत. यापैकी बेंबळा धरण ईसापूर धरण पैनगंगा नदी (पुसद) हे यांपैकी सर्वात मोठे आहे.

हवामान

यवतमाळ जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे असून हिवाळे साधारण थंड असतात. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे ४५·  २० से. व ९० से. आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान ९९ सेंमी. आहे. वायव्येकडून आग्नेयीकडे पर्जन्यमान वाढत जाते.

वायव्य भागात वार्षिक पर्जन्यमान ९० सेंमी. ,  मध्यवर्ती भागात ११० सेंमी. ,  तर आग्नेय भागात ते ११२ सेंमी. आहे. पुसद तालुक्यात सर्वांत कमी  ( ८४ सेंमी.) व यवतमाळ तालुक्यात सर्वांत जास्त  ( ११२ सेंमी.) पाऊस पडतो. एकूण पर्जन्यापैकी ८६% पर्जन्य नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात पडतो. वर्षातील ५० ते ५८ पावसाचे दिवस असतात.

यवतमाळ जिल्ह्याची प्रशासकीय संरचना

 • अमरावती जिल्ह्याचे आयुक्तालय आयुक्तालय हे अमरावती विभाग आहे.
 • जिल्ह्याचे ठिकाण यवतमाळ असून जिल्ह्याचे सात  उपविभाग पडतात ते पुढील प्रमाणे:- पुसद, उमरखेड,राळेगाव, यवतमाळ,
 • दारव्हा, केळापूर, वणी.
 • यवतमाळ जिल्ह्यात एकूण सोळा तालुके असून ते पुढील प्रमाणे:- दारव्हा, यवतमाळ,
 • पुसद, राळेगाव, वणी, बाभूळगाव, कळंब, मारेगाव, पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, नेर, उमरखेड, महागाव,आर्णी, झरी व जामणी.
 • पंचायत समित्या= १६ व ग्रामपंचायती १२०७ असून जिल्ह्यात
 • महानगरपालिका नाही.
 • नगरपालिका१०,पोलीस अधीक्षक०१,यवतमाळ पोलीस अधीक्षक १०,
 • पोलीस स्टेशनची संख्या २६ आहे.

लोकसंख्या

 • सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची
 • लोकसंख्य२७,७२,३४८ इतकी आहे.
 • जिल्ह्याचा साक्षरता दर ८२.८२% असून
 • लिंग गुणोत्तर प्रमाण १००० पुरुषांमागे ९४२ स्त्रिया असे आहे.
 • लोकसंख्येची घनता २०४ एवढी आहे.

जिल्ह्यात अनेक जाती-जमातीचे लोक राहतात. मराठा, मुस्लिम, कुणबी, माळी, बंजारा तसेच आंध, गोंड, परधान, ढोर कोळी(टोकरे-कोळी) आणि कोलाम आणि काही प्रमुख आदिवासी जमाती जिल्ह्यात वास्तव्यास आहेत.

खनिज संपत्तीः

यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यात राजूर,

तालुक्यात राजूर, चनाखा, परमडोह, सिंदोला या भागांत व राळेगाव तालुक्यातील गौराळा व मारेगाव तालुक्यातील मुकुटवन येथेही मोठ्या प्रमाणात चुनखडीसापडते. वर्धा जिल्ह्यातील राजूर, वणी, आष्टोना, चिंचोली, ढाणकी येथे दगडी कोळशाच्याही खाणी आहेत. तसेच पठारी भागात बांधकामाचा काळा दगड सापडतो.यवतमाळ जिल्ह्यातील वणी या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत.

मृदा व जमीन

नद्यांच्या खोऱ्यांतील कमी उंचीच्या सखल प्रदेशात काळी सुपीक मृदा व जास्त उंचीच्या प्रदेशांत जाडीभरडी तपकिरी किंवा तांबडी  ( मुरमाड किंवा ब रड) मृदा आढळते.

वणी तालुक्यात जाडीभरडी तांबडी मृदा ,  केळापूर तालुका ,  यवतमाळ तालुक्याचा दक्षिण-मध्य भाग व पुसद तालुक्यातील डोंगराळ प्रदेशात फिकट तपकिरी व करड्या रंगाची जाडीभरडी ,  खडीयुक्त व भुसभुशीत मृदा आढळते.

यवतमाळ तालुक्याच्या पश्चिम भागात आणि दारव्हा व पुसद तालुक्यांच्या मध्य भागात सुपीक गाळाच्या मृदा आहेत.

यवतमाळ जिल्ह्यातील शेती

शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. एकूण काम करणाऱ्या  ( ४६· २२%) लोकसंख्येपैकी ३०· २७% शेतकरी ,  ५३· ४०% टक्के शेतमजूर आहेत.

प्रमुख पिके

यवतमाळ जिल्हा कापसाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील वर्धा व पैनगंगेच्या खोऱ्यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन होते.

कापसानंतर ज्वारी या पिकाचा क्रमांक लागतो. त्याचबरोबर या जिल्ह्यात तांदूळ, भुईमूग ही खरीप तर गहू, हरभरा ही रब्बी पिके घेतली जातात.

पुसद, उमरखेड व महागाव या तालुक्यांत उसाचे पीकही घेतले जाते. येथे काही ठिकाणी द्राक्षांचेही मळे आहेत. राळेगाव, कळंब या भागात संत्र्याच्या व केळीच्या बागा आहेत. लाडखेड, दारव्हा, दिग्रस व उमरखेड या ठिकाणी विड्याच्या पानांचे मळे आहेत.

कापूस आणि इतर पिकांच्या संकरित व जास्त उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.

लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी २· ६% म्हणजे २१ , ५१० हे. क्षेत्र जलसिंचनाखाली आहे. जलसिंचनाखालील एकूण क्षेत्रापैकी १२ , ९९४ हे. विहिरीखाली व ७ , ०६० हे. क्षेत्र कालव्यांखाली असून १ , ४५६ हे. क्षेत्राला इतर मार्गांनी पाणीपुरवठा केला जातो.शेतीला पूरक म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो.

उद्योगधंदे

औद्योगिक दृष्ट्या यवतमाळ हा विदर्भातील एक मागासलेला जिल्हा आहे. येथे मोठ्या उद्योगांचा विकास फारच कमी झालेला आहे. बरेचसे उद्योग कृषी उत्पादनांवर आधारित आहेत.

तेल व डाळ-गिरण्या ,  कापूस वटणी व दाबणी ,  अन्नधान्य प्रक्रिया ,  लोहारकाम ,  सुतारकाम ,  मातीची भांडी ,  लाकूड कापणी ,  विणकाम ,  बेकरी उत्पादने ,  पादत्राणे ,  दोर ,  कौले व विटा तयार करणे यांसारखे लघू ,  परंपरागत व कुटिरोद्योग बरेच आढळतात. यांतील बहुतेक उद्योग तालुक्यांच्या मुख्य ठिकाणी अधिक प्रमाणात आढळतात. वणी तालुक्यातील चुनखडीच्या साठ्यांमुळे त्यातील राजूर येथे चुनाभट्‌ ट्या  आहेत.

चुनखडी उत्पादनांवर आधारित उद्योगधंदे स्थापन करण्याचे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. वणी तालुक्यातील चनाखा येथे सिमेंट कारखाना उभारण्याची योजना आहे  कारण तेथील चुनखडी सिमेंट उत्पादनयोग्य आहे. राजूर–  वणी–  चनाखा ,  मुकुटबन ,  गौराळा व चनाखा–  भिवकुंड हे मुख्य चुनखडी उत्पादक प्रदेश असून पिसेगाव ,  वरूड ,  चिंचोली इ. ठिकाणी कोळशाचे साठे आहेत.

पुसद व पांढरकवडा येथे सूत व कापडगिरण्या ,  तर पोफळी  ( ता. पुसद) तेथे साखरकारखाना आहे. लाकूड कापण्याच्या गिरण्या ,  लाकडी सामान ,  खेळणी ,  पेन्सिली तयार करणे इ. वनोत्पादनावर आधारित उद्योगधंद्यांच्या वाढीस जिल्ह्यात खूपच वाव आहे.

वणी हे ठिकाण चुन्याच्या व्यापाराकरिता प्रसिद्ध आहे.

पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरी हे ठिकाण दगडापासून फरशी बनविण्याच्या उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.जवळच लोहारा येथे एमआयडीसी (महाराष्ट् इंडस्ट्रियल काॅरपोरेशनने बनवलेली औद्योगिक व्यावसायिकांची उद्योग-वसाहत) आहे.

यवतमाळ जिल्ह्याची वनसंपदा

जिल्ह्यातील ३·  ७२ लाख हेक्टर म्हणजेच जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी २०% क्षेत्र अर ण्यां खाली आहे. जंगलांत साग ,  ऐन ,  बेल ,  तिवर ,  लेंडिया ,  धावडा ,  तेंडू ,  सेमल ,  कारम ,  बांबू हे वृक्षप्रकार आढळत असून ,  साग ह्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांचे प्रमाण अधिक आहे. जंगलांतून इमारती लाकूड ,  बांबू ,  तेंडूची पाने ,  मोह ,  गवत ,  जळाऊ लाकूड ,  डिंक ही प्रमुख उत्पादने मिळतात. अरण्यांत वाघ ,  बिबळ्या ,  अस्वल ,  नीलगाय ,  सांबर भारतीय कुरंग  ( चिंकारा) ,  चितळ ,  रानडुक्कर हे प्राणी व मोर ,  कबूतर ,  तितर ,  लावा इ. पक्षी आढळतात.

जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

आर्णी येथील बाबा कांबलपोत जत्रा (सर्व धर्मातील उपासना स्थळ मानले जाते), घंटाबा जत्रा (दिग्रस), रंगनाथ स्वामी जत्रा (वाणी), इतर गोरे ठिकाण – कळंबा, घाटंजी नरसिंह मंदिराजवळील आंजी येथे. , वणी, तपोना, पुसद, महागाव, कळंब मधील चिंतामणी मंदिर, रंगनाथ स्वामींचे मंदिर (वाणी) इत्यादी पर्यटन स्थळे आणि पंढरकवाड्यातील जगदंबा देवी संस्थान, केळापूर, भवानी हिल-डिग्रस, वाघाडी नदी-निलोना, चापडोह, पिंगलाई देवी.

दळणवळण

या जिल्ह्यातून खालील राष्ट्रीय महामार्ग गेलेले आहेत. वाराणसी-कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ आणि रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ गेलेला आहे. अचलपूर-मूर्तिजापूर- यवतमाळ हा मीटरगेज रेल्वेमार्ग या जिल्ह्यातून जातो.

हे सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

यवतमाळ चे जुने नाव काय?

परंतु १८६४ मध्ये यवतमाळ, दारव्हा, केळापूर व वणी मिळून स्वंतंत्र जिल्हा स्थापन करण्यात आला व त्याचे नाव प्रथम दक्षिण-पूर्व बेरार व नंतर वणी असे ठेवण्यात आले.

यवतमाळ का प्रसिद्ध आहे?

संस्कृती. यवतमाळ हे त्याच्या अनोख्या नवरात्रोत्सव उत्सवासाठी ओळखले जाते, संपूर्ण शहर नवरात्रीसाठी मोठ्या उत्सवाचे आयोजन करण्यासाठी ओळखले जाते.

यवतमाळमधील नवरात्रीसाठी कोणते शहर प्रसिद्ध आहे?

जुन्या शहरातील अवधूत वाडी परिसरातील अभिषेक इंगळे म्हणाले, “नवरात्रीच्या वेळी यवतमाळला ‘ महाराष्ट्राचा कोलकाता ‘ म्हणून ओळखले जाते.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे?

यवतमाळ जिल्हा 16 तालुके, 1169 पंचायती, 1995 गावांमध्ये विभागलेला आहे. झरी जामनी तालुका 72239 लोकसंख्येचा सर्वात लहान तालुका आहे. 335967 लोकसंख्येचा यवतमाळ तालुका हा सर्वात मोठा तालुका आहे.

यवतमाळमध्ये किती गावे आहेत?

यवतमाळ जिल्ह्यात 2147 गावे आहेत.

Leave a Comment