मंडळी नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली. मोदी सरकारने जानेवारी महिन्यात या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. यानुसार, नव्या वेतन आयोगाच्या समितीची लवकरच स्थापना होईल आणि त्याचे अध्यक्ष आणि सदस्य लवकरच नियुक्त होणार आहेत. सध्याचा सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला आहे, आणि एक जानेवारी 2026 पासून आठव्या वेतन आयोगाचा लागू होण्याचा अंदाज आहे. सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाल 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे.
आगामी वर्षी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे आता आपल्याला समजून घ्यायचं आहे की, सध्याच्या सातव्या वेतन आयोगात 40,000, 50,000 आणि 75,000 रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगात किती पगार मिळू शकतो.
सध्याच्या सातव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार फिटमेंट फॅक्टरनुसार ठरवला जातो. सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. आता आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 ते 3.00 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. यावरूनच कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे.
उदाहरणार्थ जर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्याचे मूळ वेतन सध्या 40,000 रुपये असेल, तर सध्याच्या सातव्या वेतन आयोगानुसार त्याचा एकूण पगार 1,02,800 रुपये होतो. नव्या आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.86 घेतल्यास, त्याचा पगार 1,14,400 रुपये होईल, म्हणजेच 11,600 रुपयांची वाढ होईल.
मागील पगार असलेल्या 50,000 रुपये असलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार सध्याच्या सातव्या वेतन आयोगात 1,28,000 रुपये आहे. नव्या आठव्या वेतन आयोगात त्यांचा पगार 1,43,000 रुपये होईल, म्हणजेच 15,000 रुपयांची वाढ होईल.
तसेच जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 75,000 रुपये असेल, तर त्याला सध्याच्या वेतन आयोगानुसार 1,92,750 रुपये मिळतात. नव्या आठव्या वेतन आयोगात त्यांचा पगार 2,14,500 रुपये होईल, म्हणजेच 19,750 रुपयांची वाढ होईल.
आठव्या वेतन आयोगामुळे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा आहे. यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल.