मंडळी आंतरराष्ट्रीय बाजारातील घटनांमुळे सोन्याच्या किंमतीत चढ-उतार होत आहेत. सोन्याने एक लाख रुपये प्रति तोळा दर गाठला, पण आता त्यात काहीशी घसरण दिसून येत आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये पुन्हा चढ-उतार होत असल्याचे स्पष्ट आहे.
आज सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा तेजी दिसून आली. याआधी २५ एप्रिल रोजी सोन्याच्या किंमतींनी ३५००.०५ डॉलर प्रति औंस या सर्वकालीन उच्चांकाला स्पर्श केला होता. मात्र त्यानंतर एक दिवसाच्या आत, २४ एप्रिल रोजी किमतींमध्ये मोठी घसरण झाली होती. तरीही, गुंतवणूकदारांनी घसरणीत सोनं खरेदी करण्याची रणनीती स्वीकारली, तसेच डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याचे दर पुन्हा वाढले.
अमेरिके-चीन व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर बाजार सतत चढ-उतारत आहेत. ट्रेडर तै वाँग यांनी सीएनबीसीला सांगितले की, हा चढ-उतार मुख्यता टॅरिफ वॉरमुळे होत आहे. चीनने स्वतःला पीडित दाखवले आणि डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतींमध्ये वाढ झाली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, ३५०० डॉलरपर्यंतची वाढ थोडी जास्त होती, आणि आता सोन्याच्या बाजारात साइडवे ट्रेडिंग दिसत आहे. पण, बाजारातील सकारात्मक ट्रेंड पाहता, घसरणीला खरेदीच्या संधी म्हणून पाहता येईल.
ट्रेड वॉरचा परिणाम
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध सध्या तीव्र होत आहे. दोन्ही देशांमध्ये परस्पर कर लावण्याची घोषणा करण्यात आली आहे. चीनने आक्रमक भूमिका घेतली असताना, अमेरिकेने चर्चेचा मार्ग खुले ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. यावर चीनने अमेरिकेच्या एकतर्फी कर लावण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांना हटवण्याची धमकी दिली, पण त्यानंतर ते एक पाऊल मागे घेतल्यामुळे बाजाराला दिलासा मिळाला.
सोनं – सुरक्षित गुंतवणूक पर्याय
सध्या बाजार टॅरिफ वॉर आणि अमेरिका-चीन संबंधांवर लक्ष केंद्रित करत आहे. सोनं एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून उदयास येत आहे. जर व्यापार युद्धाची अनिश्चितता कायम राहिली, तर सोनं गुंतवणूकदारांचा प्रमुख पर्याय राहू शकेल. तसेच, डॉलर आणि शेअर्समध्ये कमकुवतपणा असल्यास, सोन्याचे भाव पुन्हा उच्चांक गाठू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.