मित्रांनो जर तुमची मे महिन्यात बँकेत काही महत्त्वाची कामे असतील, तर बाहेर पडण्यापूर्वी बँकांच्या सुट्ट्यांची यादी एकदा नक्की पाहा. मे महिन्यात एकूण ११ दिवस बँका बंद राहणार आहेत. काही सुट्ट्या राज्यानुसार आहेत, तर काही संपूर्ण देशात लागू आहेत.
1 मे – महाराष्ट्र दिन. महाराष्ट्रात बँका बंद राहतील.
2 मे – रवींद्रनाथ टागोर जयंती. ही सुट्टी महाराष्ट्र वगळता इतर काही राज्यांमध्ये असेल.
4 मे – रविवार. देशभरातील बँका बंद राहतील.
10 मे – दुसरा शनिवार. देशभरात बँका बंद.
11 मे – रविवार. बँका बंद.
12 मे – बुद्ध पौर्णिमा. बऱ्याच राज्यांमध्ये बँका बंद राहतील.
16 मे – सिक्कीम राज्य दिवस. फक्त सिक्कीममध्ये बँका बंद राहतील.
18 मे – रविवार. सर्वत्र बँका बंद राहतील.
24 मे – चौथा शनिवार. देशभरातील बँका बंद.
25 मे – रविवार. बँका बंद.
26 मे – इस्लाम जयंती. त्रिपुरा राज्यात बँका बंद राहतील.
जर तुमचे काम अत्यंत तातडीचे असेल, तर तुम्ही डिजिटल बँकिंगचा वापर करून अनेक सेवा घरबसल्या घेऊ शकता.
ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका.