मंडळी केंद्र सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. मात्र अद्याप आयोगाची औपचारिक स्थापना झालेली नाही. अध्यक्ष व सदस्यांची निवड रखडल्याने कर्मचारी वर्गात अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
नवीन घडामोडी काय आहेत?
नॅशनल कौन्सिल (JCM) च्या कर्मचारी पक्षाने आठव्या वेतन आयोगासाठी मेमोरेंडम तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे आयोगाच्या स्थापनेला गती मिळण्याची शक्यता आहे.
17 एप्रिल 2025 रोजी अर्थ मंत्रालयाच्या व्यय विभागाने एक सर्क्युलर जाहीर केले, ज्यात 35 पदांवर डेप्युटेशनद्वारे नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती देण्यात आली. म्हणजेच आयोग अजून अधिकृतरित्या स्थापण्यात आलेला नसला, तरी तयारी सुरू आहे.
22 एप्रिल रोजी JCM च्या विस्तारित बैठकीत किमान वेतन, पे स्केल, फिटमेंट फॅक्टर, भत्ते, पदोन्नती धोरण, आणि पेन्शन लाभ यावर सखोल चर्चा झाली. यासाठी ड्राफ्टिंग कमिटी स्थापन करण्यात आली असून विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी त्यात सहभागी आहेत.
या समितीची महत्त्वाची बैठक जूनमध्ये होणार असून, त्याआधी सर्व संघटनांनी 30 एप्रिलपर्यंत प्रतिनिधींची नावे द्यावीत व 20 मेपर्यंत सूचना PDF व Word फॉरमॅटमध्ये पाठवाव्यात असे निर्देश देण्यात आले आहेत.
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार?
सातवा वेतन आयोग जानेवारी 2016 मध्ये लागू झाला होता, आणि त्याची मुदत 31 डिसेंबर 2025 ला संपणार आहे. पारंपरिक दृष्टीने पाहता, प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू होतो. त्यामुळे आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय 2027 मध्ये होऊ शकतो आणि थकबाकीची रक्कम नंतर खात्यात जमा केली जाईल.