मंडळी शासनाच्या विविध योजनांचे अनुदान (Government Scheme Subsidy) डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर केले जातात. या योजनांमध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना, पीएम किसान, पिक विमा योजना (Pik Vima Yojana) आणि इतर शासकीय योजनांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांना अनेकदा प्रश्न पडतो की त्यांच्या बँक खात्यात कोणत्या खात्यात शासकीय योजनांचे अनुदान येईल, विशेषता पिक विमा किंवा अतिवृष्टी अनुदानाचे पैसे कोणत्या बँकेत ट्रान्सफर होणार आहेत.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांना पिक विमा अनुदान त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात येत असतो. परंतु, नेमकी कोणती बँक त्याच्या खात्यात अनुदान ट्रान्सफर करणार हे समजून घेणं कधीकधी कठीण होऊ शकतं. म्हणून, आपण एनपीसीआय (NPCI) वेबसाइटवरून सोप्या पद्धतीने माहिती मिळवू शकतो.
एनपीसीआय वेबसाइटवर जाण्याचा मार्ग
1) सर्वप्रथम, एनपीसीआय च्या अधिकृत वेबसाइटवर प्रवेश करा.
2) निळ्या रंगात दिलेल्या पर्यायांमधून दुसरा पर्याय Consumer निवडा.
3) यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल या पर्यायावर क्लिक करा.
4) पुढील पृष्ठावर Enter Your Aadhaar असा पर्याय दिसेल, जिथे आपला आधार क्रमांक टाकावा लागेल.
5) आधार क्रमांक नंतर, खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून Submit बटणावर क्लिक करा.
6) नंतर, आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर ओटीपी (One Time Password) प्राप्त होईल. तो ओटीपी आपण प्रविष्ट करावा लागेल.
7) ओटीपी टाकल्यानंतर Confirm पर्यायावर क्लिक करा.
8) यानंतर आपल्यासमोर आपली बँक खात्याची माहिती दिसेल, ज्यात आधार नंबर, बँकेचे नाव, अकाउंट नंबर, अकाउंट होल्डरचे नाव आणि बँक खात्याचा प्रकार यांचा समावेश असेल.
या सर्व प्रक्रियेनंतर, आपल्याला लक्षात येईल की आपल्या आधार संलग्न बँक खात्यावरच शासकीय योजनांचे अनुदान वितरित होणार आहे. या प्रक्रियेद्वारे शेतकऱ्यांना कोणत्या बँकेत अनुदान येईल हे सहज समजून घेता येईल.