मित्रांनो कोणतीही मोठी खरेदी करताना, विशेषता घर खरेदी करताना, अनेकांना कर्जाची गरज भासते. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल राखताना बऱ्याचदा गृहकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घ्यावे लागते. मात्र याबाबत योग्य माहिती असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गृहकर्ज घेताना खर्चाचे नियोजन
घर खरेदी करताना बहुतांशजण गृहकर्जाचा आधार घेतात. या कर्जामुळे घराच्या एकूण किंमतीचा मोठा भाग सहज भागवता येतो. मात्र घरासाठी लागणारे डाउन पेमेंट, नोंदणी शुल्क (रजिस्ट्रेशन फी), तसेच दुरुस्ती किंवा नूतनीकरण यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो.
वैयक्तिक कर्जाची गरज का भासते?
अनेकदा लोक या अतिरिक्त खर्चासाठी स्वतःची बचत वापरण्याऐवजी वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याचा विचार करतात. मात्र आधीपासून गृहकर्ज सुरू असताना वैयक्तिक कर्ज घेता येईल का, याविषयी अनेकांना शंका असते.
वैयक्तिक कर्जाचे वैशिष्ट्ये
- वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित कर्ज मानले जाते, म्हणजेच यासाठी कोणतीही तारण (security) द्यावी लागत नाही.
- या कर्जाची परतफेड कालावधी तुलनेने कमी असतो, पण व्याजदर मात्र थोडा अधिक असतो.
- कर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद आणि सोपी असते.
- जर तुमचा क्रेडिट स्कोअर ७०० किंवा त्याहून अधिक असेल, तर वैयक्तिक कर्ज सहज मिळण्याची शक्यता असते.
- मात्र मासिक उत्पन्नाचा ५०% पेक्षा जास्त भाग ईएमआयमध्ये खर्च होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गृहकर्ज घेत असताना किंवा घेतल्यानंतर वैयक्तिक कर्जाची आवश्यकता भासल्यास, योग्य माहिती आणि नियोजन आवश्यक आहे. परतफेडीची क्षमता, मासिक खर्च आणि कर्जाच्या अटी यांचा नीट विचार करूनच पुढे पाऊल टाकावे.