मंडळी म्युच्युअल फंडातील एसआयपी (Systematic Investment Plan) गुंतवणूक दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. विशेषता दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने एसआयपी एक अत्यंत प्रभावी साधन आहे, कारण यामुळे बाजारातील जोखीम कमी होते. म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचे आकर्षण म्हणजे, अगदी १०० रुपयांपासूनही तुम्ही गुंतवणूक सुरू करू शकता.
एसआयपीमुळे, गुंतवणूकदारांना आर्थिक शिस्त लागते, ज्यामुळे त्यांची वित्तीय स्थिती अधिक मजबूत होते. आणि जर तुम्हाला निवृत्तीपर्यंत चांगला निधी तयार करायचा असेल, तर म्युच्युअल फंड ही एक चांगली गुंतवणूक योजना आहे.
चक्रवाढ व्याजाचा प्रभाव
गेल्या काही महिन्यांत, शेअर बाजारात चांगली उलथापालथ झाली आहे. बाजाराने उच्चांकी पातळी गाठली आणि नंतर घसरला. अनेक गुंतवणूकदारांनी या घसरणीमुळे आपली गुंतवणूक काढून घेतली. पण, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा प्रवाह यामध्ये कमी झाला नाही. दीर्घकाळ नियमितपणे एसआयपीद्वारे गुंतवणूक केल्यास, तुम्ही एक मोठा निधी निर्माण करू शकता.
सामान्यपणे, म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये १२ टक्के सरासरी परतावा मिळण्याची शक्यता असते, परंतु हे बाजाराच्या चढ-उतारावर अवलंबून असते.
तुम्ही १ कोटी रुपये कसे जमा करू शकता?
जर तुम्हाला दरमहा ५००० रुपये एसआयपीद्वारे गुंतवायचे असतील आणि १ कोटी रुपये जमा करायचे असतील, तर तुम्हाला साधारणपणे २७ वर्षे गुंतवणूक करावी लागेल. यासाठी, तुम्हाला २७ वर्षे दरमहा ५००० रुपये गुंतवावे लागतील. यामुळे एकूण १६,२०,००० रुपये गुंतवले जातील, आणि १२ टक्के चक्रवाढ व्याजाने, तुम्हाला २७ वर्षांनंतर १,०८,११,५६५ रुपयांचा निधी मिळेल. यामध्ये ९१,९१,५६५ रुपये नफा मिळेल.
टीप — या लेखात दिलेली माहिती एक सामान्य मार्गदर्शन म्हणून आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजाराच्या जोखमीच्या अधीन असते. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.