मित्रांनो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने इंडियन बँक आणि महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस (M&M Financial Services) यांच्यावर महत्त्वाची कारवाई केली आहे.
इंडियन बँकवर दंड
बँकिंग नियमन कायद्याच्या काही तरतुदींचा भंग केल्यामुळे आणि कर्जावरील व्याजदर, किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) क्षेत्रातील कर्जाबाबतच्या निर्देशांचे पालन न केल्यामुळे इंडियन बँकेला १.६१ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसवर कारवाई
महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसला देखील नियामक अनुपालनात आढळलेल्या त्रुटींमुळे ७१.३० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की या कारवाईचा हेतू संबंधित संस्थांनी ग्राहकांशी केलेल्या व्यवहारांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे नाही.
बँकेचा परवाना रद्द
याशिवाय रिझर्व्ह बँकेने जालंधर येथील इम्पीरियल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँके चा परवाना रद्द केला आहे. बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याने आणि भविष्यात उत्पन्नाची शक्यता नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच, पंजाबच्या रजिस्ट्रार ऑफ को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांना बँक बंद करण्याचे आणि लिक्विडेटर नेमण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तसेच औरंगाबाद येथील अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मर्यादित चा परवाना देखील २२ एप्रिल रोजी रद्द करण्यात आला होता. याच कारणास्तव, म्हणजे भांडवल आणि कमाईची कमी शक्यता असल्याने, रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे.