मित्रांनो एलआयसीने जीवन अक्षय ही नवीन विमा पॉलिसी सादर केली आहे. ही योजना अशा व्यक्तींकरिता आहे ज्यांना एकदाच गुंतवणूक करून नियमित पेन्शन हवी आहे. या योजनेत एकदाच रक्कम भरल्यानंतर लगेच पुढच्या महिन्यापासून पेन्शन मिळायला सुरुवात होते.
या योजनेत सहभागी होण्यासाठी वयाची अट २५ वर्षांपासून ८५ वर्षांपर्यंत आहे. त्यामुळे तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणालाही ही पॉलिसी घेता येते. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरू शकते.
जर एखाद्या व्यक्तीने १० लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर त्याला दर महिन्याला सुमारे ५४०० रुपये पेन्शन मिळते. ही रक्कम वयाच्या १०० वर्षांपर्यंत मिळू शकते. गुंतवणूक केलेल्या रकमेच्या प्रमाणावर पेन्शनची रक्कम ठरते. उदाहरणार्थ १ लाख रुपये गुंतविल्यास त्यानुसार दर महिन्याचे उत्पन्न कमी असते, पण नियमित मिळते.
या योजनेत गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही. ज्यांना दर महिन्याला निश्चित रक्कम मिळावी असे वाटते, त्यांच्यासाठी ही योजना फायदेशीर ठरते.
ही पॉलिसी एकट्याने किंवा जोडीने (jointly) घेता येते. पेन्शन घेण्याचे चार पर्याय आहेत – मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक. गुंतवणूकदार या पैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतो.
एकदा पैसे भरल्यावर निवडलेल्या कालावधीप्रमाणे पेन्शन थेट बँक खात्यात जमा होते. ही योजना निवृत्तीनंतरचा आधार ठरू शकते.
जीवन अक्षय पॉलिसीविषयी अधिक माहितीसाठी LIC च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी – https://licindia.in/jeevan-aksha