मंडळी आपलं भविष्य आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित असावं, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे अनेकजण विविध बचत व गुंतवणूक योजनांचा विचार करतात. अशा योजनांमध्ये एलआयसी न्यू जीवन शांती ही एक उत्तम निवड ठरू शकते. ही योजना विशेषता निवृत्तीनंतरची आर्थिक गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
एकदाच गुंतवणूक, आजीवन पेन्शन
एलआयसीची न्यू जीवन शांती पॉलिसी ही सिंगल प्रीमियम रिटायरमेंट योजना आहे. म्हणजेच या योजनेत फक्त एकदाच गुंतवणूक करावी लागते आणि त्यानंतर दरवर्षी ठराविक रक्कम पेन्शन म्हणून मिळत राहते. उदाहरणार्थ जर एखाद्या ५५ वर्षीय व्यक्तीने ११ लाख रुपये गुंतवले आणि पॉलिसी पाच वर्षांसाठी होल्ड केली, तर त्याला दरवर्षी सुमारे १,०१,८८० रुपये म्हणजेच दरमहा सुमारे ८,१४९ रुपये पेन्शन मिळू शकते.
वयाची अट आणि गुंतवणुकीचे पर्याय
या योजनेत ३० ते ७९ वयोगटातील कोणीही सहभागी होऊ शकतो. यामध्ये दोन पर्याय उपलब्ध आहेत.
1) Deferred Annuity for Single Life – एकट्या व्यक्तीसाठी
2) Deferred Annuity for Joint Life – दोघांसाठी (जसे की पती-पत्नी)
या योजनेत तुम्ही तुमच्या पेन्शनची निश्चित रक्कम ठरवू शकता, जी तुम्हाला नियमितपणे आयुष्यभर मिळत राहते.
कमी गुंतवणुकीतही सुरुवात शक्य
या पॉलिसीत किमान १.५ लाख रुपये गुंतवून सुरुवात करता येते, आणि जास्तीत जास्त रक्कमेस मर्यादा नाही. तसेच, ही योजना कोणत्याही जोखीमशिवाय (रिस्क कव्हर नसलेली) असूनही भरघोस परतावा देते, ज्यामुळे भविष्यातील आर्थिक गरजांची चिंता वाटत नाही.