शून्य चार्जेस आणि कमी व्याज दरात मिळणार लोन , पहा सविस्तर माहिती

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
Loans will be available at zero charges and low interest rates.

मित्रांनो आज अनेक लोक आपल्या दरमहा मिळणाऱ्या उत्पन्नातून सर्व गरजा पूर्ण करू शकत नाहीत. अशा वेळी घर खरेदी करायचं असो, कार विकत घ्यायची असो किंवा शिक्षणासाठी खर्च करायचा असो – बँकेकडून कर्ज घेणे ही एक सोपी आणि गरजेची निवड ठरते. देशभरातील विविध बँका वेगवेगळ्या व्याजदरांवर वेगवेगळ्या प्रकारची कर्जे ग्राहकांना देत असतात.

अशाच पार्श्वभूमीवर पंजाब नॅशनल बँक अर्थात पीएनबी ही देशातील दुसऱ्या क्रमांकाची सरकारी बँक आता पीएनबी निर्माण २०२५ हे विशेष लोन कॅम्पेन घेऊन आली आहे. हे कॅम्पेन २० जून २०२५ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी सुरू राहणार आहे. या मोहिमेअंतर्गत ग्राहकांना गृहकर्ज, वाहन कर्ज आणि शैक्षणिक कर्ज मिळणार असून, यासाठी विशेष सवलती दिल्या जात आहेत.

या कॅम्पेनमध्ये मिळणारी कर्जे अत्यंत कमी व्याजदराने दिली जातील. विशेष म्हणजे गृहकर्ज आणि कार लोन घेताना ग्राहकांकडून कोणतीही प्रोसेसिंग फी आकारली जाणार नाही. शिवाय कर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले डॉक्युमेंटेशन शुल्कही पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. याखेरीज, ठराविक रकमेपेक्षा अधिक असलेल्या गृहकर्जावर ग्राहकांना वकिलामार्फत मिळणारे नॉन इन्कमबेन्सी सर्टिफिकेट म्हणजेच एनईसी हे प्रमाणपत्र देखील मोफत दिलं जाणार आहे.

जर तुम्ही सध्या कर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर पीएनबी निर्माण २०२५ कॅम्पेन तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. ही मोहीम केवळ मर्यादित कालावधीसाठीच सुरू आहे, त्यामुळे या संधीचा फायदा घेण्यासाठी वेळेवर निर्णय घेणं गरजेचं आहे.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment