मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. आतापर्यंत या योजनेद्वारे नऊ हप्ते वितरित करण्यात आले असून, एप्रिल हप्त्यासाठी महिलांना प्रतीक्षा होती. मिळालेल्या माहितीनुसार, दहावा हप्ता 30 एप्रिल 2024, अक्षय तृतीयेच्या दिवशी, लाभार्थींच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे.
या योजनेअंतर्गत राज्य सरकारने गरजू महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. 2024 मध्येही ही मदत सुरूच असून दहावा हप्ता मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
निकष अधिक कठोर
महिला आणि बालविकास विभागाने योजनेच्या पात्रतेबाबतची तपासणी अधिक काटेकोरपणे सुरू केली आहे. यामुळे अनेक महिलांना अपात्र ठरवले जात आहे. राज्यातील 11 लाख महिलांना आतापर्यंत योजनेतून वगळण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये अर्जांची पुनर्तपासणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांची संख्या लवकरच अपडेट होणार आहे.
वैयक्तिक लाभावर मर्यादा
ज्या महिलांना आधीच इतर शासकीय योजनांतून नियमित आर्थिक लाभ मिळतो, उदा. शेतकरी सन्मान योजनेतून ₹12,000 वार्षिक, त्यांना लाडकी बहीण योजनेतून फक्त ₹500 चा हप्ता दिला जाणार आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या हप्त्यांमध्ये फरक पडण्याची शक्यता आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील आकडेवारी
सध्या संभाजीनगर जिल्ह्यात 9 लाख 32 हजार 250 महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. राज्यभरात प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांची संख्या बदलत आहे, कारण अपात्र महिलांची नावे योजनातून वगळली जात आहेत.