मंडळी आपल्यापैकी अनेक लोक बँकेत पैसे ठेवतात, कारण त्यांना वाटतं की ते पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत देशातील काही बँका बुडाल्या असल्याचे आपल्याला पाहायला मिळालं आहे. यामध्ये विशेषता सरकारी बँकांचा समावेश आहे. त्यामुळे सर्वांत सुरक्षित बँका कोणत्या, आणि अशा बँकांना कधीही बुडण्याचा धोका नाही, असा प्रश्न अनेक लोक विचारतात. चला, तर मग याबद्दल अधिक माहिती घेतो.
भारतातील बँकिंगचा विस्तार
आजकाल भारतात बँकिंग व्यवस्थेचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. प्रत्येक गावापर्यंत, अगदी खेड्यापर्यंत बँकिंग सुविधांमध्ये वाढ झाली आहे. मोदी सरकारच्या योजना आणि भारतातील डिजिटलायझेशनमुळे, बँक खात्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून गुगल पे, फोन पे, पेटीएम, आणि इतर यूपीआय पेमेंट एप्सद्वारे लोक अधिक सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने आर्थिक व्यवहार करत आहेत.
डिजिटल पेमेंट्स आणि त्याचा प्रभाव
आजकालच्या डिजिटल युगात, बँकिंग व्यवहार आधीच्या पेक्षा अधिक सुलभ आणि जलद झाले आहेत. यामुळे पैशांची देवाणघेवाण कागदावरून अधिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होऊ लागली आहे, ज्यामुळे कॅश फ्लो कमी झाला आहे.
बँकांची सुरक्षा आणि आरबीआयचे नियम
भारतामधील बँकिंग व्यवस्थेवर भारतीय रिझर्व बँक (RBI) चा पूर्णत: नियंत्रण आहे. RBI च्या नियमांचे पालन करणं बँकांना अत्यंत महत्त्वाचं असतं. जर एखादी बँक दिवाळखोरीत गेली, तर RBI त्याची लायसन्स रद्द करू शकते. यामध्ये बऱ्याच बँकांची लायसन्स रद्द केली गेली आहेत, म्हणून देशातील सुरक्षित बँकांचा शोध घेतला जातो.
भारतातील सर्वात सुरक्षित बँका कोणती?
भारतीय रिझर्व बँकेने नुकतीच तीन बँकांना सर्वात सुरक्षित म्हणून घोषित केलं आहे. या बँकांमध्ये एक सरकारी आणि दोन खाजगी बँकांचा समावेश आहे:
1) स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) – भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक.
2) एचडीएफसी बँक – भारतातील सर्वात मोठी खाजगी बँक.
3) आयसीआयसीआय बँक – दुसऱ्या क्रमांकावर असलेली खाजगी बँक.
ही तीन बँका भारतीय रिझर्व बँकेने डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक (D-SIBs) म्हणून घोषित केली आहेत. याचा अर्थ, या बँकांचा धोका देशाच्या आर्थिक व्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर परिणाम करू शकतो, म्हणून त्यांना अधिक सुरक्षित मानलं जातं.