हा व्यवसाय सुरु करून तुम्ही वर्षाला मिळवू शकता 7 लाख रुपये , जाणून घ्या सविस्तर माहिती

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
new business stsrtup

मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या जगात चांगली नोकरी मिळवणं खूप कठीण झालं आहे. अनेक तरुण शिक्षण पूर्ण करूनही रोजगारासाठी संघर्ष करत आहेत. मात्र व्यवसाय हा नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न देणारा पर्याय ठरू शकतो, हे आता अनेकांनी अनुभवातून शिकले आहे. विशेषता कोरोना काळानंतर अनेक तरुणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यशही मिळवलं.

पण व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे कोणता व्यवसाय करावा? जर तुम्हीही कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवणारा व्यवसाय शोधत असाल, तर इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन ही एक उत्तम कल्पना ठरू शकते. हा व्यवसाय सध्या झपाट्याने वाढतोय आणि त्यातून वर्षाकाठी सात लाख रुपयेपर्यंत नफा मिळू शकतो.

इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतात प्रचंड वाढत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती गगनाला भिडत असताना, लोक स्वस्त आणि पर्यावरणपूरक पर्यायाकडे वळत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक गाड्यांचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकार देखील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहेत. काही ठिकाणी ई-वाहनांसाठी टोल माफ करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी अनुदान दिलं जात आहे. त्यामुळे या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर संधी आहे.

जर तुमच्याकडे चार ते पाच गाड्या पार्क करता येईल अशी जागा असेल, तर तुम्ही चार्जिंग स्टेशन सुरू करू शकता. जागा नसेल तरी हरकत नाही, ती भाड्याने घेऊनही व्यवसाय सुरू करता येतो. सुरुवातीला एका चार्जिंग पॉइंटने सुरुवात करून नंतर गरजेनुसार वाढ करता येते.

गुंतवणुकीचा विचार करता, हा व्यवसाय एक लाख ते दहा लाख रुपये यामध्ये सुरू करता येतो. दुचाकी व रिक्षा चार्जिंगसाठी अंदाजे पाच लाख रुपये लागतात. चार्जिंग पॉइंटसाठी लागणारे खर्च चार्जरच्या प्रकारानुसार वेगळे असतात. साधा AC चार्जर ६५ हजार रुपयांपासून उपलब्ध असतो, तर फास्ट चार्जर १४ लाख रुपये खर्चिक असतो. या व्यवसायात वीजेचा खर्च वीज वितरण कंपनीच्या कमर्शियल दरानुसार असतो.

चार्जिंग स्टेशनमधून कमाई ही दर युनिट वीजेच्या वापरावर होते. कंपन्या चार्जिंग पॉइंटसाठी कमिशन ठरवतात. यामध्ये वीज खर्च, जागेचं भाडं आणि देखभाल यांचा विचार करून प्रति युनिट नफा निश्चित केला जातो. दररोज किमान दोन हजार रुपयांचा निव्वळ नफा सहज मिळू शकतो. महिन्याला साठ हजार आणि वर्षाकाठी सात लाख रुपये मिळू शकतात.

यात विशेष लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, सरकार या व्यवसायासाठी अनुदान देत आहे. त्यामुळे सुरुवातीला होणारा खर्च कमी होतो आणि व्यवसाय अधिक सहजतेने सुरू करता येतो. वेळेचं बंधन नसलेला आणि स्वतःच्या नियंत्रणात असलेला हा व्यवसाय अनेक तरुणांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment