मंडळी अलीकडच्या काळात जीवन खूपच अनिश्चित झाले आहे. कोणत्याही क्षणी कोणाचा मृत्यू होईल याचा अंदाज बांधता येत नाही. अशा परिस्थितीत, आपल्या पश्चात कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी योग्य ती तरतूद असणे अत्यावश्यक आहे. मात्र सर्वसामान्य माणसाला महागड्या विमा योजनांमध्ये गुंतवणूक करणे शक्य होत नाही. यासाठी केंद्र सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) सुरू केली आहे.
ही योजना २०१५ साली सुरू करण्यात आली असून यामार्फत कमी प्रीमियममध्ये जीवन विमा मिळतो. विशेष बाब म्हणजे, या योजनेचा वार्षिक प्रीमियम इतका कमी आहे की तो एखाद्या महिन्याच्या मोबाईल रिचार्जइतकाच आहे.
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना म्हणजे काय?
PMJJBY अंतर्गत लाभार्थ्याला २ लाख रुपयांचा जीवन विमा मिळतो. या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त ४३६ रुपये आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वस्त दरात जीवन विमा उपलब्ध करून देणे.
योजनेसाठी पात्रता
- वय १८ ते ५० वर्षे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येतो.
- विमा घेणाऱ्याचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुक आणि ऑटो डेबिट संमतीपत्र लागते, जेणेकरून प्रीमियमची रक्कम थेट बँक खात्यातून वजा होऊ शकेल. दावा (क्लेम) कसा मिळतो?
जर विमाधारकाचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती कोणत्याही कारणामुळे झाला, तर कुटुंबियांना २ लाख रुपयांचा विमा दावा मिळतो. त्यामुळे कमी बजेटमध्ये विमा घेण्याचा विचार करत असाल, तर ही योजना तुमच्यासाठी एक योग्य पर्याय आहे.