मित्रांनो स्वतःचे घर असावे, हे प्रत्येक माणसाचे स्वप्न असते. घर असलं की माणूस सुरक्षित, आनंदी आणि स्थिर आयुष्य जगू शकतो. मात्र आजही अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणीमुळे स्वतःचं घर बांधणं शक्य होत नाही. ही गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच PMAY, ही गरीब आणि गरजू लोकांसाठी एक मोठी मदत ठरते.
या योजनेत सरकारकडून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते. योजना आता 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्यांना अजूनपर्यंत घर मिळालं नाही, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
महाराष्ट्रातील लोकांसाठी ही योजना विशेष लाभदायक ठरणार आहे. राज्यात जवळपास 20 लाख कुटुंबांना या योजनेअंतर्गत घरे मिळणार आहेत. ही योजना केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या संयुक्त सहकार्याने राबवली जाते. त्यामुळे योजना अधिक प्रभावी आणि पारदर्शक पद्धतीने अंमलात आणली जाते.
गावात राहणाऱ्या लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी 1 लाख 20 हजार रुपये तर शहरात राहणाऱ्यांना 1 लाख 30 हजार रुपयांची थेट बँक खात्यावर मदत दिली जाते. हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात असल्यामुळे कोणताही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार टाळला जातो.
योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. यामध्ये जमिनीचे कागद म्हणजे 7/12 उतारा किंवा मालमत्ता पत्र, ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, जातीचा दाखला, बीपीएल कार्ड, बँकेचे पासबुक, वीजबिल आणि मनरेगा कार्ड (गावातील अर्जदारांसाठी) यांचा समावेश होतो.
अर्ज करण्यासाठी दोन पर्याय आहेत – ऑनलाइन आणि ऑफलाइन. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नवीन नोंदणी वर क्लिक करावे, माहिती भरावी आणि कागदपत्रे अपलोड करून अर्ज पाठवावा. त्यानंतर पावती मिळवावी. ऑफलाइन अर्जासाठी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीत तर शहरी भागातील नागरिकांनी नगरपालिका किंवा महानगरपालिका कार्यालयात संपर्क साधावा. अर्जाचा फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रांसह तो सादर करावा.
या योजनेमुळे केवळ घर मिळत नाही, तर महिलांना घर त्यांच्या नावावर दिलं जात असल्यामुळे महिलांना सन्मान आणि अधिकार मिळतो. स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण होतो. घरोघरी सौरऊर्जा आणि पावसाच्या पाण्याचे संचयन अशा सुविधा मिळतात. संपूर्ण जीवनमानात सुधारणा होते.
एकूणच प्रधानमंत्री आवास योजना 2025 ही गरजूंना देऊन त्यांना नव्या आयुष्याची संधी देणारी योजना आहे. हे घर म्हणजे केवळ निवारा नव्हे, तर स्वप्नपूर्तीचा पहिला टप्पा आहे.