सोलर पंप योजना : सोलर प्लांटला अतिरिक्त सोलर पॅनल लावता येणार का ? पहा सविस्तर माहिती

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
solar pump yojana

मंडळी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलर पंप योजना (Solar Pump Yojana) हा एक उपयुक्त उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन एचपी, पाच एचपी आणि दहा एचपी क्षमतेचे सोलर पंप वाटप केले जात आहे. अनेक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेत आपल्या शेतात सोलर पंप बसवले आहेत आणि त्याचा फायदा घेत आहेत.

अलीकडे काही शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की, जे सोलर पंप आधीच बसवले आहेत, त्यांना अतिरिक्त सोलर पॅनल (Extra Solar Panels) जोडता येतील का? आणि त्याचा काही उपयोग होईल का?

सोलर पॅनल वाढवण्याआधी हे समजून घ्या

सर्वप्रथम, शेतकऱ्यांनी आपल्या सोलर पंप सिस्टमची गरज आणि क्षमता नीट समजून घेणे गरजेचे आहे.

उदाहरणार्थ जर आपल्या पंपाची क्षमता 3 HP असून त्याच्यासाठी 3000 व्होल्ट क्षमतेचा सोलर प्लांट बसवलेला असेल, तर त्या सिस्टीममध्ये पूर्ण कार्यक्षमता असते. अशा स्थितीत अतिरिक्त पॅनल जोडण्याची आवश्यकता नाही.

कंट्रोलरवर लक्ष ठेवा

जर शेतकऱ्यांना वाटत असेल की सोलर पंप अपेक्षित कार्य करत नाही किंवा जास्त कार्यक्षम बनवायचा आहे, तर सर्वप्रथम कंट्रोलरवर लक्ष द्या. कंट्रोलरवरील इनपुट पावरची मर्यादा काय आहे, हे तपासा.

अतिरिक्त पॅनलची गरज आहे का?

जर सोलर प्लांटची व्होल्टेज क्षमता 3000 पेक्षा कमी असेल आणि पंप कार्यक्षमतेने चालत नसेल, तरच अतिरिक्त पॅनल जोडण्याचा विचार करता येईल. अन्यथा, गरज नसताना पॅनल वाढवल्यास कंट्रोलर किंवा मोटर खराब होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे आर्थिक नुकसानही होऊ शकते.

अतिरिक्त सोलर पॅनल बसवण्याचा निर्णय घेताना आपल्या सिस्टीमची गरज, क्षमता आणि कंट्रोलरची मर्यादा नीट समजून घेणे आवश्यक आहे. अयोग्य पद्धतीने पॅनल बसवणे धोकादायक ठरू शकते.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment