मंडळी पगार कमी असला तरी पर्सनल लोन मिळू शकतं. अनेक बँका काही ठरावीक गोष्टींचा विचार करून लोन मंजूर करतात. मात्र त्यासाठी काही अटी असतात.
सर्वप्रथम क्रेडिट स्कोअर हा महत्त्वाचा घटक मानला जातो. तुमचा पगार कमी असला तरी जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल, तर पर्सनल लोन मिळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेळेवर हफ्ते भरणं, कर्ज परतफेडीचं शिस्तबद्ध नियोजन करणं आवश्यक ठरतं.
जर तुमचा क्रेडिट स्कोअर कमकुवत असेल, तर तुम्ही उच्च क्रेडिट स्कोअर असणाऱ्या व्यक्तीला सह-अर्जदार म्हणून जोडू शकता. यामुळे बँकेला तुमच्यावर विश्वास ठेवायला मदत होते आणि लोन मिळण्याची शक्यता अधिक होते.
पगार कमी असल्यास कमी रकमेचं लोन मागणं अधिक व्यवहार्य ठरतं. बँका अशा लोनसाठी तुलनेत लवकर मंजुरी देतात.
टीप — वरील माहिती ही प्राथमिक स्वरूपाची असून, कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.