Fact Check : या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅबलेट , काय आहे सत्यता

By Wiki Mitra

Published On:

Follow Us
free tablet yojana

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत मोफत टॅबलेट योजना बद्दल पसरत असलेल्या फ्रॉड बद्दल सविस्तर अशी माहिती , चला तर जाणून घेऊया याबद्दल माहिती.

केंद्र सरकारकडून मोफत टॅबलेट दिले जात आहेत, असा दावा केला जातोय. यावरच आता केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.देशातील गरीब तसेच वेगवेगळ्या वर्गातील नागरिकांचे भले व्हावे यासाठी भारत सरकार तर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात.

आरोग्य, शिक्षण यासाठी तर सरकार विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करते. सरकारतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, भोजन, शिष्यवृत्तीही दिली जाते. उच्चसिक्षण घेण्यासाठी तर अनेक ठिकाणी सरकारतर्फे टॅबलेट, लॅपटॉपही दिला जातो.

सरकारच्या याच धोरणाचा आधार घेत अनेकजण फसवणूक करतात. प्रलोभनांना बळी पडून अनेकजणांची आर्थिक लूट होते. दरम्यान, सध्या फ्री टॅब्लेट योजनेच्या नावाखाली अशाच प्रकारे एक घोटाळा केला जात आहे.

या खोट्या योजनेच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करून त्यांना लुबाडले जात आहे. याच कथित योजनेबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

पीआयपीबीने नेमकं काय सांगितलं ?

प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो अर्थात पीआयबीने या कथित टॅबलेट योजनेवर सविस्तर माहिती दिली आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारतर्फे देशात फ्री टॅब्लेट योजनेच्या नावाने कोणतीही योजना राबवली जात नाहीये.

सध्या इंटरनेटवर फिरत असलेली ही योजना फसवी आहे. तुम्हाला भ्रमित करण्याचा प्रयत्न या याजनेतून केला जात आहे. मोफत टॅबलेट देणाऱ्या अशा कोणत्याही योजनेच्या बळी पडू नका. अधिकृत संकेतस्थळ, अधिकृत स्त्रोतांवरच तुम्ही विश्वास ठेवायला हवा, असे पीआयबीने सांगितले आहे.

फ्री टॅब्लेट योजनेचा दावा काय ?

गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर फ्री टॅब्लेटसाठी एक योजना राबवली जात आहे, असा दावा केला जात होता. इंटरनेट तसेच समाज माध्यमांवर केंद्र सरकार मोफत टॅबलेट देत आहे, असा दावा केला जात होता.

मोफत टॅबलेट हवा असेल तर त्यासाठी कागदपत्रे जमा करा, असे आवाहन केले जात होते. पुढे याच कागदपत्रांच्या मदतीने लोकांची फसवणूक केली जात होती.

याआधी अनेक राज्यांत सरकारने विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेटचे वाटप केलेले आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. तर आम्ही मोफत टॅबलेटची कोणतीही योजना राबवली जात नाहीये, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

Wiki Mitra

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment