मंडळी महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारने २६ एप्रिल पर्यंत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार आता निधी खात्यात जमा होत असल्याचे दिसून येत आहे.
पैसे जमा झाले की नाही, असे तपासा
- एपमध्ये अकाउंट डिटेल्स किंवा बॅलन्स इन्क्वायरी विभागात जाऊन शिल्लक रक्कम तपासा.
- बँकेत जाऊन खात्याची स्थिती विचारून खात्री करा.
महत्वाच्या घोषणा व अपडेट्स
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यापूर्वीच आश्वासन दिले होते की, एप्रिल महिन्याचा हप्ता २६ एप्रिल पूर्वी जमा केला जाईल. मागील महिन्यातही हप्ता महिन्याच्या शेवटी जमा करण्यात आला होता. तसेच ज्या महिलांना योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे, त्यांच्याकडून मागील हप्त्याची रक्कम वसूल केली जाणार नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरमहा मिळणारी रक्कम व भविष्याची अपेक्षा
सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. सरकारने या रक्कमेचा हप्ता २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. तरीसुद्धा अद्याप ही रक्कम वाढवण्याबाबत कोणतेही निर्णय घेण्यात आलेले नाहीत. अर्थमंत्रालयाकडे यासंदर्भात शिफारसही करण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या लाभार्थी महिलांना १५०० रुपयांवर समाधान मानावे लागणार आहे.
लाडकी बहीण योजना – महिलांसाठी महत्त्वाची पायरी
लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वाची योजना आहे. सरकारने या योजनेतून महिलांना दरमहा आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात रक्कम वाढण्याच्या दृष्टीने महिलांची अपेक्षा आहे, त्यासाठी आणखी थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे.