मित्रांनो भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ही भारतातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह विमा कंपनी आहे. एलआयसीच्या विविध पॉलिसी आणि योजनांद्वारे सामान्य गुंतवणूकदार आपल्या भविष्यासाठी सुरक्षित आणि सुदृढ आर्थिक नियोजन करू शकतो. विशेषतः मुलींसाठी एलआयसीने एक अत्यंत उपयुक्त आणि सुरक्षित योजना उपलब्ध करून दिली आहे— एलआयसी कन्यादान पॉलिसी.
काय आहे एलआयसी कन्यादान योजना?
एलआयसीची कन्यादान योजना ही विशेषतः मुलीच्या भविष्याचा विचार करून तयार करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे पालक आपल्या मुलीच्या शिक्षण, लग्न किंवा इतर गरजांसाठी आर्थिक पाठबळ उभं करू शकतात. ही योजना १ वर्षांपर्यंतच्या मुलीसाठी सुरू करता येते आणि तिचा मॅच्युरिटी कालावधी १३ ते २५ वर्षांपर्यंत असतो.
गुंतवणुकीचा आरंभ फक्त १२१ रुपये रोज
या योजनेत गुंतवणूक सुरू करण्यासाठी रोज फक्त १२१ रुपये, म्हणजेच महिन्याला ३६०० रुपये गुंतवले तरी चालते. ही रक्कम नियमितपणे गुंतवत गेल्यास, मॅच्युरिटीच्या वेळी मोठा निधी मिळू शकतो.
२५ वर्षांमध्ये २७ लाखांचा फंड
जर तुम्ही या योजनेत २५ वर्षे नियमित गुंतवणूक केली, तर शेवटी सुमारे २७ लाख रुपयांचा फंड तुमच्या मुलीच्या नावावर तयार होऊ शकतो. ही योजना केवळ बचत करण्याचा मार्ग नसून, तुमच्या मुलीच्या स्वप्नांना आर्थिक आधार देणारा एक मजबूत पाया आहे.
अपघाती लाभ
या पॉलिसीची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, जर मॅच्युरिटीपूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला, तर किमान १० लाख रुपयांचा विमा लाभ दिला जातो. त्यामुळे मुलीच्या भविष्याची आर्थिक सुरक्षा सुनिश्चित होते.
एलआयसी कन्यादान योजना ही प्रत्येक पालकाने विचारात घ्यावी अशी उपयुक्त योजना आहे. कमी गुंतवणुकीत दीर्घकालीन लाभ मिळवून मुलीच्या शिक्षण, करिअर आणि लग्नासाठी भक्कम आर्थिक पाठबळ तयार करता येते.