मंडळी लग्नानंतर प्रत्येक पालकाच्या मनात एक प्रश्न हमखास निर्माण होतो – भविष्यात मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च कसा पेलायचा? आजच्या घडीला शिक्षणाच्या वाढत्या किमती, शालेय साहित्य, कपड्यांचा खर्च, आणि विविध उपक्रमांतील सहभाग यासाठी मोठी रक्कम लागते. हे सर्व पाहता, सुरुवातीपासूनच योग्य आर्थिक नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे.
अशा वेळी पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवणूक करणे ही एक चांगली आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. या योजनांद्वारे तुम्ही हळूहळू भांडवल जमा करू शकता, जे मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त ठरेल.
पोस्ट ऑफिस पीपीएफ योजना – एक दीर्घकालीन आणि फायदेशीर गुंतवणूक
पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) योजना ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक अत्यंत विश्वासार्ह योजना आहे. या योजनेत दरवर्षी किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. या योजनेचा मुदतकाल 15 वर्षांचा असतो आणि सध्या 7.1% वार्षिक व्याजदर लागू आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही योजना सरकारच्या हमीखाली येते, त्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.
दररोज फक्त 70 रुपये – शिक्षणाच्या खर्चाची मोठी तयारी
उदाहरणार्थ जर तुम्ही दररोज फक्त 70 रुपये बाजूला ठेवले आणि महिन्याला सुमारे 2100 रुपये पीपीएफ खात्यात जमा केले, तर वर्षभरात तुमची गुंतवणूक 25,500 रुपये होईल. हाच पॅटर्न तुम्ही 15 वर्षे कायम ठेवला, तर एकूण गुंतवणूक 3.75 लाख रुपये होईल. मात्र व्याजाच्या माध्यमातून ही रक्कम वाढून अंदाजे 6.78 लाख रुपये होईल.
का निवडावी ही योजना?
- सरकारची हमी असलेली सुरक्षित गुंतवणूक
- चक्रवाढ व्याजाचा लाभ
- दीर्घकालीन दृष्टिकोनातून फायदेशीर
- मुलांच्या उच्च शिक्षणासाठी भक्कम आर्थिक पाठबळ
शेवटी मुलांच्या भविष्याचा विचार करता, आर्थिक नियोजन गरजेचे आहे. पीपीएफसारखी योजना निवडून तुम्ही शिक्षणाच्या खर्चाची पूर्वतयारी करू शकता आणि भविष्यातील ताणतणाव टाळू शकता. छोटी-छोटी बचतही योग्य नियोजनातून मोठ्या भांडवलात रूपांतरित होऊ शकते.