मंडळी ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकार दरवर्षी काही ना काही नवीन योजना आणत असते. सध्या सरकारने अशा काही योजना सादर केल्या आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. या योजनांमुळे त्यांना आरोग्य, प्रवास, आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक आधार मिळणार आहे.
सर्वप्रथम प्रवासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रेल्वेने प्रवास करणाऱ्या पुरुष ज्येष्ठ नागरिकांना भाड्यात ४० टक्के सूट दिली जाते. महिलांना वय ५८ वर्षांपेक्षा अधिक असल्यास ५० टक्क्यांपर्यंत सूट मिळते. ही सुविधा एसी आणि सामान्य दोन्ही प्रकारच्या डब्ब्यांसाठी लागू आहे. काही विमान कंपन्याही वयोवृद्धांना तिकिटाच्या दरात सवलत देतात. तसेच दिल्ली आणि राजस्थान सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थयात्रेची संधी दिली जाते.
आरोग्याच्या क्षेत्रात आयुष्मान भारत ही योजना महत्वाची आहे. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना गंभीर आजारांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार दिला जातो. चालू शकत नसलेल्या किंवा आजारी ज्येष्ठ नागरिकांना घरपोच औषध दिली जाते. सरकारी रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी मोफत केली जाते आणि त्यांना प्राधान्य दिलं जातं. यात रक्तदाब, रक्त तपासणी, ECG, नेत्र तपासणी आणि हाडांची तपासणी यांचा समावेश होतो.
आर्थिकदृष्ट्या सुरक्षिततेसाठीही काही योजना राबवण्यात येतात. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत १००० रुपयांपासून गुंतवणूक करता येते आणि सध्या त्यावर ८.२ टक्के व्याज दिलं जातं. राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजनेअंतर्गत गरीब ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ६० ते ६९ वयोगटासाठी २००० रुपये आणि ७० वर्षांवरील नागरिकांना २५०० रुपये पेन्शन दिलं जातं.
इतर योजनांमध्ये राष्ट्रीय वृद्धाश्रम योजना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना निवासाची सोय दिली जाते. तसेच ‘वयोश्री’ योजनेत वॉकिंग स्टिक, व्हिलचेअर, कृत्रिम दात यांसारखी सहाय्यक उपकरणं मोफत दिली जातात.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी काही योजना ऑनलाईन अर्जाद्वारे मिळतात, तर काहीसाठी संबंधित सरकारी कार्यालयात जावं लागतं. अर्ज करताना ओळखपत्र, वयाचा दाखला, आणि उत्पन्नाचा पुरावा आवश्यक असतो.
या सर्व योजनांचा उद्देश एकच आहे – ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने आणि सुकर जीवन जगण्यास मदत करणे. कमाई बंद झाल्यावरही त्यांना आधार मिळावा, यासाठी सरकारकडून या योजना राबवल्या जात आहेत.