मंडळी ज्या शेतकऱ्यांनी सोलर पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केले होते, त्यातील अनेक अर्ज मंजूर झाले आहेत. काही अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. अशा अर्जधारकांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्जाची स्थिती तपासण्याची सुविधा उपलब्ध आहे.
जर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती तपासायची असेल, तर महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज क्रमांक टाकून स्थिती तपासता येईल.
महावितरणच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पाडावी लागेल.
1) वेबसाईटवर विचारले जाणारे प्रश्न योग्य प्रकारे उत्तर द्या.
- तुम्ही पैसे भरून प्रलंबित ग्राहक आहात का? यासारखे प्रश्न विचारले जातील.
- पीएम कुसुम सोलार योजनेसाठी नोंदणी केली आहे का? या प्रश्नाला होय किंवा नाही असे उत्तर द्या.
2) त्यानंतर अर्ज क्रमांक प्रविष्ट करा. अर्ज क्रमांक म्हणजे तुम्हाला दिलेला MK आयडी आहे.
3) यानंतर शोधा या पर्यायावर क्लिक करा.
अर्जाची स्थिती मंजूर झाल्यास ती स्पष्टपणे दिसेल. जर मंजुरी अद्याप प्रलंबित असेल, तर वेटिंग असे दिसेल.
तुमच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी दुसरी अधिकृत वेबसाईटही उपलब्ध आहे. या वेबसाईटवर Beneficiary Login पर्यायामधून तुमचा MK आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अर्जाची संपूर्ण माहिती मिळू शकते.
फसवणुकीपासून सावध राहा. फक्त अधिकृत वेबसाईटचा वापर करा आणि कोणत्याही अनधिकृत लिंकवर अर्जाची स्थिती तपासण्याचा प्रयत्न करू नका.
जर तुम्हाला अजून काही शंका असतील, तर अधिकृत कार्यालयाशी संपर्क साधा.