प्रिंटर म्हणजे काय | printer information in marathi

मित्रांनो तुम्ही अनेक वेळा resume प्रिंटर (printer information in marathi) ने प्रिंट केला असेल.आपल्या दररोजच्या आयुष्यात आपण अनेक डॉक्युमेंट्सची प्रिंट काढत असतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का हा प्रिंटर कोणी बनवला, प्रिंटर चे कोण कोणते प्रकार आहेत.
नाही ना! काही विषय नाही आजच्या या पोस्टमध्ये आपण प्रिंटर काय आहे, प्रिंटरचा इतिहास, प्रिंटरची वैशिष्ट्ये, प्रिंटरचे प्रकार याविषयीची माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात.

प्रिंटर काय आहे (printer information in marathi):

प्रिंटर एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे. याचा उपयोग डिजिटल सूचना कागदावर छापण्यासाठी केला जातो. हे एक कॉम्प्युटरचे आऊटपुट डिवाइस आहे. जे कॉम्प्युटरच्या सॉफ्ट कॉपीला हार्ड कॉपी मध्ये रुपांतर करते. प्रिंटर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस मध्ये स्टोअर केलेला डाटा एका पेज मध्ये प्रिंट करू शकते. ते पेज च्या आकारावरून लहान किंवा मोठं सुधा आपण करू शकतो.

विशेषतः प्रिंटरला कॉम्प्युटर बरोबर एका केबलने जोडले जाते. परंतु आताच्या काळामध्ये अनेक डिजिटल प्रिंटर तयार झाले आहेत. ब्लूटूथ, वायफाय, क्लाउड च्या मदतीने आपण वायरलेस पद्धतीने सुद्धा आता आपण प्रिंट काढू शकतो.

प्रिंटरचा इतिहास (History of Printer in Marathi):

मित्रांनो पहिला कॉम्प्युटर प्रिंटर 19 व्या शतकामध्ये कॉम्प्युटर चे जनक चार्ल्स बॅबेज यांनी तयार केला होता.
जपानची कंपनी Epson ने 1968 मध्ये EP-101 नावाचा पहिला इलेक्ट्रॉनिक प्रिंटर तयार केला होता. हा प्रिंटर सुरुवातीला फक्त टाइपराइटर मशीन बरोबरच जोडला जात होता.
प्रिंटर च्या वाढत्या मागणीमुळे 1984 मध्ये कमी किमतीत HP ने एक HP Laser Jet लाँच केला. आणि 2010 मध्ये 3D प्रिंटिंगला सुरुवात झाली.

प्रिंटरची वैशिष्ट्ये ( Features Of Printer in Marathi):

प्रिंटर्सचे विविध प्रकार आहेत. सर्वांमध्ये काही वैशिष्ट्ये काही फरकाने सारखी असतात. उदा. रेझोल्यूशन, रंगक्षमता, वेग, आणि मेमरी.

1) रेझोल्यूशन (printer resolution information in marathi):

मॉनिटर रेझोल्यूशन सारखेच प्रिंटर रेझोल्यूशन असते. निर्माण केलेली प्रतिमा किती सुस्पष्ट आहे याचे ते मोजमाप असते. प्रिंटर रेझोल्यूशन हे dpi (डॉट्स पर इंच प्रत्येक इंचात किती बिंदू आहेत) मध्ये मोजतात. व्यक्तिगत वापरासाठी असलेल्या कंप्युटर 1200 dpi चा असतो. dpi जितके अधिक तितका तयार होणाऱ्या प्रतिमेचा दर्जा उत्तम असतो.

2) रंगछटा क्षमता (printer colour pattern information in marathi):

सध्याच्या बहुतांश प्रिंटर्सकडून रंगछटा पुरवली जाते. वापरणाऱ्याला काळ्या शाईत किंवा रंगीत प्रिंट हवे असे पर्याय दिले जातात. रंगीत छपाई अधिक महाग असल्यामुळे बरेच वापरकर्ते पत्रं, ड्राफ्ट्स आणि गृहपाठ छपाईसाठी काळ्या शाईचा पर्याय स्वीकारतात. रंगीत छपाईचा वापर प्रामुख्याने ग्राफिक्स आणि छायाचित्र असलेल्या अहवालांच्या छपाईसाठी केला जातो.

3) वेग (printer speed information in marathi):

दर मिनिटाला किती पानांची छपाई केली गेली यावर वेग मोजतात. व्यक्तिगत वापरासाठीचा प्रिंटर दर मिनिटाला एकाच रंगाच्या शाईची (काळ्या) 15 ते 19 पाने छापतो. तर रंगीत छपाई एका मिनिटात 13 ते 15 पानांची केली जाते.

4) मेमरी (printer memory information in marathi):

छपाईच्या सूचना आणि छपाईसाठी तयार असलेली पानं यांची नोंद मेमरीमध्ये ठेवली जाते. प्रिंटरची मेमरी जितकी जास्त तितक्या अधिक प्रमाणात प्रिंटर मोठमोठ्या डॉक्युमेंट्सची छपाई करू शकतो.

प्रिंटरचे प्रकार (Types of Printer in Marathi):

1)इंकजेट प्रिंटर (ink jet printer information in marathi):

इंक-जेट प्रिंटर्स कागदाच्या पृष्ठभागावर शाई शिंपडतात. यामुळे केवळ उत्तम दर्जा राखला जातो असे नाही तर स्पेशल ॲप्लिकेशन्सना योग्य अशी रंगीत छपाईदेखील उत्तम तऱ्हेने करता येते. इंकजेट प्रिंटर्स मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. ते आवाज न करता काम करणारे, आणि तुलनेने कमी महाग असतात. इंक जेट प्रिंटर्सची सर्वांत महाग बाब म्हणजे इंक कार्ट्रिज बदलणे. याच कारणासाठी वापरणाऱ्यांपैकी बरेच जण छपाईसाठी काळी शाई वापरतात आणि निवडक ॲप्लिकेशन्ससाठी रंगीत छपाई करतात. सामान्यतः इंकजेट प्रिंटर्स काळ्या शाईतली 17 ते 19 पाने छापतात, तर 13 ते 15 रंगीत पाने छापतात.

2) लेझर प्रिंटर (laser printer information in marathi):

लेझर प्रिंटरमध्ये प्रत काढणाऱ्या मशीनसारखेच तंत्रज्ञान वापरले जाते. अक्षरे आणि ग्राफिक्सचा उत्तम दर्जा देणारा लेझर प्रिंटर प्रतिमा काढण्यासाठी लेझर लाइट बीमचा वापर करतो. इंकजेट प्रिंटरपेक्षा महाग असलेला लेझर प्रिंटर वेगवान असतो आणि उत्तम दर्जाच्या आउटपुटसाठी वापरला जातो. लेझर प्रिंटरचे दोन प्रकार आहेत. पर्सनल लेझर प्रिंटर हा रंगीत छपाईला साहाय्य करत नाही,आणि त्यामुळे तो स्वस्त असतो. आणि व्यक्तिगत वापरासाठी बरेचजण त्याचा उपयोग करतात. याद्वारे एका मिनिटाला 15 ते 17 पाने छापली जातात. शेअर्ड लेझर प्रिंटर हा रंगीत छपाईला साहाय्य करतो, आणि त्यामुळे तो महाग असतो. शेअर्ड लेझर प्रिंटर दरमिनिटाला 50 पेक्षा अधिक प्रती छापू शकतात.

3) थर्मल प्रिंटर (thermal printer information in marathi):

थर्मल प्रिंटर उष्णता-संवेदनक्षम कागदावर प्रतिमा तयार करण्यासाठी उष्णतेचा वापर करतात. हे प्रिंटर्स ATMs आणि पेट्रोल पंपावर पावत्या छापण्यासाठी वापरले जातात. कलर थर्मल प्रिंटर्सला डाय सबलिमेशन प्रिंटरही म्हणतात. विशेष प्रक्रिया केलेला कागद वापरून उच्च दर्जाचं आर्टवर्क आणि टेक्स्ट प्रिंट केलं जातं. मात्र या प्रिंटरची आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाची किंमत ही अतिशय जास्त असल्याने हे प्रिंटर्स अतिशय ठराविक कामांसाठीच वापरले जातात. उच्च दर्जाच्या रंगीत छपाईची गरज असलेल्या व्यावसायिक आर्ट आणि डिझाइन वर्कसाठी थर्मल प्रिंटर्स मोठ्या प्रमाणात वापरले जातात.

4) डॉट-मॅट्रिक्स प्रिंटर्स (dot matrix printer information in marathi):

प्रिंट हेडवर छोट्या पिन्स वापरून अक्षरे आणि प्रतिमांची निर्मिती केली जाते. पूर्वी मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे हे मायक्रोकंप्युटर प्रिंटर स्वस्त आणि विश्वसनीय असे असले तरी त्यांचा आवाज खूप येतो. जेव्हा छपाईचा उच्च दर्जा आवश्यक नसतो, तेव्हा या प्रिंटरचा वापर केला जातो.

तर मित्रांनो ही प्रिंटर (printer information in marathi) बद्दलची माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा. आपण भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद…

Leave a Comment