मंडळी २०२४ मध्ये देशांतर्गत ट्रॅक्टर विक्रीत काहीशी वाढ झालेली दिसून आली आहे, तर ट्रॅक्टर निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली आहे. ट्रॅक्टर अँड मॅकेनायझेशन असोशिएशनच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये ट्रॅक्टरची विक्री ९.१५ लाख युनिट्सवर पोहोचली होती, तर २०२४ मध्ये ती ९.०२ लाख युनिट्सपर्यंत थांबली.
२०२४ च्या पहिल्या पाच महिन्यांत ट्रॅक्टर विक्रीत मंदी दिसली, पण नंतरच्या काळात त्यात सुधारणा झाली. यंदा मॉन्सून हंगामात चांगला पाऊस झाला, ज्यामुळे काही प्रमाणात ट्रॅक्टर विक्रीला चालना मिळाली. शेतीमालाच्या किंमती कमी राहिल्याने शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी उत्साह दाखवला नाही. दसरा आणि दिवाळीच्या कालावधीत ट्रॅक्टर विक्रीत काही प्रमाणात वाढ झाली होती.
२०२४ च्या डिसेंबरमध्ये ट्रॅक्टर विक्रीत चांगली वाढ दिसली, कारण खरीप हंगामात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदीत वाढ दाखवली, परंतु ती वाढ दीर्घकाळ टिकली नाही.
ट्रॅक्टर उत्पादनातही २०२४ मध्ये काहीशी घट झाली आहे. २०२३ मध्ये ९.८६ लाख ट्रॅक्टर तयार करण्यात आले होते, तर २०२४ मध्ये त्याची संख्या ९.८२ लाख ट्रॅक्टरपर्यंत घसरली. २०२१ आणि २०२२ मध्ये ट्रॅक्टर उत्पादन १० लाखांच्या घरात पोहोचले होते, परंतु २०२३ आणि २०२४ मध्ये दुष्काळ आणि शेतीमालाच्या कमी किमती यामुळे शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर खरेदीसाठी कमी उत्साह होता.
देशातून ट्रॅक्टर निर्यात मात्र वाढली आहे. २०२२ मध्ये भारतीय बनावटीच्या ट्रॅक्टरची निर्यात १ लाख ३१ हजार ८५० युनिट्सवर पोहोचली होती. २०२३ मध्ये पण ती कमी होऊन ९६ हजार २२३ युनिट्सवर आली, पण २०२४ मध्ये निर्यात पुन्हा वाढून ९७ हजार ७४५ युनिट्सपर्यंत पोहोचली.