नमस्कार आज आपण संगणक व संगणकाच्या पिढ्या म्हणजेच Generation Of Computer In Marathi याबद्दल जाणून घेणार आहोत. संगणकाच्या शोधाने आधुनिक युगाची पायभरणी केली अस म्हणता येईल. 19 व्या शतक सुरु असताना एका गणिताच्या प्राध्यापकाने याचा शोध लावला यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. होय मात्र हे खर आहे चार्ल्स बॅबेज यांनी विद्यार्थ्यांना गणिताचे शिक्षण देत देत संगणकाचा सुद्धा शोध लावला आहे.
संगणकाच्या पिढ्या | 1 ली ते 5 वी | Generation Of Computer In Marathi
First Generation Of Computer In Marathi – संगणकाची पहिली पिढी – सन – 1940 ते 1956
पहिल्या पिढीतील संगणक हा आकाराने साधारण एखादी खोली असते तेवढ्या आकाराचा होता. त्यामुळे हे संगणक साहजिकच महाग असणार होय हे संगणकाची किंमत खूप जास्त होती. त्याच्या वापराने आपण गणित करू शकत असू म्हणजे गुणाकार, बेरीज, भागाकार, वजाबाकी या प्रकारची. हे संगणक वापरण्यासाठी वीज सुद्धा जास्त प्रमाणात लागत असे कारण एका खोली एवढा संगणक चालवण्यासाठी किती वीज लागत असेल विचार न केलेला बरा.
ह्या संगणकासाठी ज्या ट्यूब वापरल्या जात त्या व्हॅक्यूम प्रकारच्या ट्युब वापरल्या जात. तसेच हे भले मोठे संगणक पण तेवढेच प्रमाणात गरम होत असे त्याला थंड करण्याशिवाय पर्याय नसल्याने त्या खोली मध्ये लगातर वातानुकूलित ठेवणे गरजेचे असल्याने तिथे ac लावला जाई व ह्या संगणकास फक्त बायनरी भाषा समजत होती. ही तीच भाषा जी मशीन ला समजते.
Second Generation Of Computer In Marathi – संगणकाची दुसरी पिढी – सन 1956 ते 1963
आपण अगोरच्या पिढीतील संगणक पाहिले त्याचा आकार हा एका खोली एवढा होता तर दुसऱ्या पिढीतील संगणक हा खोलीपेक्षा खूपच कमी आकाराचा झाला साधारण एका कपाटाएवढा. तसेच ह्या संगणकाचा वेग सुद्धा मायक्रो सेकंदाने वाढला. दुसऱ्या पिढीची म्हणजेच जनरेशनची वैशिष्ट्ये म्हणजे Magnetic cores (चुंबकीय) चा वापर मेमरी साठविण्यासाठी होऊ लागला.
पहिल्या पिढीतील संगणक का आकाराने खोली एवढा असल्याने त्याला वीज जास्त लागत परंतु दुसऱ्या पिढीतील संगणक आकाराने कमी असल्याने त्याला वीज कमी प्रमाणात लागत असे.ह्या पिढीतच प्रिंट आउटच पध्दतीचा वापर सुरू झाला.
प्रथमच स्टोअर्ड प्रोग्रामचा कॉन्सेप्ट वापरला गेला. यात कामासाठी दिलेल्या सूचना मेमरी मध्ये स्टोअर केल्या गेल्या. या काळातच shortcodes वापण्याची पद्धत सुरू झाली आहे. म्हणजेच SUB करिता Substraction होय.
Third Generation Of Computer In Marathi – संगणकाची तिसरी पिढी – सन 1964 ते 1971
आता आपण पाहूया तिसऱ्या पिढीतील संगणक व त्यातील बदल. दुसऱ्या पिढीतील संगणकाचा वेग मायक्रो सेकंदाने वाढला होता त्यामानाने ह्या संगणकाचा वेग अजून वाढला तो नँनो सेकंद मध्ये होऊ लागला. पहिल्या पिढीतील संगणकाचा आकार एखाद्या खोली एवढा दुसऱ्या पिढीतील संगणकाचा आकार कपाटा एवढा झाला तर तोच आकार तिसऱ्या पिढीतील संगणकाचा आकार हा कमी होऊन एका टेबलावर बसेल एवढा झाला.
आकार एका टेबलवर संगणक बसेल इतपत लहान झाला. अगोरच्या पिढीमध्ये पंच कार्ड व प्रिंटर यांची जागा आता इंटीग्रेटेड सर्किटमुळे संगणकाचा वेगात भर पडली.इनपुट आउटपुटसाठी कीबोर्ड आणि मँनिटर यांचा वापर सुरू झाला. Software technology मध्ये रिमोट sharing आणि multi – programming os म्हणजे operating system चा वापर ह्या काळात सूरु झाला. यामुळे एका संगणकावर एकावेळी अनेक कामे करता येऊ लागली.
Fourth Generation Of Computer In Marathi – संगणकाची चौथी पिढी – सन 1971 ते आत्तापर्यंत
चौथ्या पिढीतील संगणकामध्ये खूपच प्रगती झाली. या पिढीमध्ये संगणक एकमेकांना जोडता येऊ लागली. याच काळात operating system चा उदय झाला अस म्हणू शकतो कारण MS DOS आणि MS Window’s वापर करण्यास सुरुवात झाली. आणि सध्याच्या काळात सुद्धा यांचा वापर जोमाने सुरू आहे.
चौथ्या पिढीतील संगणकामध्ये (GUI) GUI हे युसर फ्रेंडली इंटरफेस वापर सुरू झाला. यामुळे स्क्रीनवर menu आणि icon यांचा वापर सुरू झाला. स्टोरेज क्षमता वाढली व मँग्नेटीक कोड मेमरीमुळे कामाचा वेग वाढला. अगोदरच्या पिढीतील संगणकाचे पेक्षा याचा अजून लहान झाला हे संगणक हातात सहजपणे बसतील एवढ्या आकाराचे झाले हे विशेष.
Fifth Generation Of Computer In Marathi – संगणकाची पाचवी पिढी – आजपासून ते भविष्यापर्यन्त
आताचे शास्त्रज्ञ, विविध तंत्रन (Al) आर्टीफ़िसिअल इटेलीजंस वर आधारित संगणक असेल असं सांगतात, (Al) आर्टीफ़िसिअल इटेलीजंस म्हणजे हे संगणक हे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील.
- नक्की वाचा – Characteristics Of Computer In Marathi
निष्कर्ष
ह्या पोस्ट मध्ये आपण संगणकाच्या पिढ्या म्हणजेच Generation Of Computer In Marathi बद्दल माहिती जाणून घेतली . ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेयर करायला विसरू नका .