मॉनिटर म्हणजे काय? | monitor information in marathi

मॉनिटर म्हणजे काय? (monitor information in marathi)

मित्रांनो, तुम्ही मॉनिटर विषयी नक्की ऐकलं असेल. कारण आपण आपला जास्तकरून वेळ मॉनिटर समोर बसण्यातच घालवतो, जसं की गेम खेळणे, चित्रपट पाहणे आणि बऱ्याच काही गोष्टी…
आजच्या या पोस्टमध्ये आपण मॉनिटर (monitor information in marathi) म्हणजे काय, मॉनिटरची वैशिष्ट्ये, मॉनिटरचे प्रकार याविषयीची माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहुयात…

मॉनिटरचा अर्थ काय ( What is mean by Monitor ):

मॉनिटर एक आऊटपुट उपकरण आहे. आणि याचा सर्वात जास्त वापर केला होतो. सीपीयू मधील सर्व माहिती मॉनिटरवर दाखवली जाते. याला डिस्प्ले स्क्रीन किंवा नुसते स्क्रीनही म्हटले जाते. टेक्स्ट आणि ग्राफिक्स दृश्य स्वरूपात आपल्यासमोर सादर करण्याचे काम मॉनिटर करतात. आउटपुटला बरेचदा सॉफ्ट कॉपी असेही म्हणतात. मॉनिटरचे आकार, किंमत वेगवेगळी असते. मात्र जवळजवळ सर्व मॉनिटर्समध्ये काही महत्त्वाची वैशिष्ट्ये समान असतात.
एका मॉनिटरला screen, display, video display, video display terminal, video display unit, video screen यासारख्या नावाने सुद्धा ओळखले जाते.

मॉनिटरचा शोध कोणी लावला (Who invented by monitor in marathi):


जगामध्ये सर्वात पहिला CRT (Cathode Ray Tube) चा शोध Karl Ferdinand Braun यांनी 1897 मध्ये लावला होता.

मॉनिटर काय काम करतो:

एक कॉम्प्युटर मॉनिटर एक प्रकारचा Display Adaptor आहे. जो कॉम्प्युटर च्या Video Card ने प्रोसेसींग केलेला डाटा आहे तो डाटा मॉनिटर वर दाखवला जातो. यामुळे युजरला कॉम्प्युटर बरोबर Intract होता येत.

मॉनिटरची वैशिष्ट्ये:

मॉनिटरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्पष्टता. स्पष्टता म्हणजे सादर केलेल्या प्रतिमांचा दर्जा आणि नेमकेपणा. यासाठी रेझोल्यूशन, डॉट पिच, रिफ्रेश रेट, आणि आकार या मॉनिटरच्या वैशिष्ट्यांचा वापर केला जातो.

1) रेझोल्यूशन : (computer resolution information in marathi)

हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मॉनिटरवर दिसणाऱ्या प्रतिमा बिंदूसमूह किंवा पिक्सलपासून तयार झालेल्या असतात. या बिंदूसमूहाच्या साच्यातून (मॅट्रिक्स) रेझोल्यूशनचा आविष्कार होतो. उदा. अलीकडच्या बऱ्याच मॉनिटरमध्ये रेझोल्यूशन 1920 पिक्सल कॉलम्स: 1080 पिक्सल रोज् म्हणजे 2,073,600 पिक्सल्स इतके असते. मॉनिटरचे रेझोल्यूशन जितके जास्त (अधिक पिक्सल्स असलेले) तितकी दिसणाऱ्या प्रतिमेची स्पष्टता अधिक.

2)डॉट पिच् : (computer dot pitch information in marathi)

म्हणजे पिक्सलमधले अंतर. बऱ्याच नव्या मॉनिटरचे डॉट पिच 30 मिमी (मिलीमीटरचा 30/100 वा भाग) असते. डॉट पिच जितका कमी (पिक्सल्समधले अंतर) तितकी प्रतिमा अधिक स्पष्ट दिसते.

3) रिफ्रेश रेट: (computer refresh rate information in marathi)

मॉनिटरवर दिसणारी प्रतिमा किती वेळा अपडेट किंवा रिड्रॉन होते ते रिफ्रेश रेटवरून समजते. बरेचसे मॉनिटर्स 75 हर्ट्झ एवढ्या वेगाने काम करतात. याचा अर्थ प्रत्येक सेकंदाला मॉनिटर 75 वेळा रिफ्रेश झाला. मॉनिटर रिफ्रेश रेट 75 हर्ट्झपेक्षा कमी असेल तर डोळ्यांवर ताण पडू शकतो. रिफ्रेश रेट जितका जास्त (प्रतिमा जास्त वेळा रिड्रॉन होतील) तितका प्रतिमांचा दर्जा उत्तम.

4) आकार : (computer screen size information in marathi)

मॉनिटरच्या दिसणाऱ्या भागाची लांबी-रुंदी सर्वसाधारणतः 15, 17, 19, 21 इंच असते. मॉनिटरचा आकार जितका लहान तितका सादर केलेल्या प्रतिमांचा दर्जा चांगला दिसतो.

5) अस्पेक्ट रेशो : (computer aspect ratio information in marathi)

मॉनिटरच्या रुंदीला उंचीनं भागल्यावर अस्पेक्ट रेशो मिळतो. 4: 3 हे सामान्यतः वापरले जाणारे अस्पेक्ट रेशो आहेत. वाइड स्क्रीनसाठी 16:9 हे प्रमाण वापरलं जातं.

कॉम्प्युटर मॉनिटर चे प्रकार (Types Of Monitor in Marathi):

1) CRT Monitors:

या मॉनिटर मध्ये इमेज डिस्प्ले करण्यासाठी Cathode Ray Tube चा उपयोग केला जातो. ही Tube Construct करण्यासाठी vacuum tube, heaters, electron guns, deflection circuits आणि एक glass screen वापरली जाते. हे मॉनिटर खूप एनर्जी खर्च करतात. हे आकार आणि तंत्रज्ञानाने जुन्या दूरचित्रवाणी संचाप्रमाणे असतात. त्यांच्या जागी फ्लॅट पॅनल मॉनिटर्स आले आहेत.

2) LCD Monitors:

LCD स्क्रीनमध्ये Monochrome Pixel चा वापर केला जातो. हे मॉनिटर खूप कमी एनर्जी खर्च करतात आणि चांगल्या प्रकारचे Graphics प्रदान करतात. जास्त करून कॉम्प्युटरमध्ये याच मॉनिटरचा वापर केला जातो. 17″ पासून 60″ पर्यंत या मॉनिटरची स्क्रीन साइज असते.

3) LED Monitors :

हे मॉनिटर बाजारातील सर्वात नवीन मॉनिटर आहेत. यामध्ये इमेज दाखवण्यासाठी Light Emitting Diode चा उपयोग केला जातो. LED मॉनिटर CRT आणि LCD च्या तुलनेत खूप कमी वीज खातात. याबरोबरच हे जास्त Environment friendly असतात. यांची डिझाइन सुधा आकाराने खूप पातळ असते. हे जास्त उष्णता सुद्धा निर्माण करत नाहीत पण यांचा एक तोटा म्हणजे हे महाग असतात.

4) इतर मॉनिटर्स:

मॉनिटर्सचे खूप प्रकार आहेत. हे मॉनिटर्स विशेष ॲप्लिकेशन्ससाठी वापरले जातात. उदा.Nपुस्तके वाचणे, प्रेझेंटेशन्स बनविणे, दूरचित्रवाणी बघणे.

डिजिटल किंवा संवादी व्हाईटबोर्ड्स हे संगणक किंवा प्रोजेक्टरशी जोडलेले मोठ्या डिस्प्लेसह असणारी विशेष डिव्हायसेस असतात. संगणक डेस्कटॉप हा डिजिटल व्हाईटबोर्डावर दर्शविला जातो आणि स्पेशल पेन बोट किंवा काही इतर साधने वापरून नियंत्रित केला जातो. डिजिटल व्हाईटबोर्ड्स हे मोठ्याप्रमाणात वर्गांमध्ये आणि कॉर्पोरेट बोर्डरूम्समध्ये वापरले जातात.

हाय डेफिनिशन टेलिव्हिजन (HDTV) हे नियमित दूरचित्रवाणी पेक्षा अधिक स्पष्ट आणि अधिक तपशिलवार विस्तृत स्क्रिन छायाचित्रे देतात. कारण आऊटपुट हे डिजिटल असते. वापरकर्ते उच्च गुणवत्तेच्या स्थिर प्रतिमा निर्माण करण्यासाठी व्हिडिओ क्रम सहजपणे फ्रिझ करू शकतात. मग व्हिडिओ आणि स्थिर प्रतिमान डिजिटाईझ संपादित आणि नंतरच्या वापराकरीता डिस्कवर संग्रहित करता येतात. हे तंत्रज्ञान ग्राफिक कलाकार, रचनाकार आणि प्रकाशकांकरीता अत्यंत उपयोगी असते.

आशा करतो की मॉनिटर बद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. याबद्दलचे तुमचे काही प्रश्न, शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा. भेटुयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद…

Leave a Comment