विकी मित्र मध्ये स्वागत! वाचकहो, आज असे कोणीही नसेल की ज्याला संगणक अर्थात कॉम्प्युटर म्हणजे काय हे माहिती नसेल. पण असे मोजकेच लोक असतील ज्यांना संगणकाचे पूर्ण प्रकार (types of computer in marathi) माहीत असतील.
या पोस्टमध्ये आपण संगणकांच्या प्रकारांविषयी विस्तृत माहिती बघणार आहोत संगणकाचे साधारणपणे नऊ प्रकार आहेत. त्यांना विविध तीन गटांमध्ये वर्गीकृत केलेले आहे चला तर मग बघुया संगणकाचे प्रकार.
संगणकाचे प्रकार ( types of computers in marathi)
आकारानुसार संगणकाचे प्रकार Types of computer in marathi based on size
सर्वप्रथम आपण आकारानुसार वर्गीकृत केलेल्या संगणकाची माहिती बघूया आकारावरून संगणकाचे महासंगणक मेनफ्रेम संगणक मिनीफ्रेम संगणक व मायक्रो संगणक असे चार प्रकार पडतात साधारणपणे कामाच्या व्यापार नुसार व जागेनुसार लहान-मोठे संगणक निवडले जातात.
महासंगणक super computer
जगामधील सर्वात वेगवान अचूक आणि शक्तिशाली संगणक म्हणजे महासंगणक.
जगातल्या विविध संस्था महासंगणकाचा वापर करतात.
महा संगणकाचा आकार एका खोलीपासून ते एखाद्या इमारती एवढा मोठा असू शकतो जगातला पहिला महासंगणक होण्याचा मान सेमूर क्रे निर्मित ‘CDC 6600’ या संगणकाला जातो.
अमेरिकेच्या NASA या अंतराळ संस्थेमध्ये उपग्रहांना नियंत्रित करण्यासाठी महासंगणकाचा वापर होतो.
मेनफ्रेम संगणक mainframe computer
महा संगणकाचा तुलनेत अधिक माहिती साठवण क्षमता असणाऱ्या मेनफ्रेम संगणकावर अत्याधिक ताण असतो परिणामी कामाचा प्रचंड ताणमुळे मेनफ्रेम संगणक त्वरित गरम होतो. या संगणकाला थंड करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा बसवलेल्या खोलीमध्ये ठेवावे लागते.
मेनफ्रेम संगणक एकाच वेळी हजारो वापरकर्त्यांना नियंत्रित करु शकतात तसेच मेनप्रेम संगणक एकाच वेळी हजारो प्रोग्रॅम देखील रन करू शकतील. अशी त्याची रचना असते प्रामुख्याने मेनफ्रेम संगणकाचा वापर विविध सरकारी संस्था अथवा सोशल मीडिया संस्था तसेच बँका इत्यादी द्वारे केला जातो.
मिनीफ्रेम संगणक (miniframe computers)
मिनिफ्रेम संगणक हे मायक्रो संगणक व मेनफफ्रेम संगणक यांच्यामध्ये बसतात. हे संगणक मेनफ्रेम संगणकापेक्षा लहान मात्र मायक्रो संगणकापेक्षा मोठे असतात.
मिनिफ्रेम संग�����क हे कार्या�����े मेनफ्रेम संगणकासारखे असले तरीही यावर एकाचवेळी कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 250 वापरकर्ते नियंत्रित होऊ शकतात.
या प्रकारच्या संगणकाचा वापर विविध संस्था अथवा विभागाद्वारे होत असला तरीही प्रमुख्याने संगणक वर्ग चालवणाऱ्या संस्था तसेच शैक्षणीक संस्थेद्वारे सर्वाधिक होतो.
मायक्रो कॉम्पुटर (micro computer)
मायक्रो संगणक म्हणजेच तुमचा आमचा वयक्तिक संगणक अथवा personal computer
आपण आपल्या दैनंदिन वापरात वापरत असलेले डेक्सटोप लॅपटॉप टॅबलेट अथवा स्मार्टफोन हे मायक्रो संगणक आहेत.
CPU ,मेमरी,स्टोरेज तसेच इनपुट व आउटपुट इत्यादी मायक्रो संगणकाचे वैशिष्ठे आहेत सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या संगणकापैकी मायक्रो संगणक सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे.
प्रत्येक यंत्राला कार्य करण्यासाठी यंत्रणेची आवश्यकता असते संगणकांमध्ये कोणत्या प्रकारची यंत्रणा कार्यरत आहे यावरून संगणकाचे तिन प्रकार पडतात.
यंत्रणेवर आधारीत प्रकार( types of computers in marathi based on mechanism)
एनलॉग संगणक (analogue computer)
सतत बदलत राहणाऱ्या माहिती म्हणजेच डेटाला एनलॉग डेटा असे म्हणले जाते अशा प्रकारच्या डेटावर प्रक्रिया करण्यासाठी एनलॉग संगणकाचा वापर केला जातो एनलॉग संगणक वेगवान असतात शिक्षण व विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रामुख्याने वापरले जाणारे हे एनलॉग संगणक आलेख स्वरूपात माहिती पुरवतो व संख्या साठवू शकत नाही.
डिजिटल संगणक Digital Computer
विविध सूचनांचा सांख्यिक प्रकारात रूपांतर करून त्यानुसार कार्य करणारा संगणक म्हणजे डिजिटल संगणक होय.
या प्रकारच्या संगणकामध्ये सूचनांना दर्शविण्यासाठी बाइनरी सिस्टीम चा वापर केला जातो डिजिटल संगणकामध्ये बायनरी स्वरूपातील सूचना साठवून ठेवण्यासाठी ची क्षमता असते.
बायनरी सिस्टम म्हणजे शून्य आणि एक या दोनच संख्याच्या रूपात असते गतीचा विचार केला तर अनलॉग संगणकापेक्षा हे संगणक काहीसे हळू असतात मात्र यांची अचूकता अधिक असते.
हायब्रीड संगणक Hybrid Computer
अनलॉग व डिजिटल संगणकांचा सुयोग्य मिलाप म्हणजे हायब्रीड संगणक होय.
यात अनलॉग व डिजिटल संगणकाची वैशिष्ट्ये या एकाच संगणकामध्ये मिळतात.
या संगणकाची गती आणि अचूकता दोन्ही अधिकच असते या प्रकारच्या संगणकामध्ये इनपुट साठी तसेच गणितीय क्रिया करून घेण्यासाठी डिजिटल तर आउटपुट देण्यासाठी अनालॉग प्रकार वापरला जातो.
वापरावर आधारित संगणकाचे प्रकार types of computer in marathi based on purpose
सामान्य वापराचे संगणक General purpose computer
सामान्य वापराचे संगणक प्रमुख्याने शैक्षणिक दैनंदिन तसेच व्यावसायिक वापरासाठी बनविलेले असतात.
आपला डेक्सटॉप लॅपटॉप किंवा स्मार्टफोन देखील याच प्रकारातील आहेत. या प्रकारच्या संगणकामध्ये विविध प्रकारच्या क्रिया करता येतील या प्रमाणे क्षमता विकसित केलेली असते.
विशेष वापराचे संगणक Special purpose computer
एखाद्या विशिष्ट कार्यासाठी बनविलेले संगणक म्हणजे विशेष वापराचे संगणक होय.
हे संगणक सामान्य वापराच्या संगणकाप्रमाणे विविध प्रकारचे कामे करू शकत नाही त्यांना ज्या कार्यासाठी बनविण्यात आलेली आहे अशाच प्रकारची कामे हे संगणक करतात.
जसे की परिवहन महामंडळाच्या बसेसचे नियंत्रण करणे वातावरणावर आधारित हवामान अंदाज वर्तविणे इत्यादी कामे करू शकतात हे सामान्य वापराच्या संगणकाप्रमाणे कार्य करू शकत नसले तरीही यांचा वेग अद्वितीय आहे.
आशा करतो की तुम्हाला संगणकाचे प्रकार (types of computer in marathi) या पोस्ट मध्ये संपूर्ण माहिती मिळाली असेल. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली एक कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल किंवा माहितीपूर्ण वाटली तर तुमच्या मित्रांना शेअर करा. आपण भेटूयात पुढच्या पोस्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद.